मुंबई : उत्तर प्रदेशच्या लखनौ मधील इस्लाम स्वीकारलेल्या १५ जणांची नुकतीच घरवापसी करण्यात आली. लखनौच्या गोमती नगरमध्ये, विश्व हिंदू रक्षा परिषदेच्या सदस्यांनी शंखनाद आणि मंत्रौच्चारात या १५ जणांना हिंदू धर्मात परत आणले. घरवापसीच्या कार्यक्रमावेळी सुरक्षेच्या दृष्टीकोनातून मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष गोपाल राय यांनी माहिती दिली की बलरामपूरमध्ये गजवा-ए-हिंदचा चेहरा असलेले चांगूर पीर मोहम्मद अहमद खान आणि अब्दुल मबुद रझा हे जबरदस्तीने किंवा कट रचून लोकांचे धर्मांतर करायचे. काही मुली अत्याचारही झाले. त्यांचा धर्म बदलण्यासोबतच त्यांच्या मालमत्ताही ताब्यात घेण्यात आल्या. असे म्हटले जात आहे की परदेशातून येणाऱ्या निधीच्या मदतीने आणि अनेक सापळे रचत चांगूर पीर मोहम्मदने हजारो लोकांचे धर्मांतरण केले होते. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.
'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक