भोपाळ : मध्यप्रदेशच्या जबलपूरमधील एका तरुणीवर तिच्याच मैत्रिणीने ॲसिड हल्ला केल्याची धक्कादायक घटना उघड होत आहे. या अॅसिड हल्ल्यामागे कोणताही पुर्वीचा राग झाला नसून, तो फक्त तिचे सुंदर असणे या कारणातून झाल्याची माहिती समोर आली आहे. आपली मैत्रिण आपल्यापेक्षा सुंदर दिसते, तीची माझ्यापेक्षा प्रगती होऊ शकते. आणि एकाच मुलावरून झालेल्या वादातून तिने आपल्या मैत्रिणीचे रुप अॅसिड फेकून विद्रूप करण्याचे ठरवले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जबलपूर येथील एकाच कॉलेजमध्ये शिकत असलेल्या श्रद्धा दास आणि इशिता साहू या दोघीही एकमेकांच्या चांगल्या मैत्रिणी होत्या. परंतू गेल्या काही महीन्यांपासून दोघांमध्येही एकाच मुलावरून सारखे खटके उडत होते. सारख्या होणाऱ्या भांडणातून दोघांचे मैत्रीसंबध खराब झाल्याने गेल्या दोन महीन्यांपासून त्यांचे बोलणे बंद झाले होते. श्रद्धा ही दिसायला सुंदर होती, तिला हल्लीच नोकरी मिळाली होती आणि एकाच मुलाच्या वादातून इशिताच्या मनात प्रचंड जळफळाट होत होता. याच जळफळाटातून हा अॅसिड हल्ला झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
इशिताने असा केला हल्ल्याचा प्लॅन!
पोलिस तपासात समोर आलेल्या माहितीत स्पष्ट झाले कि, इशिताने १५ दिवसांपुर्वीच या हल्ल्याचे प्लनिंग करून ठेवले होते. अॅसिड हल्ला कसा केला जातो याबद्दल तिने गुगलवर माहिती मिळवली. त्यातील एका पद्धतीचा वापर करायचा ठरवून तिने आपला मित्र अंश शर्मा कडून अॅसिड मिळवले.
यानंतर घटनेच्या दिवशी श्रद्धाला सरप्राईज देण्याच्या बहाण्याने इशिताने घराबाहेर बोलावले, परंतू इशिताने नकार दिला. याचदरम्यान, "तूझ्यासाठी काहीतरी सरप्राईज आहे लवकर ये मी वाट बघतेय" असे सांगताच श्रद्धा घराबाहेर आली. घराबाहेर येताच इशिताने बॅग मधील जारने श्रद्धावर अॅसिड फेकत हल्ला केला.
श्रद्धाचा ५० टक्के चेहरा जळला
या हल्ल्यात श्रद्धाचा चेहरा ५० टक्के जळला असून, तीची प्रकृती गंभीर आहे. जबलपूरमधील एका खासगी रुग्णालयात श्रद्धावर उपचार सुरू आहेत.