फोर्ब्सकडून भारतातल्या अब्जाधीशांची राजधानी म्हणून 'मुंबई'चा उल्लेख!

    03-Jul-2025
Total Views |

Forbes mentions
 
मुंबई: फोब्सने नुकताच जाहीर केलेल्या आपल्या यादित मुंबईचा विशेष उल्लेख केला आहे. आतापर्यंत मुंबई महाराष्ट्राची राजधानी म्हणून ओळखली जायची. परंतू फोर्ब्सकडून आता भारतातल्या सर्वाधिक अब्जाधीशांचे शहर म्हणून मुंबईचा उल्लेख करण्यात आला आहे. फोब्सच्या आकेडवारीनुसार, अतिश्रीमंत रहिवाशांच्या वाढत्या संख्येसह हे मुबंई शहर यादीत अव्वल आहे.
 
फोर्ब्सच्या २०२५ च्या जगातील अब्जाधीशांच्या यादीनुसार, मुंबई शहरात भारतातील सार्वाधिक अतिश्रीमंत लोक राहतात आणि मुंबईतील त्यांची संख्या ही वाढणारी आहे. भारतातील ६७ अतिश्रीमंत रहिवाशांसह मुंबई फोब्सच्या जागतिक यादित सहाव्या क्रमांकावर आहे. परंतू फोब्सच्या मते, मागच्या वर्षीच्या यादितील मुंबईचे चौथे स्थान घसरून ते आता सहाव्या क्रमांकावर आले आहे.
 
या मोठ्या शहरांना मागे टाकत मुंबई अव्वल!
 
आपली घौडदौड कायम ठेवत पुन्हा एकदा मुंबई भारताच्या अब्जाधीशांची राजधानी म्हणून उदयास आली आहे. ३४९ अब्ज डॉलर्स संपत्ती आणि ६७ अब्जाधीश रहिवाशांसह मुंबई जागतिक स्तरावर सहाव्या क्रमांकावर आहे. संपत्तीच्या तुलनेत भारतातील मोठी महानगर असलेल्या दिल्ली आणि बेंगळूरूसारख्या शहरांना मागे टाकत मुंबई जागतिक स्तरावर अव्वल आहे.
 
का आहे मुंबई शहर अतिश्रीमंतांच आकर्षण?
 
बॉम्बे स्टॉक एक्सचेंज, नॅशनल स्टॉक एक्सचेंज आणि भारतातील इतर प्रमुख मोठ्या कंपन्यांचे मुख्यालय हे मुंबईत आहे.
या सर्वांना केंद्रबिंदु ठेवून मुंबई शहर हे अतिश्रीमंतांच्या आकर्षणाचे शहर बनले आहे. मुंबईच्या अब्जाधीश रहिवाश्यांमध्ये अंबानी, टाटा, बिर्ला,गोदरेज, पिरामल या परिवारांसह अन्य रहिवासी अब्जाधीशांचा समावेश आहे.
 
फोब्सने जाहीर केलेल्या अब्जाधीशांच्या शहराची यादि
 
१) न्यू यॉर्क शहर - १२३ अब्जाधीश
२) मॉस्को - ९० अब्जाधीश
३) हाँगकाँग - ७२ अब्जाधीश
४) लंडन - ७१ अब्जाधीश
५)बीजिंग - ६८ अब्जाधीश
६) मुंबई - ६७ अब्जाधीश
७)सिंगापूर - ६० अब्जाधीश
८)सॅन फ्रान्सिस्को - ५८ अब्जाधीश
९)शांघाय - ५८ अब्जाधीश
१०)लॉस एंजेलिस - ५६ अब्जाधीश