मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Taliban Banned Chess in Afghanistan) अफगाणिस्तानात बुद्धिबळ खेळण्यावर आणि त्यासंबंधित सर्व क्रियाकलापांवर अनिश्चित काळासाठी बंदी घालण्याचा निर्णय तालिबान प्रशासनाकडून घेण्यात आला आहे. या संदर्भात एक फतवा जारी केला आहे. क्रीडा संचालनालयाचे प्रवक्ते अटल माशवानी यांच्या म्हणण्यानुसार, बुद्धिबळ हा शरियामध्ये जुगाराचा एक प्रकार मानला जातो, जो देशाच्या "चांगल्या गोष्टींना प्रोत्साहन देण्याच्या आणि वाईट गोष्टींना प्रतिबंधित करण्याच्या कायद्यानुसार" प्रतिबंधित आहे.
हे वाचलंत का? : कुत्र्याची शेपूट वाकडी ती वाकडी; 'पाक'कडून युद्धबंदीचे उल्लंघन! भारताचे चोख प्रत्युत्तर
बुद्धिबळावर धार्मिक आक्षेप आहेत आणि जोपर्यंत हे आक्षेप दूर होत नाहीत तोपर्यंत अफगाणिस्तानात हा खेळ स्थगित राहील, असे मशवानी यांचे म्हणणे आहे. त्यांनी निदर्शनास आणून दिले की, गेल्या दोन वर्षांपासून राष्ट्रीय बुद्धिबळ महासंघाने कोणतीही अधिकृत स्पर्धा आयोजित केलेली नाही, तसेच नेतृत्व पातळीवरही समस्या सुरू आहेत. या निर्णयामुळे बुद्धिबळप्रेमी आणि संबंधित व्यवसायांमध्ये निराशा पसरली आहे.
हे लक्षात घेण्यासारखे आहे की तालिबान सरकारने आधीच अनेक खेळांवर निर्बंध लादलेत. महिलांचा खेळांमध्ये सहभाग आधीच पूर्णपणे निषिद्ध आहे. गेल्या वर्षी, मिक्स्ड मार्शल आर्ट्स (MMA) सारख्या मुक्त लढाई खेळांवरही "अत्यधिक हिंसक" आणि "शरियाविरुद्ध" असल्याबद्दल बंदी घालण्यात आली होती.