२५ वर्षांपूर्वी जंगलातून नामशेष झाला हा पक्षी; आता 'वनतारा'मुळे घेणार पुन्हा भरारी

    03-Feb-2025
Total Views | 42
Vantara Partners with ACTP to Reintroduce 41 Extinct-in-the-Wild Spix’s Macaws in Brazil



मुंबई (विशेष प्रतिनिधी) -
ब्राझीलच्या जंगलातील नैसर्गिक अधिवासामधून २५ वर्षांपूर्वी नामशेष म्हणून घोषित करण्यात आलेल स्पिक्स मकाव जातीचे पोपट पुन्हा एकदा आपल्या मूळ अधिवासात परतण्यासाठी सज्ज झाले आहेत (Spix’s Macaws). 'वनतारा'शी संलग्न असणाऱ्या 'असोसिएशन फाॅर द काॅन्झर्वेशन आॅफ थ्रेटेन्ड पॅरेट्स'ने (एसीटीपी) आपल्या जर्मनी येथील प्रजनन केंद्रामधून ४१ स्पिक्स मकाव पोपटांना ब्राझीलमध्ये हलविले (Spix’s Macaws). याठिकाणी 'ग्रीन्स झूलॉजिकल रेस्क्यू अँड रिहॅबिलिटेशन सेंटर' (जीझेडआरआरसी) या संस्थेकडून या पोपटांना नैसर्गिक अधिवासात सोडण्याचे काम करण्यात येईल (Spix’s Macaws). 'वनतारा'ने यामध्ये 'एसीटीपी'ला तज्ज्ञ मार्गदर्शन आणि संसाधनांची मदत केली आहे (Spix’s Macaws).
 
 
स्पिक्स मकाव ही प्रजात २००० साली जंगलातील नैसर्गिक अधिवासामधून नामशेष झाल्याचे जाहीर करण्यात आले. ही प्रजात ब्राझीलमधील कॅटिंगा बायोमधील जंगलात आढळत होती. बंदिस्त अधिवासात शिल्लक राहिलेल्या पोपटाच्या या प्रजातीला पुन्हा जंगलात सोडण्यासाठी ब्राझील सरकारने चंग बांधला. यामध्ये 'वनतारा'शी संलग्न असलेल्या 'जीझेडआरआरसी' आणि 'एसीटीपी' यांनी सहकार्य केले. त्यासाठी २०२९ साली ब्राझीलमध्ये या पोपटांचे स्थानांतरण करण्यासाठी एक समर्पित केंद्र स्थापन करण्यात आले. त्यानंतर २०२० मध्ये जर्मनी आणि बेल्जियममधून याठिकाणी ५२ स्पिक्स मकाव पोपट आणण्यात आले. २०२२ मध्ये यामधील २० स्पिक्स मकाव पोपटांना त्यांच्या नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले. परिणामी यातून सात पिल्लांचा नैसर्गिक अधिवासात जन्म झाला. याच प्रकल्पाचा दुसरा टप्पा म्हणून गेल्या आठवड्यात जर्मनीतील 'एसीटीपी'च्या प्रजनन केंद्रातून ४१ मकाव पक्षी ब्राझीलमध्ये हलविण्यात आले आहे.
 
 
ब्राझीलमध्ये धाडण्यात आलेल्या स्पिक्स मकाव पोपटांमध्ये २३ मादी, १५ नर आणि ३ लिंग न समजलेले अल्पवयीन पक्षी आहेत. २८ जानेवारी रोजी हे पक्षी बर्लिनहून ब्राझीलच्या पेट्रोलिना विमानतळावर एका चार्टर्ड विमानाने पोहोचले. हस्तांतरण करण्यापूर्वी या पक्ष्यांचे बर्लिनमधील प्रजनन केंद्रात २८ दिवसांसाठी विलगीकरण करण्यात आले होते. ब्राझीलमध्ये पोहोचलेल्या या पक्ष्यांमधील काही पक्ष्यांना यावर्षी नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येणार आहे, तर काही पक्ष्यांना प्रजनन क्रेंद्रामध्येच प्रजनन करण्याच्या अनुषंगाने ठेवण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी अनंत अंबानी आणि वनताराने केलेले अर्थसाहाय्य आणि तांत्रिक सहकार्यासाठी आम्ही त्यांचे आभारी असल्याचे 'एसीटीपी'च्या संस्थापक मार्टिन गुथ यांनी सांगितले आहे.
अग्रलेख
जरुर वाचा
कर्मवीर शाळेमध्ये आषाढी एकादशी निमित्त दिंडी सोहळा -व्याख्यान व वृक्षारोपण, भक्ती आणि पर्यावरणाचा संगम

कर्मवीर शाळेमध्ये आषाढी एकादशी निमित्त दिंडी सोहळा -व्याख्यान व वृक्षारोपण, भक्ती आणि पर्यावरणाचा संगम

आषाढी एकादशीचे पावन औचित्य साधून सणाच्या पूर्वसंध्येला रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील व एस.पी. जुनिअर कॉलेज, जुचंद्र या विद्यालयात शनिवार दि. ५ जुलै २०२५ रोजी विविध धार्मिक व पर्यावरणपूरक उपक्रमांचे भव्य आयोजन करण्यात आले होते. यासाठी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष पुरुषोत्तम पाटील यांचे उत्तम मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाची सुरुवात पारंपरिक दिंडी सोहळ्याने झाली. विद्यार्थ्यांनी वारकरी वेशात सजून टाळ, मृदुंगाच्या गजरात "माऊली माऊली", "ज्ञानोबा- तुकाराम" अशा गजरात शिस्तबद्ध रितीने दिंडी काढली. ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121