विदर्भातील आठ रेल्वे मार्गिंकावर वन्यजीवांसाठी 'या' उपाययोजना राबवा - WII चा अहवाल

    03-Jul-2025
Total Views | 15
vidarbha railway network
छाया - नाजीश अली



मुंबई (अक्षय मांडवकर) - राज्यातील वनक्षेत्र आणि व्याघ्र भ्रमणमार्गामधून जाणाऱ्या आठ रेल्वे मार्गिकांवर वन्यजीवांच्या सुककर हालचालीच्या दृष्टीने उपाययोजना राबविण्याची शिफारस 'भारतीय वन्यजीव संस्थान'ने (डब्लूआयआय) केली आहे (vidarbha railway network). केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांनी नुकत्याच प्रकाशित केलेल्या 'एलिफंट अँड अदर वाईल्डलाईफ ट्रेन काॅलिजन आॅन व्हर्नरेबल स्ट्रेटेचेस इन इंडिया' अहवालात या शिफारसी मांडण्यात आल्या आहेत (vidarbha railway network). विदर्भातील आठ रेल्वे मार्गिकांवर १२५ लेवर क्राॅसिंग, ५१ पुलांचा विस्तार, चार ठिकाणी कुंपन, नऊ ठिकाणी अंडरपास आणि एका ठिकाणी ओव्हरपास बांधण्याच्या शिफारसी देण्यात आल्या आहेत. (vidarbha railway network)


'प्रोजेक्ट एलिफंट'अंतर्गत 'एलिफंट अँड अदर वाईल्डलाईफ ट्रेन काॅलिजन आॅन व्हर्नरेबल स्ट्रेटेचेस इन इंडिया' हा अहवाल तयार करण्यात आला आहे. यासाठी 'डब्लूआयआय'च्या शास्त्रज्ञांनी वन विभाग आणि रेल्वेच्या अधिकाऱ्यांसोबत १४ राज्यांमधील वनक्षेत्र आणि व्याघ्र व हत्ती भ्रमणमार्गामधून जाणाऱ्या १२७ रेल्वे मार्गिकांचे सर्वेक्षण केले. त्यामधील ७७ रेल्वेमार्गिकांवर वन्यजीवांच्या सुककर हालचालीच्या दृष्टीने पायाभूत उपाययोजना राबविण्याची गरज त्यांना जाणवली. महाराष्ट्रात हा अभ्यास प्रामुख्याने व्याघ्र अधिवासाच्या दृष्टीने झाला. राज्यात मोठ्या क्षेत्रावर रेल्वेचे जाळे पसरलेले असून यामधील काही रेल्वे मार्गिका या वन्यजीवांचे अधिवास क्षेत्र असणाऱ्या वा व्याघ्र भ्रमणमार्गामधून जातात. 'डब्लूआयआय'ने अहवालाकरिता वाघांचा अधिवास आणि भ्रमणमार्गामधून जाणाऱ्या प्रामुख्याने १२ रेल्वे मार्गिकांची ओळख पटवली. तपासणीअंती नऊ मार्गिकांवर ४ ते १९ डिसेंबर, २०२४ दरम्यान सर्वेक्षण पार पडले. त्यामधील आठ रेल्वे मार्गिकांवर उपाययोजना सुचविण्यात आल्या आहेत.
 
 
या आठ रेल्वे मार्गिकांमध्ये नागपूर-कटोल, नागपूर-बुट्टीबोरी-वर्धा, देव्हाडी-गोबरवाही, गोंदिया-वडसा, वडसा-नागभीड-मूल, मूल-चंद्रपूर आणि चंद्रपूर-राजुरा-कागजनगर यांचा समावेश आहे.
 
- नागपूर-कटोल ही मार्गिका बोर-पेंच व्याघ्र भ्रमणमार्गामधून जाते. याठिकाणी ७०० मीटर लांबीचे दोन लेवल क्राॅसिंग आणि दोन ठिकाणी ५ मीटरने पुलांचा विस्तार करण्याची शिफारस मांडण्यात आली आहे.
 
- नागपूर-बुट्टीबोरी-वर्धा या मार्गिकेवर चार रूळ असून तो बोर-उमरेंड कऱ्हांडला-ब्रम्हपुरी-ताडोबा या व्याघ्र भ्रमणमार्गाला छेदतो. याठिकाणी लेवर आणि रॅम्प क्राॅसिंगची शिफारस सुचविण्यात आली आहे.
 
- देव्हाडी-गोबरवाही ही मार्गिका पेंच-कान्हा-नवेगाव-नागझिरा व्याघ्र भ्रमणमार्गाला छेदते. याठिकाणी रेल्वे अपघातात वाघाचा मृत्यू झाल्याने आणि सर्वेक्षणादरम्यान संशोधकांना पदचिन्हा देखील आढळल्याने ५० मीटर लांबीचा आणि पाच मीटर उंचीचा अडंरपास, हाय क्रॉसिंग स्ट्रक्चर, लेवल क्राॅसिंग आणि कुंपन अशी शिफारस करण्यात आली आहे.
 
- गोंदिया-वडसा ही मार्गिका नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पामधून जाते. याठिकाणी रेल्वे अपघातात वाघांचा मृत्यू झाल्याने बाॅक्स कलवट, पुलांचा विस्तार आणि लेवल क्राॅसिंगची उपाययोजना सुचविण्यात आली आहे.
 
- वडसा-नागभीड-मूल ही मार्गिक नागभिड, ताडोबा, घोडझरी, नवेगावच्या व्याघ्र भ्रमणमार्गाला छेदत असल्याने लेवल क्रॉसिंग, पुलाचा विस्तार, कुंपन अशा शिफारसी सुचविण्यात आल्या आहेत.
 
- मूल-चंद्रपूर ही मार्गिका ताडोबा, कान्हरगाव व्याघ्र भ्रमणार्गाला छेदते. म्हणून याठिकाणी अंडरपास, पुलांचा विस्तार, लेवल क्राॅसिंग सूचविण्यात आल्या आहेत.
 
- चंद्रपूर-राजुरा-कागजनगर या मार्गिकेवर अंडरपास, ओव्हरपास, पुलांचा विस्तार आणि लेवल क्राॅसिंग सुचविण्यात आल्या आहेत.


गोंदिया-वडसा, वडसा-नागभीड-मूल आणि मूल-चंद्रपूर या रेल्वे मार्गिंकावर होणाऱ्या वन्यजीवांच्या हालचालीच्या आणि मृत्यूच्या नोंदी आम्ही करत आहोत. या मार्गिकांवर गेल्या वर्षभरात डझनभराहून अधिक वन्यजीवांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये तीन वाघांचा समावेश असून रानगवा, अस्वल, सांबर, चितळ या प्राण्यांचा देखील समावेश आहे. त्यामुळे याठिकाणी वन्यजीवांच्या सुककर हालचालीच्या दृष्टीने उपशमन उपाययोजना राबवणे आवश्यक आहे. - दिनेश खाटे, अध्यक्ष - हॅबिटॅट कॉन्झर्वेशन सोसायटी
'मुंबई तरुण भारत'चं व्हॉट्सअप चॅनल फॉलो करा!
अग्रलेख
जरुर वाचा
तृतीयपंथी नागरिकांना ओळखपत्र देण्यामध्ये महाराष्ट्र राज्य प्रथम क्रमांकावर

तृतीयपंथी नागरिकांना ओळखपत्र देण्यामध्ये महाराष्ट्र राज्य प्रथम क्रमांकावर

तृतीयपंथी नागरिकांना ओळखपत्र देण्यामध्ये महाराष्ट्र राज्य प्रथम क्रमांकावर आहे. तृतीयंपथीयांच्या हक्कांचे संरक्षण अधिनियम २०१९ मधील नियम २०२० अंतर्गत विभाग सहा आणि सात नुसार जिल्हास्तरीय समितीद्वारे तृतीयपंथीयांना त्यांचे ओळख प्रमाणपत्र, ओळखपत्र देण्यात येत आहे. तृतीयपंथी नागरिकांना ‘नॅशनल पोर्टल फॉर ट्रान्सजेंडर पर्सन’ या केंद्र शासनाच्या पोर्टलद्वारे तृतीयपंथी असल्याचे प्रमाणपत्र आणि ओळखपत्र उपलब्ध करून देण्याची योजना आहे. त्या अंतर्गत. आतापर्यंत राज्यातून ४,४११ ओळखपत्रे दिली आहेत. महाराष्ट्रानंतर दुसरा ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121