ब्रम्हपुत्रेच्या नावे पालीचे नामकरण; महाराष्ट्रातील संशोधकांकडून नव्या पालीचा शोध

    15-Jul-2025
Total Views | 5

gecko discovery from Assam


मुंबई (विशेष प्रतिनिधी) -
आसामधील ब्रम्हपुत्रा नदीच्या खोऱ्यातून पालीच्या नव्या प्रजातीचा शोध लावण्यात आला आहे (gecko discovery from Assam). ब्रम्हपुत्रा नदीवरुन या पालीचे नामकरण निम्यास्पिस ब्रम्हपुत्रा असे करण्यात आले आहे (gecko discovery from Assam). या पालीच्या संशोधनात महाराष्ट्रातील डाॅ. अमित सय्यद यांचा महत्त्वाचा सहभाग आहे. (gecko discovery from Assam)
 
 
संशोधकांना निम्यासपिस ब्रम्हपुत्रा ही आसाममधील उत्तर गुवाहाटी परिसरातील ब्रह्मपुत्रा नदीच्या खोऱ्यात आढळली. ब्रम्हपुत्री ही नदी पृथ्वीवरील सर्वात प्राचीन आणि सातत्याने वाहणाऱ्या नदी प्रणालींपैकी एक आहे. त्यामुळेच निम्यास्पिस ब्रम्हपुत्रा, असे करण्यात आले. ही नवीन प्रजात निम्यास्पिस पुदीयाना प्रजातीच्या समूहाशी संबंधित असून पूर्वी हा समूह केवळ श्रीलंकेत आढळत असल्याचे मानले जात होते. पुदीयाना गटातील ही केवळ दुसरी प्रजाती आहे, जी भारताच्या भूमीत आढळली आहे. हा शोध वाइल्ड लाईफ प्रोटेक्शन अँड रिसर्च सोसायटी व ब्रीदलाइफ बायोसायन्सेस फाउंडेशनचे प्रमुख डॉ. अमित सय्यद यांच्या नेतृत्वाखाली पार पडला.
 
 
लहानशा दिसणाऱ्या या पालीची लांबी फक्त ३०.८ ते ३५.७ मिमी आहे. ती जमिनीवर तसेच दगडावर राहणारी आणि दिवसा सक्रिय असणारी प्रजाती आहे. निम्यास्पिस पुदीयाना हा गट पालीच्या गेकोनीड कुटुंबातला आहे. या पाली सहसा दगडी भाग तसेच दाट जंगलांमध्ये आढळतात. याआधीपर्यंत या गटातील निम्यास्पिस पुदीयाना, निम्यास्पिस मोलिगोडाई आणि निम्यास्पिस मनोई या प्रजाती केवळ श्रीलंकेतच आढळल्याचे नोंदी आहेत. निम्यास्पिस ब्रम्हपुत्रा ही नवीन प्रजाती निम्यास्पिस आसामेंसीसशी समरूप वाटत होती. परंतु शास्त्रज्ञांनी तिचा बारकाईने अभ्यास करून तिची काही ठळक वैशिष्ठे शोधून काढली, त्याच बरोबर त्याचे DNA अभ्यासले व माइटोकॉन्ड्रियल ND2 जनुकावर आधारित विश्लेषण केले. यामध्ये ही नवीन पाल निम्यास्पिस आसामेंसीस पासून ७.३–७.५% आणि श्रीलंकेतील प्रजातींपासून २१.२–२४.८% इतका अनुवांशिक फरक आढळून आला, जो हिची स्वतंत्र प्रजाती म्हणून ओळख पटवतो. हा शोध उत्तरपूर्व भारतातील अद्याप अज्ञात असलेली जैवविविधता अधोरेखित करतो, असे डॉ. सय्यद यांनी सांगितले.
'मुंबई तरुण भारत'चं व्हॉट्सअप चॅनल फॉलो करा!
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121