तृतीयपंथी नागरिकांना ओळखपत्र देण्यामध्ये महाराष्ट्र राज्य प्रथम क्रमांकावर

    26-Jul-2025   
Total Views | 11

मुंबई :
तृतीयपंथी नागरिकांना ओळखपत्र देण्यामध्ये महाराष्ट्र राज्य प्रथम क्रमांकावर आहे. तृतीयंपथीयांच्या हक्कांचे संरक्षण अधिनियम २०१९ मधील नियम २०२० अंतर्गत विभाग सहा आणि सात नुसार जिल्हास्तरीय समितीद्वारे तृतीयपंथीयांना त्यांचे ओळख प्रमाणपत्र, ओळखपत्र देण्यात येत आहे. तृतीयपंथी नागरिकांना ‘नॅशनल पोर्टल फॉर ट्रान्सजेंडर पर्सन’ या केंद्र शासनाच्या पोर्टलद्वारे तृतीयपंथी असल्याचे प्रमाणपत्र आणि ओळखपत्र उपलब्ध करून देण्याची योजना आहे. त्या अंतर्गत. आतापर्यंत राज्यातून ४,४११ ओळखपत्रे दिली आहेत. महाराष्ट्रानंतर दुसरा क्रमांक कर्नाटक राज्याचा असून येथे ३५२८, त्यानंतर आंध्र प्रदेश २९०५, त्यानंतर ओडिशा २६६८ ओळखपत्र वितरीत करण्यात आली आहेत

ओळखपत्र कसे मिळते

जिल्ह्यातील पात्र तृतीयपंथीयांनी ‘नॅशनल पोर्टल फॉर ट्रान्सजेंडर पर्सन’ या पोर्टलला मध्ये ‘अप्लाय ऑनलाईन’ वर आपला युजर आयडी आणि पासवर्ड तयार करायचे. त्यामध्ये आपली सर्व माहिती भरावी. ऑनलाईन अर्जासोबत मानसोपचारतज्ज्ञांनी दिलेला अहवाल व आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडणे महत्वाचे आहे.

योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.
'मुंबई तरुण भारत'चं व्हॉट्सअप चॅनल फॉलो करा!
अग्रलेख
जरुर वाचा
घरफोडी, चोरीसह सुमारे १५ गुन्हे, कोण होता हत्या झालेला झुंडचा अभिनेता?

घरफोडी, चोरीसह सुमारे १५ गुन्हे, कोण होता हत्या झालेला झुंडचा अभिनेता?

प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या ‘झुंड’ चित्रपटात काम केलेल्या एका कलाकाराची निर्घृण हत्या झाली आहे. मंगळवारी मध्यरात्री ही हत्या झाली असून सध्या या प्रकरणाची बरीच चर्चा आहे. प्रियांशू छेत्री असं हत्या झालेल्या कलाकाराचं नाव आहे. झुंडमध्ये प्रियांशू उर्फ बाबूने लहानशी भूमिका साकारली होती. या चित्रपटासाठी नागराजने तळागाळातील कलाकारांची निवड केली होती. त्यातीलच एक प्रियांशू होता. त्याने अमिताभ बच्चनसोबतही भूमिका साकारली होती. तो फूटबॉल पटू देखील होता पण कायमच तो गुन्हेगारीमुळे क्षेत्रात वावरत होता. ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121