घरफोडी, चोरीसह सुमारे १५ गुन्हे, कोण होता हत्या झालेला झुंडचा अभिनेता?

    09-Oct-2025
Total Views |


मुंबई : प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या ‘झुंड’ चित्रपटात काम केलेल्या एका कलाकाराची निर्घृण हत्या झाली आहे. मंगळवारी मध्यरात्री ही हत्या झाली असून सध्या या प्रकरणाची बरीच चर्चा आहे. प्रियांशू छेत्री असं हत्या झालेल्या कलाकाराचं नाव आहे. झुंडमध्ये प्रियांशू उर्फ बाबूने लहानशी भूमिका साकारली होती. या चित्रपटासाठी नागराजने तळागाळातील कलाकारांची निवड केली होती. त्यातीलच एक प्रियांशू होता. त्याने अमिताभ बच्चनसोबतही भूमिका साकारली होती. तो फूटबॉल पटू देखील होता पण कायमच तो गुन्हेगारीमुळे क्षेत्रात वावरत होता. आणि त्यामुळेच त्याचा खून झाला आहे.

दरम्यान, प्रियांशूचा मित्र ध्रुव साहू यानेच त्याची हत्या केल्याचं समोर आलं आहे. त्याचे हातपाय दोरीने बांधून त्याचा निर्घृण खून केला आहे. चित्रपटातील एका कलाकाराची अशाप्रकारे झालेल्या हत्येमुळे अनेकांना याचा धक्का बसला आहे. पण मृत प्रियांशू हा देखील गुन्हेगारच राहीलेला आहे. दिग्गज कलाकारांसह काम केल्यानंतरही तो गुन्हेगारीपासून दूर राहीला नाही. चित्रपटात झळकल्यानंतरही त्याला एका प्रकरणात अटक झाली होती. अनेक गुन्हेगारी प्रवृत्तीच्या तरुणांसोबत त्याचा वावर होता. आणि त्यामुळेच प्रियांशूचा घात झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रियांशू छेत्री हा सराईत गुन्हेगार होता. त्याच्यावर एक दोन नव्हे तर तब्बल १५ गुन्हे दाखल आहेत. घरफोडी आणि चोरीसह सुमारे १५ गुन्हे दाखल आहेत. ज्याने प्रियांशूची हत्या केली, तो ध्रुव साहू देखील सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर पाच गुन्हे दाखल आहेत.

नागपूरच्या जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नारा परिसरातील गंगोत्री लॉनजवळ ध्रुव साहूने नावाच्या मित्राने प्रियांशूची हत्या केली आहे. प्रियांशू हा काही दिवसांपूर्वीच नारा रोड परिसरात राहायला आला होता. याच परिसरात आरोपी देखील राहत होता. दोघांमध्ये चांगली मैत्री होती. नारा रोड परिसरात यायच्या आधी प्रियांशू लुंबिनी नगरमध्ये त्याच्या कुटुंबासह राहत होता.

बाबू हा घरफोडी व चोरीसह रेल्वेतून कोळसाही चोरी करायचा. झुंड चित्रपटासाठी दिग्दर्शक मंजुळे हे कलाकरांचा शोध घेत गड्डीगोदाम परिसरात आले. यावेळी बाबू हा रेल्वेतून कोळसा काढत होता. मंजुळे यांना तो दिसला. चित्रपटातील छत्रीच्या भूमिकेसाठी मंजुळे यांनी त्याची निवड केली. त्यानंतर तो प्रसिद्ध झाला होता. मृत प्रियांशू हा फक्त २१ वर्षांचा होता.