मुंबई (विशेष प्रतिनिधी) - रत्नागिरी जिल्ह्यातील गवाणे गावात तारेच्या फासकीत अडकलेल्या बिबट्याची गुरुवार दि. ३ जुलै रोजी रत्नागिरी वन विभागाने सुखरुप सुटका केली (wire snare). फासकीत अडकून बिबट्यांच्या बचावाचा घटना रत्नागिरी जिल्ह्यात सातत्याने घडत असतात (wire snare). त्यामुळे तारेच्या फासकीबाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करणे आवश्यक आहे. (wire snare)
कोकणातील बागांमध्ये स्थानिक शेतकऱ्यांमध्ये तारेचे कुंपण लावले जाते. काही वेळा तारेची फासकी देखील लावली जाते. ही फासकी काहीवेळी रानडुक्करांच्या शिकारीच्या उद्देशाने लावण्यात येते. अशा फासकीत बऱ्याचवेळा बिबटे अडकतात. प्रसंगी त्यांचा मृत्यू देखील होतो. रत्नागिरी जिल्ह्यात या घटना वारंवार घडत असतात. गुरुवारी सकाळी लांजा तालुक्यामधील गवाणे गावातील गणू बाबू करंबळे यांच्या काजूच्या बागेत तारेच्या फासकीत अडकलेला बिबट्या आढळून आला. याबाबतची माहिती वन विभागाला कळताच कर्मचाऱ्यांनी जागेवर जाऊन पाहणी केली. अडकलेला बिबट्याला लोखंडी पिंजऱ्यामध्ये सुरक्षित घेण्यात आले. त्यानंतर त्याची पशुवैद्यकीय अधिकारी लांजा यांचेकडून तपासणी करून घेण्यात आली. तो नर होता आणि त्याचे अंदाजे वय दोन वर्षांचे होते. तो सुस्थितीत असल्याची खात्री करून त्यास नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात आले.