सूर्याभ्यासासाठी असणाऱ्या सात पेलोडबद्दल, वाचा सविस्तर
02-Sep-2023
Total Views |
मुंबई : भारतासह इतर देशांचे लक्ष लागलेल्या 'आदित्य एल १' मोहिमेचे यशस्वी प्रक्षेपण पीएसएलव्ही-एक्सएल रॉकेटच्या माध्यमातून आज सकाळी ११ वाजून ५० मिनिटांनी श्रीहरिकोटाच्या सतीश धवन अवकाश तळावरून झाले आहे. सूर्याचे निरीक्षण आणि अभ्यास करण्यासाठी आदित्य हा उपग्रह, पृथ्वी आणि सूर्याच्या मध्ये असणाऱ्या एका लँग्रेज पॉइंटवर ठेवण्यात येईल. सूर्याच्या अभ्यासासाठी इस्रोने आदित्य एल १ या यानात सात वेगवेगळी उपकरणे बसवली आहेत.
या सात उपकरणांबद्दल सविस्तर जाणून घेऊया :
व्हिजिबल इमिशन लाईन कोरोनाग्राफ (VELC) हे उपकरण सूर्याच्या प्रभावळीचा अभ्यास करणार आहे. हे उपकरण इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ॲस्ट्रोफिजिक्स, बेंगळुरू येथे तयार केले आहे.
सोलर अल्ट्राव्हायलेट इमेजिंग टेलिस्कोप (SUIT) हे सूर्याच्या अल्ट्राव्हायलेट किरणांचा अभ्यास हे उपकरण करेल. सूर्याचे फोटोस्फेअर आणि क्रोमोस्फेअरचे फोटो घेण्यासाठी देखील याची मदत होईल. हे उपकरण इंटर युनिव्हर्सिटी सेंटर फॉर ॲस्ट्रॉनॉमी अँड ॲस्ट्रोफिजिक्स, पुणे यांनी तयार केले आहे.
हाय एनर्जी एल १ ऑर्बिटिंग एक्स-रे स्पेक्ट्रोमीटर (HEL1OS) आणि सोलर लो एनर्जी एक्स-रे स्पेक्ट्रोमीटर (SoLEXS) हि उपकरणे सूर्यातून येणाऱ्या हार्ड एक्स-रे किरणांचा अभ्यास करणार आहेत. हि दोन्ही उपकरणे बेंगळुरूच्या यु. आर. राव सॅटेलाइट सेंटरमध्ये तयार केले आहेत.
प्लाज्मा अॅनलायझर पॅकेज फॉर आदित्य (PAPA) आणि आदित्य सोलार विंड पार्टीकल एक्सपिरीमेंट (ASPEX) हि उपकरणे सूर्यावरील गरम हवेमध्ये असणारे इलेक्ट्रॉन्स आणि जड आयन्सच्या दिशांचा अभ्यास करतील. सूर्यावरील हवेत, वादळांमध्ये किती तापमान आणि हीट असते याची माहिती यामधून मिळेल. PAPA हे उपकरण स्पेस फिजिक्स लॅबोरेटरी, विक्रम साराभाई स्पेस सेंटर, तिरुवनंतपुरम येथे तयार केले आहे. तर ASPEX हे उपकरण फिजीकल रिसर्च लॅबोरेटरी, अहमदाबाद येथे तयार केले आहे.
मॅगनेटॉमीटर हे उपकरणं देखील 'आदित्य' उपग्रहात असणार आहेत. सूर्याच्या चुंबकीय क्षेत्राचा अभ्यास करण्यासाठी या उपकरणाचा वापर केला जाईल. हे उपकरण इलेक्ट्रो ऑप्टिक्स सिस्टम्सची प्रयोगशाळा, बेंगळुरू येथे तयार केले आहे.
अशाप्रकारे ही सर्व उपकरणे भारतामध्ये आणि भारताच्या वैज्ञानिकांनी तयार केली आहेत.