नवी दिल्ली : दरवर्षी करोडो लोक आपल्या प्रवासासाठी पहिले प्राधान्य रेल्वेला देतात. लांबच्या प्रवासात रेल्वेकडून पुरवले जाणारे जेवण किंवा रेल्वेस्थानकावर मिळणारे पदार्थं हे प्रत्येकाच्या कामी येतात. आता आयआरसीटीसी अर्थांत भारतीय रेल्वे मंत्रालयाने नवं ‘मेन्यू कार्ड’ जाहीर केल आहे. रेल्वे प्रवासात कोणतीही लुट होऊ नये यासाठी आयआरसीटीसीने जेवणाचे दर ठरवले आहेत.
आयआरसीटीसीने आपल्या अधिकृत सोशल मीडीया अकाउंटवर पोस्ट करत नव्या मेन्यू कार्डचे रेट जाहीर केले आहेत. ज्यात शाकाहारी जेवणाची किंमत - ८० रुपये यात भात, डाळ, सांबार, दही, ४ रोट्या किंवा २ पराठे, भाजी आणि लोणचे अश्या गोष्टींचा समावेश असेल.
आयआरसीटीसीने प्रवाशांना असे आवाहन केले आहे की, प्रवासात ठरलेल्या रेट कार्डपेक्षा कोणीताही व्यक्ती जर तुमच्याकडून जास्त पैसे घेत असेल किंवा जेवणातील कोणताही पदार्थं कमी असेल तर त्याची तत्काळ तक्रार रेल्वेप्रशासन किंवा रेल्वे हेल्पलाइन क्रमांक १३९ वर किंवा Rail Madad अॅपवर करावी. संबधितावर रेल्वे प्रशासनाकडून कारवाई करण्यात येईल.