प्राडा विरोधात याचिका दाखल

    04-Jul-2025   
Total Views |

कोल्हापूर: प्राडा’ने त्यांच्या फॅशन शोमध्ये कोल्हापुरी चप्पल हे लेदर सँडल या नावाने प्रसिद्ध केले होते. भारतीय सांस्कृतिकतेवर हा अन्याय असल्याची भावना लोकांमध्ये होती. प्राडाविरोधात कठोर कारवाई करावी अशी मागणी समाजाने केली होती. आता बौद्धिक संपदा हक्कांचे वकील गणेश एस. हिंगेमिरे यांनी २ जुलै रोजी प्राडा विरोधात याचिका दाखल केली आहे. प्राडाने जाहीर माफी मागावी, अशी मागणीही यात करण्यात आली आहे.

या याचिकेमध्ये भारतीय पारंपरिक डिझाईन्सचे संरक्षण करण्यासाठी सरकारने योग्य निर्देश द्यावेत.प्राडाने जीआय-टॅग असलेल्या उत्पादनाचे हे उल्लंघन केले आहे. आंतरराष्ट्रीय कंपन्यांना अशा जीआय उत्पादनांचे उल्लंघन करण्यापासून रोखण्याची मागणी करण्यात आली आहे. ही याचिका भारतीय कारागिरांच्या हक्कासाठी महत्त्वाची आहे.



योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.