त्रिनिदादच्या पंतप्रधानांचे भारताशी नाते, मोदींकडून 'बिहार की बेटी' म्हणत कौतूक!

    04-Jul-2025
Total Views |
 
Prime Minister of Trinidad
 
पोर्ट ऑफ स्पेन : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या त्यांच्या पाच देशांच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यातील दुसऱ्या टप्प्यात ते त्रिनिदाद आणि टोबॅगो देशात पोहचले आहेत. त्रिनिदाद आणि टोबॅगो येथील भारतीय समुदायाशी मोदींनी भारत आणि त्रिनिदादच्या चांगल्या संबंधांवर मोकळेपणाने संवाद साधला.
 
यावेळी त्यांनी आपल्या भाषणात त्रिनिदादच्या भगवान राम मंदिर, महाकुंभ आणि तेथील प्रसिद्ध असेलेल्या रामलीलाचा उल्लेख केला. त्रिनिदादच्या पंतप्रधान असलेल्या कमला प्रसाद-बिस्सेसर यांना मोदींनी भारत के 'बिहार की बेटी' असे संबोधून त्यांच्या भारतीय वंशाबद्दल कौतुक केले.
 
कोण आहेत कमला प्रसाद-बिस्सेसर ?
 
भारतीय वंशाच्या असलेल्या ७३ वर्षीय कमला प्रसाद-बिस्सेसर या त्रिनिदाद आणि टोबॅगोच्या युनायटेड नॅशनल काँग्रेस पक्षाच्या सध्याच्या पंतप्रधान आहेत. २८ एप्रिल २०२५ रोजी तेथे झालेल्या निवडणूकांमध्ये कमला यांच्या नेतृत्वात युनायटेड नॅशनल काँग्रेस मोठा विजय मिळवला होता. २०१० ते २०१५ पर्यंत त्या त्रिनिदाद आणि टोबॅगो देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान राहिल्या होत्या.
 
असे आहे पंतप्रधानांचे भारत कनेक्शन
 
पंतप्रधान कमला प्रसाद-बिस्सेसर यांचे मुळ हे बिहारचे आहे. त्यांचे पूर्वज बिहारच्या बक्सर येथील भेलुपूरचे गावचे रहिवासी होते. १८८९ च्या भारतातील ब्रिटिश राजवटीत त्यांचे पणजोबा त्रिनिदाद येथे एक करारबद्ध कामगार म्हणून आले होते. २०१२ मध्ये पंतप्रधान कमला यांनी मूळ गाव असलेल्या भेलुपूरला भेट दिली होती, त्यांनी गावाला आर्थिक मदतसुद्धा केली होती. यावेळी गावात त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले होते.
 
मोदींकडून 'बिहार की बेटी' बोलत कौतुक!
 
पंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणात कमला प्रसाद-बिस्सेसर यांच्या भारतीय वंशावरून 'बिहार की बेटी' बोलत कौतुक केले. ते पुढे म्हणाले, "त्रिनिदाद आणि टोबॅगोच्या पंतप्रधान कमला प्रसाद-बिस्सेसर यांचे पूर्वज बिहारच्या बक्सरचे रहिवासी होते. कमला यांनी स्वतः गावाला भेट दिली आहे, मला माहीत आहे तेथील लोक तुम्हाला बिहारची कन्या मानतात." असे मोदी म्हणाले.