औषधी गुणधर्म असलेले पदार्थ ज्यावेळी पाण्यात मिसळले जातात, तेव्हा पाण्याचा स्वत:चा गुणधर्म बदलतो. होमियोपॅथीच्या औषध निर्माण शास्त्रात सांगितल्याप्रमाणे औषध बनविण्याची प्रक्रिया ही औषधाच्या रसायनाला जोरदारपणे हलवून व पद्धतशीर धक्के, स्ट्रोक देऊन ते रसायन हलवले जाते. ज्यावेळी हे रसायन जोरात हलवले जाते, त्यावेळी त्या रसायनात तयार होणारे सूक्ष्म तरंग, सूक्ष्म बुडबुडे हे एकमेकांवर आदळून फुटतात व या प्रक्रियेमध्ये ऊर्जा बाहेर पडते व स्वाभाविकपणे त्या रसायनाचे अंतर्गत तापमान हे वाढलेले असते आणि त्यामुळे या रसायनातील दाबही वाढलेला असतो.
केमिस्ट व फिसिसीस्टने केलेल्या अनेक प्रयोगांमध्ये असे अनुमान निघाले की, ज्या पाण्यात होमियोपॅथीची औषधे घालून ती तयार करण्याची प्रक्रिया होते, त्यातून मोठ्या प्रमाणावर ऊर्जा व उष्णता बाहेर पडत असते.
आता अशा मुद्द्यावर नेहमी वाद तयार होतात की, औषध बनविण्याच्या व डायल्यूशनच्या या प्रक्रियेमध्ये एका विशिष्ट प्रक्रियेनंतर व डायल्यूशननंतर मूळ औषधी पदार्थाचे अस्तित्व दिसत नाही. (Elia & Niccoli १९९९, Elia, et al २00४, Rey २00३) परंतु प्रयोगाअंती असे लक्षात आले की, या डायल्यूशनच्या प्रक्रियेनंतर त्या पाण्याचे गुणधर्म मात्र पूर्णपणे वेगळे असल्याचे दिसून आले. म्हणजेच काय तर त्या पाण्याने संपूर्ण औषधी गुणधर्म त्याच्यामध्ये सामावून घेतले. याच प्रक्रियेला होमियोपॅथीवर ’drug dynamisation’ असे म्हणतात. याच ’drug dynamisation’ मध्ये औषधाचे औषधी गुणधर्म वाढवले जातात. डायल्यूशन पद्धतीमुळे अणूमधील घर्षणामुळे अणुशक्ती वाढते व ती ऊर्जा व त्या रसायनातील प्रत्येक कणात सामावलेली असते.
होमियोपॅथीच्या औषधांमध्ये नॅनोपार्टिकल्स असतात व त्याच्या औषधी गुणधर्मामुळेच त्या रसायनाचे गुणधर्म बदलतात. हे सिद्ध करण्यासाठी अजूनही काही प्रयोग केले गेले. त्या प्रयोगामध्ये खनिजांचा अभ्यास केला गेला. त्यात वेगवेगळ्या प्रकारचा तीन ‘स्पेक्ट्रोस्कोपी’ वापरल्या गेल्या. त्यात असे अनुमान निघाले की, मूळ औषधाचे गुणधर्म हे औषध ठेवलेल्या रसायनात दिसून येतात. हा प्रयोग व शोधनिबंधfamed scientific journal, langmuir मध्ये छापला गेला व ‘अमेरिकन केमिस्ट्री सोसायटी’ने तो प्रकाशित केला (chikramane, kalita, suresh, et al २0१२).
या सर्व प्रयोगाच्या अंती आपल्याला हे लक्षात येईल की, होमियोपॅथीच्या औषधांची ऊर्जा ही आण्विक ऊर्जेशी तादात्म्यता व साधर्म्यता दर्शवते. एखाद्या अणूमध्ये जशी प्रचंड अशी ऊर्जा सामावलेली असते, त्याचप्रमाणे एखाद्या होमियोपॅथीच्या औषधामध्येसुद्धा ’drug dynamisation’च्या प्रक्रियेमुळे मोठ्या प्रमाणावर ऊर्जा सामावलेली असते व होमियोपॅथीच्याच नव्हे, तर नैसर्गिक सूत्राच्या नियमानुसार ऊर्जेमधील कमतरता ही दुसर्या ऊर्जेनेच भरुन काढता येते. याबद्दल आपण पुढे माहिती पाहूया. (क्रमश:)
(लेखक एमडी होमियोपॅथी आहेत.)
९८६९0६२२७६