रिलिफ रुग्णालय

    01-Jul-2025
Total Views | 9

On the occasion of today 
 
पालघरमध्ये रिलिफ रुग्णालयासारखे अत्याधुनिक रुग्णालय उभारून समाजसेवेचा दीप प्रज्वलित करणारे डॉ. विशाल कोडगीरकर हे वैद्यकीय व्यवसायात एक प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व. कौटुंबिक वारसा म्हणून लाभलेली रुग्णसेवेची मूल्ये त्यांनी केवळ जपली नाहीत, तर ती विस्तारलीही. रिलिफ रुग्णालय हे केवळ उपचाराचे स्थान नाही, तर उमेद, विश्वास यांचे केंद्र आहे. अशा या प्रेरणादायी वाटचालीबद्दल आणि आरोग्य क्षेत्रातील त्यांच्या दृष्टिकोनाबद्दल आजच्या ‘डॉक्टर्स दिना’निमित्त डॉ. विशाल कोडगीरकर यांची ही खास मुलाखत...
 
आपला वैद्यकीय प्रवास आणि खास करून ऑर्थोपेडिक क्षेत्रात येण्यामागची प्रेरणा काय होती?
 
माझा जन्म मुळातच परभणीचा. माझे बारावीपर्यंतचे शिक्षण परभणीतच झाले. बारावीमध्ये महाराष्ट्रात विज्ञान शाखेमध्ये 15वा आलो. बारावीनंतर ‘एमबीबीएस’चे शिक्षण घेण्यासाठी ‘लोकमान्य टिळक म्युनसिपल जनरल हॉस्पिटल’ अर्थात सायन हॉस्पिटल इथे ‘एमबीबीएस’साठी प्रवेश घेतला. आमच्या घरामध्ये आमचे मोठे चुलत बंधू हे बालरोगतज्ज्ञ असून, माझ्यासाठी तेच आदर्शही आहेत. त्यामुळेच मी सायन हॉस्पिटलमध्ये बालशस्त्रक्रिया विभागातच रुजू झालो. पण, या क्षेत्रात मला भावनिक अडचणींचा सामना करावा लागला. त्यामुळे लहानपणापासून आवड असलेल्या ‘फॉरेन्सिक सायन्स’कडे मी वळलो. सायन हॉस्पिटलच्या फॉरेन्सिक विभागात 248 शवविच्छेदन मी केले आहेत. आईच्या सल्ल्याने ‘फॉरेन्सिक सायन्स’मधून निघून ‘ऑर्थोपेडिक सर्जरी’कडे वळलो. माझे ऑर्थोपेडिक शिक्षण संपूर्णानंद वैद्यकीय महाविद्यालय अर्थात एसएनएमसी, जोधपूर येथे झाले. 2015 मध्ये माझे मास्टर्सचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर, पुढील अनुभवासाठी मी ब्रीचकँडी (इीशरलह उरपवू) हॉस्पिटलमध्येही भारतातील 21 नामवंत सर्जनबरोबर काम केले. त्यानंतर स्थायिक होण्याचा विचार केला. पण, मला बोईसरच्या अणु संशोधन केंद्राच्या रुग्णालयात (टॅप्स) ऑर्थोपेडिक तज्ज्ञ म्हणून कामाची संधी मिळाली आणि 2016 मध्ये मी माझी स्वतःची ओपीडी सुरू केली. मात्र, पालघर भागात फारशा वैद्यकीय सोयी उपलब्ध नसल्याने रुग्णांना त्रास सहन करावा लागायचा. त्यामुळेच मी मल्टीस्पेशालिटी रुग्णालय सुरू करण्याचा निर्णय घेतला. रिलिफ रुग्णालय स्थापनेत आणि त्याच्या व्यवस्थापनामध्ये माझे मोठे बंधू, माझी पत्नी आणि इतर कुटुंबीय यांची फार मदत झाली व आजही ते रुग्णालयात विविध जबाबदार्‍या सांभाळत आहेत. आम्ही पालघरमधील चाररस्ता येथे 2021 मध्ये 50 खाटांचे रिलिफ मल्टीस्पेशलिटी रुग्णालय सुरू केले. 2023 मध्ये बोईसरमध्येही याची दुसरी शाखा सुरू झाली.
 
रिलिफ रुग्णालयात ऑर्थोपेडिक बरोबरच अन्य कोणत्या वैद्यकीय सुविधा उपलब्ध आहेत?
 
आमच्या रुग्णालयात जनरल मेडिसीन, ऑर्थोपेडिक, जनरल सर्जरी आणि मूत्ररोग विभाग, प्लास्टिक सर्जरी, गेसट्रोलॉजी, न्यूरोलॉजी, ऑन्कोलॉजी, मॅक्सिलो फेशिअल सर्जरी, ईएनटी, मनोरुग्ण विभाग, स्पाईन सर्जरी हे विभाग आहेत. तसेच आमच्याकडे पूर्णवेळ क्रिटिकल केअर मेडिसिन डॉक्टरही आहेत. आमच्याकडे येणार्‍या प्रत्येक रुग्णाची आम्ही आनंदाने सुश्रुषा करतो. त्यासाठी आम्ही रुग्णालयातील कर्मचार्‍यांना प्रशिक्षण दिले आहे. आमच्या रुग्णालयात दिवसाची सुरुवात गणरायाची आरती, रुग्णालयाच्या प्रेरणागीताने होते. त्यामुळे रुग्णालयाचे वातावरण सकारात्मक राहते. रुग्ण सुश्रुषा यामध्ये विश्वास महत्त्चाचा असतो, आम्ही तो जपतो. आज पालघर येथील रिलिफ रुग्णालयाच्या बाजूलाच ‘ग्रीन डायग्नोस्टिक्स’ असून, तिथे 32 स्लाईसचा सीटी स्कॅनर उपलब्ध आहे. यामुळे रोगाचे निदान जलद आणि अचूक होण्यास मदत होते. सुरत ते बोरिवली या भागामध्ये कोणाकडेही नसलेली अद्ययावत एमआरआय मशीनही तिथे आहे. सध्या कॅथलॅब मशीनचे काम तिथे सुरू आहे. आमच्या दृष्टीने सर्वाधिक महत्त्व आहे, ते माणुसकी जपण्याचे. आमच्याकडे येणारे रुग्ण समान आर्थिक स्थितीतून येत नाहीत. यासाठीच आमच्याकडे समुपदेशक (कौन्सिलर) असून रुग्णांचे नातेवाईक त्यांची अडचण मोकळेपणाने सांगतात. त्यानुसार सवलतीही आम्ही रुग्णांना देतो.
 
अलीकडे आपल्या रुग्णालयामध्ये घडलेला एखादा यशस्वी रुग्णसुश्रुषेचा अनुभव आमच्या वाचकांना सांगाल का?
 
संदीप गावित नामक एका रुग्णाचा अपघात झाला. एक महिला त्यांना घेऊन रात्री रुग्णालयात आल्या. संदीप अत्यवस्थ अवस्थेत असल्याने, आम्ही तत्काळ उपचाराची तयारी केली. माझ्या बंधूंनी पोलिसांना माहिती दिली आणि उपचाराची परवानगी घेतली. व्हेंटिलेटरची गरज लागणार होतीच. आमच्याकडे रुग्णाच्या नातेवाईकांची कोणतीही माहिती नव्हती. पण, आम्ही पैशांचा विचार केला नाही, उपचार सुरू केले. नंतर आम्ही रुग्णाची माहिती मिळवली. त्याची बहीण आली. पाच दिवस रुग्ण कोमामध्ये होता. दहाव्या दिवशी हसत आपल्या घरी गेला. त्यांनाही आम्ही खर्चाबाबत सर्वतोपरि मदत करण्याचा विश्वास दिला होता आणि तो जिंकलाही.
 
स्वतःची काळजी घेणे म्हणजे गुडघ्यांची आणि मणक्याची काळजी घेणे, या संकल्पनेविषयी काय सांगाल?
 
आरोग्य म्हणजे उत्तम मानसिक आणि शारीरिक स्थिती होय. आजचे जग समाजमाध्यमे आणि मोबाईल यांमध्येच अडकले आहे. लोकांना यात बदल करण्याची इच्छा आहे. मात्र, ते होत नाहीत. दिनचर्या आणि आहार चुकल्यानेच आरोग्याच्या समस्या उद्भवतात. आराम, आहार आणि व्यायाम ही त्रिसूत्री आरोग्याची गुरुकिल्ली आहे. मात्र, लोक नेमके तेच करत नाहीत. आहारामध्ये कर्बोदके, प्रथिने, जीवनसत्वे यांचा समावेश असणे आवश्यक असते, याची काळजी कोणीच घेत नाही. आज तरुणांमध्ये मानेचे दुखणे, कंबरदुखी आणि गुडघेदुखी यांचे रुग्ण वाढत आहेत. मानसिक त्रासही सुरू झाले आहेत. वेळेवर खाणे आणि वेळेवर झोपणे ही दिनचर्या अवलंबल्यास निश्चित निरोगी आयुष्य जगता येते. अनेकांनी आज याचा अनुभव घेतला आहे.
 
आपल्या रुग्णालयामध्ये हॉस्पिटलायझेशन खर्च, विमा आणि कॅशलेस सेवा यासंबंधी कोणती मदत केली जाते?
 
आमच्या रुग्णालयात जवळपास सर्वच आरोग्यविमा स्वीकारले जातात. ‘आयुष्मान भारत योजने’चे ऑडिटही झाले असून लवकरच तीही योजना आपल्या रुग्णालयात सुरू होईल.
 
- कौस्तुभ वीरकर 
'मुंबई तरुण भारत'चं व्हॉट्सअप चॅनल फॉलो करा!
अग्रलेख
जरुर वाचा
जयंत पाटील यांनी राजीनामा दिला, की घेतला? - चर्चांना उधाण; शशिकांत शिंदे नवे प्रदेशाध्यक्ष, रोहित पवारांचे स्वप्न पुन्हा भंगले

जयंत पाटील यांनी राजीनामा दिला, की घेतला? - चर्चांना उधाण; शशिकांत शिंदे नवे प्रदेशाध्यक्ष, रोहित पवारांचे स्वप्न पुन्हा भंगले

स्थानिक स्वराज्य संस्थांचा बिगुल वाजला असताना, शरद पवारांनी अचानक प्रदेशाध्यक्ष बदलल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. ७ वर्षे एकहाती पक्ष सांभाळणाऱ्या जयंत पाटलांनी अचानक राजीनामा द्यावा आणि तो शरद पवारांनी स्वीकारावा, इतक्यापुरती ही घटना मर्यादीत नाही. त्यामुळे हा राजीनामा खरोखरच स्वेच्छेने दिला गेला की पक्षातील गटबाजीमुळे त्यांना हटवण्यात आले, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. दुसरीकडे, शशिकांत शिंदे यांच्या गळ्यात प्रदेशाध्यक्ष पदाची माळ पडली असली, तरी रोहित पवार आणि समर्थकांत भलती नाराजी पसरल्या..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121