योगोपचार-सांधेदुखी (लेखांक-४४)

    09-Jun-2025
Total Views | 5
joint pain Exercises

सांधे हे शरीराच्या रचनेत अतिशय महत्त्वाचे कार्य पार पाडतात. कल्पना करा की, बांबूंचे (वेळूचे) बांधकाम दोरीने एकमेकांना बांधून एखादी झोपडी तयार केली आहे. त्यातील एखादा सांधा सुटला, तर इतर सर्व सांध्यांवर परिणाम होतो. हेच सूत्र शरीरातील सांध्यांबाबतही लागू पडते.

म्हणूनच शरीरातील संपूर्ण सांध्यांचा विचार करून योगोपचार पद्धती निश्चित केली जाते. तरीही शरीराच्या विभागानुसार व सांध्यांच्या रचनेनुसार आपण वेगवेगळ्या सांध्यांवरील योगोपचारांचा क्रमशः अभ्यास करणार आहोत.

१. मान, खांदे, मनगट आणि कोपर यांसाठी योगोपचार


मानेसाठी योगोपचार


१) ब्रह्म मुद्रा :


कृती :
१. वज्रासनात बसून किंवा उभे राहून दोन्ही हात पाठीमागे बांधा आणि कोपर एकमेकांकडे दाबण्याचा प्रयत्न करा.
२. डोळे बंद करून भरपूर श्वास घेत मान खाली झुकवा, हनुवटी छातीवर दाबा आणि श्वासोच्छ्वास चालू ठेवा.
३. हळूवार मान डाव्या खांद्याकडे वळवा, डावे कानाचे खालचे टोक खांद्याच्या पृष्ठभागाला लावण्याचा प्रयत्न करा व ताण अनुभवा.
४. मान पुढून फिरवत उजव्या खांद्यावर आणा आणि त्याचप्रमाणे डाव्या खांद्यावर. अशी तीन अर्धवर्तुळे पूर्ण करा.
५. नंतर हीच कृती उजव्या बाजूने सुरू करून पुन्हा डावीकडे आणा.
६. लक्षात ठेवा, आध्यात्मिक संकल्पनेनुसार आपले शरीर हे एक पिंड आहे. त्यामुळे मान गोलाकार नाही, तर पिंगाकृती फिरवायची आहे.

२) डोयासाठी ट्रॅशन (हाताने) :

कृती :
१. दोन्ही हातांची बोटं एकमेकांत अडकवून डोके मागून पकडा.
२. भरपूर श्वास घ्या, श्वास रोखून हातांनी डोके पुढे दाबा.
३. श्वास सोडताना डोयाने हात मागे दाबा. कोपर सरळ रेषेत आणा.
४. ही कृती तीन वेळा करा.

मनगटासाठी


हात समोर पसरवा. अंगठा आत ठेवून मुठी बांधा. अनघ मुद्रा लावा. मनगट उलटसुलट, वर-खाली तीन तीन वेळा हळूवार फिरवा. अनघ मुद्रा ही मेंदूच्या पेशींवर परिणाम करते.


कोपरांसाठी


हात सरळ पुढे पसरवा. कोपरात वाकवून बोटं खांद्यावर आणा. परत सरळ करा. ही कृती सहा वेळा करा.
खांद्यांसाठी

१) पंखासन:


कृती:
१. उभे राहून किंवा वज्रासनात बसून हात समोर पसरवा.
२. श्वास घेत हात खांद्याच्या सरळ रेषेत बाजूने पसरवा.
३. तळहात मागच्या दिशेने फिरवून श्वास रोखून खांदे सात वेळा मागे दाबून सोडा.
४. ही कृती तीन वेळा करा.


२) अर्ध उष्ट्रासन:

कृती:
१. नरम आसनावर गुडघ्यांवर उभे राहा. डावा हात वर करून पाठीमागे नेऊन डाव्या टाचेवर ठेवा.
२. डावा तळहात डाव्या पायावर ठेवा. उजवा हात वर करून मागे रेटा, मान आणि पाठ मागे झुकवा, कंबर पुढे खेचा.
३. डोळे बंद करून ताण अनुभवून तोल सांभाळा.
४. हीच कृती उजव्या हाताने करा.


३) प्लँस (झश्ररपज्ञी):

कृती:
१. पोटावर झोपून कोपर छातीजवळ ठेवा.
२. पाय बोटांवर उभे करा.
३. कोपरावर वजन देऊन शरीर वर उचला. डोयापासून पायापर्यंत शरीर सरळ रेषेत ठेवा.
४. ताण अनुभवा. नंतर खाली येऊन पुन्हा ही कृती तीन ते पाच वेळा करा.

(क्रमशः)
डॉ. गजानन जोग
(लेखक योगोपचारतज्ज्ञ व समुपदेशक आहेत.)
९७३००१४६६५
'मुंबई तरुण भारत'चं व्हॉट्सअप चॅनल फॉलो करा!
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121