सुनिल प्रभूंच्या उत्तरात तफावत! कायदेशीर पेच निर्माण होणार का?
28-Nov-2023
Total Views | 53
मुंबई: शिवसेना आमदार अपात्रता सुनावणी प्रकरणी आजपासुन (मंगळवार, २८ नोव्हेंबर) सलग पाच दिवस सुनावणी होणार आहे. आज देखील शिंदे गटाचे वकील अॅड. जेठमलानी यांनी सुनिल प्रभुं’ची उलटतपासणी घेतली. २१ जुन २०२२ च्या ठरावावरून प्रभुं’ना प्रश्न विचारण्यात आले.
मागील सुनावणी दरम्यान सुनिल प्रभुंच्या साक्ष मधुन २१ जुनला जो व्हीप जारी केला होता. तो २१ जुन च्या बैठकीला हजर राहण्यासाठी काढला होता, अस सांगण्यात आलं होत. त्यावरच अॅड. जेठमलानीं कडून हा व्हीप कोणकोणत्या आमदारांना देण्यात आला होता? कोणकोणत्या आमदारांपर्यंत तो पोहोचला होता? कशाप्रकाऱे तो काढण्यात आला होता? असे प्रश्न उपप्रश्न विचारण्यात आले होते. त्याचवेळी सुनिल प्रभुं’नी वर्षा बंगल्यावर बैठक झाली होती. अनेक आमदार तेथे उपस्थित होते व आम्ही उद्धव ठाकरें सोबत आहोत असा ठराव देखिल मंजुर केला गेल्याचे सांगितले.
यापुढे जेठमलानीं कडून आज आणखी काही प्रश्न विचारण्यात आलेत. त्यातील महत्वाचा प्रश्न म्हणजे उदय सामंत, दादा भुसे आणि संजय राठोड बैठकीला उपस्थित होते का? यावर सुनिल प्रभुं’नी हो हे तिघेही या बैठकीला होते व त्यांच्या ठरावावर सह्या देखील आहेत असे सांगितले. त्यावर जेठमलानींनी तुम्ही सर्वोच्च न्यायालयात जे प्रतिज्ञापत्र सादर केलय त्यात मात्र हे तिघे ठरावाच्या वेळी उपस्थित नव्हते असे सांगितले आहे असा प्रश्न केल्यामुळे सुनिल प्रभुं’च्या बोलण्यात विरोधाभास आढळून आला. त्यामुळे ठाकरे गटाच्या अडचणीत वाढ झाली आहे.