उबाठा गट-मनसेच्या यूतीवर मंत्री बावनकुळेंची मोठी प्रतिक्रिया, म्हणाले, "आम्हाला आणि आमच्या मतदारांना..."
07-Jun-2025
Total Views |
नागपूर : राज्यभरात उबाठा गट आणि मनसेच्या यूतीच्या चर्चा सुरु असून आता मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावर प्रतिक्रिया दिली. आमच्या सरकारने जनतेला दिलेला संकल्पनामा पूर्ण करण्यासाठी आम्ही लढतो आहोत. आम्हाला इतर गोष्टीत रस नाही, असे ते म्हणाले.
नागपूर येथे माध्यमांशी संवाद साधताना मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, "राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र आल्यानंतरही त्यांना त्यांची लढाई लढण्याची मुभा आहे. राज साहेबांनी आणि उद्धवजींनी कोणासोबत जावे हा त्यांच्या पक्षाचा अधिकार आहे. भाजपला काय औचित्य आहे? त्यांच्या यूतीमध्ये आम्हाला आणि आमच्या मतदारांना रस नाही. लोकांना आता विकास हवा असून आम्ही विकासाच्या मुद्यावर निवडणूक लढलो. आता कोण एकत्र येतो आणि कोण येत नाही या मुद्यांपेक्षा आमच्या सरकारने जनतेला दिलेला संकल्पनामा पूर्ण करण्यासाठी आम्ही लढतो आहोत. आम्हाला इतर गोष्टीत रस नाही," असे ते म्हणाले.