नवी दिल्ली : संयुक्त राष्ट्रसभेमध्ये भारताला एक महत्वपूर्ण विजय मिळाला आहे. इंटरनॅशनल नार्कोटिक्स कंट्रोल बोर्डाच्या (INCB) सदस्यपदी भारताच्या जगजित पोवाडीया यांची फेरनिवड झाली आहे. संयुक्त राष्ट्रसभेच्या आज झालेल्या निवडणुकीमध्ये पोवाडीया यांना ५४ पैकी ४४ मते पडली. पोवाडीया या २०१५ पासून आयएनसीबीच्या सदस्यपदावर असून फेरनिवडीमुळे त्या २०२५ पर्यंत या पदावर सदस्य म्हणून कार्यरत राहणार आहेत.
India's Ms Jagjit Pavadia tops International Narcotics Control Board Election.
— Syed Akbaruddin (@AkbaruddinIndia) May 7, 2019
15 candidates in fray for 5 seats.
Threshold for election 28
Results of 1st round.
Jagjit Pavadia
India 44
Jallal Toufiq
Morocco 32
Cesar Tomas Arce Rivas
Paraguay 31.
Rest face another vote. pic.twitter.com/O0jSkxFU96
संयुक्त राष्ट्राच्या आर्थिक आणि सामाजिक परिषदेच्या ५४ सदस्यांनी आज गुप्त मतदान केले. या निवडणुकीतील पाच जागांसाठी १५ उमेदवार रिंगणात होते. निवडणूक जिंकण्यासाठी २८ मतांची आवश्यकता असते. ५४ सदस्यांपैकी ४४ सदस्यांनी पोवाडिया यांच्यावर विश्वास दाखवत त्यांना निवडून दिले आहे. हा भारताच्या आंतरराष्ट्रीय राजकारणाचा भाग असल्याचे बोलले जात असून भारतासाठी हा मोठा विजय असल्याचे मानले जात आहे. दरम्यान, संयुक्त राष्ट्र संघातील भारताचे राजदूत सैय्यद अकबरुद्दीन यांनी पोवाडीया यांचे अभिनंदन केले आहे.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat