(Congress MLA Indira Meena Assaults BJP Leader) राजस्थानच्या सवाई माधोपूर जिल्ह्यात रविवारी १३ एप्रिलच्या रात्री राजकीय वादाला शारीरिक हिंसेचे स्वरुप मिळाल्याची घटना घडली आहे. काँग्रेस आमदार इंदिरा मीणा यांनी भाजप पदाधिकारी हनुमान दीक्षित यांच्या कानशिलात मारली. त्यांच्या गाडीवर चढले आणि जोरदार बाचाबाचीदरम्यान त्यांचे कपडे फाडले. व्हिडिओमध्ये कैद झालेले हे नाट्यमय दृश्य सोशल मीडियावर व्हायरल झाल्यामुळे जनतेत संतापाची लाट उसळली.
Read More
Hanuman Jayanti मध्यप्रदेशातील गुना शहरातील हनुमान जयंतीनिमित्त (Hanuman Jayanti) काढण्यात आलेल्या मिरवणुकीवर दगडफेक करण्यात आली. याप्रकरणात संबंधित पोलिसांनी नऊ जणांना अटक केली होती. यावर अधिकाऱ्यांनी रविवारी १३ एप्रिल २०२५ रोजी माहिती दिली आहे. यावर अधिकाऱ्यांनी सांगितले की, ही घटना कर्नलगंज येथे असलेल्या मशिदीच्या भोवताली घडली आहे. सायंकाळी ७ वाजून ४५ मिनिटांनी दोन्ही गट एकमेकांसमोर आले. यावेळी अधिकाऱ्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी ते घटनास्थळी दाखल झाले. अधिकाऱ्यांनी सांगितले की, घटनास्थळी सध्या
Hindu बिहारमधील मुजफ्फरपूर रेल्वेस्थानकाजवळ असणाऱ्या एका हिंदू मंदिरावर स्थानिक प्रशासनाने हतोडा चालवला आहे. या निषेधार्थ आता हिंदूंनी निदर्शने दर्शवली आहेत. तसेच २१ मार्च २०२५ रोजी मुजफ्फपूर बंदची हाक दिली आहे. या बंदला आता विविध हिंदू संघटनांनी पाठिंबा दिला आहे. या बंदला सकाळी पहाटे ६ वाजता सुरुवात होणार असल्याची माहिती आहे. यावेळी कोणताही एक अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासन अलर्ट मोडवर आहे.
Hanuman Chalisa बिहारच्या जमुईमध्ये हनुमान चालीसा पठण करत परतत असणाऱ्या हिंदूंवर कट्टरपंथींनी हल्ला केला. जमावाने हिंदूंच्या ताफ्याला घेरत त्यांच्यावर दगडफेक केली असल्याची काळीज हेलावून टाकणारी घटना घडली. यावेळी अनेकांनी तोडफोड करण्याचा प्रयत्न केला होता. यावेळी हल्लेखोर हे कट्टरपंथी असल्याची माहिती समोर आली आहे. या हल्ल्यामध्ये हिंदू महिलाही जखमी झाल्या होत्या. या घटनेनंतर घटनास्थळी पोलिसांचा फौजफाटा तैनता झाला आणि त्यांना अटकही करण्यात आली.
Hanuman आसामच्या श्री भूमी जिल्ह्यामध्ये भगवान हनुमंतांचे प्राचीन मंदिर आढळले आहे. त्याच्या जतनासाठी स्थानिक लोकांमध्ये मोठ्या उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. पाथरकांडीतील बिरबारीमधील लंगाई नदीजवळ उत्खननादरम्यान हे मंदिर सापडले आहे. मंदिरामागे हनुमान चालीसा कोरलेली दिसत आहे.
मध्य प्रदेशातील जबलपूर जिल्ह्यातील पाटण तालुक्यामध्ये जय बजरंग आखाडा येथे हनुमंतांच्या मूर्तीची विटंबना केली. यानंतर हिंदूंनी आखाड्यात भिंतींवर मुस्लिमांचा प्रवेश पूर्णपणे निषिद्ध केला आहे. परिणाम कहीही होऊ शकतात, असे लिहून इशारा दिला आहे. त्यानंतर संबंधित परिसरात तणाव पसरला आहे.
दादरमधील ( Dadar ) हनुमान मंदिर निष्कासित करण्यासंदर्भातील नोटिशीला रेल्वे मंत्रालयाकडून स्थगिती देण्यात आली होती. तमाम हिंदुत्ववादी संघटनांकडून तीव्र विरोध झाल्यानंतर भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार आणि आमदार मंगल प्रभात लोढा यांनी त्यांच्या भावना रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्यापर्यंत पोहोचवला. या भावनांचा आदर करीत रेल्वेमंत्र्यांनी संबंधित नोटिशीला स्थगिती दिली.
मुंबई : दादरमधील हनुमान मंदिर निष्कासित करण्यासंदर्भात रेल्वे प्रशासनाने नोटीस पाठवल्यामुळे हिंदुत्ववादी संघटनांकडूव तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली होती. मुख्यमंत्री ( CM Fadanvis ) देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात हस्तक्षेप करून दादरच्या हनुमान मंदिराचे नियमितीकरण करण्याची ग्वाही दिली आहे.
नितेश तिवारी दिग्दर्शित रामायण या चित्रपटाची गेल्या अनेक काळापासून चर्चा आहे. या चित्रपटात रणबीर कपूर प्रभू श्रीराम यांच्या भूमिकेत असून दाक्षिणात्य अभिनेत्री साई पल्लवी सीता मातेची भूमिका साकारताना दिसणार आहे. दरम्यान, सीतेच्या भूमिकेसाठी साई पल्लवीने मासांहार सोडल्याच्या चर्चा सध्या सोशल मिडियावर रंगल्या आहेत. यावर आता साई पल्लवीनेच प्रतिक्रिया दिली आहे.
नितेश तिवारी दिग्दर्शित 'रामायण' चित्रपटाची गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरु आहे. या चित्रपटात नेमके कोणते कलाकार कोणती भूमिका सादर करणार यावरुन रंगणारी चर्चा आता पुर्णविरामापर्यंत आली आहे असं म्हटल्यास चुकीचं ठरणार नाही. 'रामायण' या चित्रपटात प्रभू श्रीरामांची भूमिका रणबीर कपूर, सीता मातेची भूमिका साई पल्लवी साकारणार यावर फार आधीच शिक्कामोर्तब झाला आहे.
Hanuman temple तेलंगणातील रंगारेड्डी जिल्ह्यातील शमशाबाद येथील हनुमान मंदिराची तोडफोड झाल्याची धक्कादायक घटना आहे. या घटनेप्रसंगी एकाला ताब्यात घेतल्याची माहिती मंगळवारी पोलिसांनी दिली आहे.
दिवाळीच्या निमित्ताने अनेक नव्या चित्रपटांच्या घोषणा केल्या जात आहेत. अशात प्रशांत वर्मा यांच्या बहुप्रतिक्षित 'जय हनुमान' चित्रपटात ऋषभ शेट्टी मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटातील त्याचा पहिला लूक समोर आला असून तो हनुमानाच्या अवतारात प्रेक्षकांसमोर येणार आहे. महत्वाचे म्हणजे त्याच्या या लूकला चाहत्यांची विशेष पसंती मिळता आहे. 'जय हनुमान' चित्रपटाच्या प्रोडक्शन हाउस मिथ्री ऑफिशियलने इंस्टाग्रामवर चित्रपटाचे एक अप्रतिम पोस्टर शेअर केले आहे. यामध्ये ऋषभ शेट्टी भगवे कपडे परिधान करून रामाची मूर्ती छातीजवळ
भारत अॅनिमेशन क्षेत्रात क्रांती घडवून आणण्याच्या मार्गावर असून भारत येत्या काळात जगभराला सामग्री पुरवेल, असे दिसून येते. विविध क्षेत्रांत भारत आत्मनिर्भर होत असताना, या क्षेत्रातही त्याचे वाढते योगदान त्याला प्रमुख जागतिक खेळाडू अशी ओळख मिळवून देणारी ठरणार आहे.
( Shri Samarth Hanuman Mandal )रंगारी बदक चाळ, काळाचौकी येथील समर्थ हनुमान मंडळातर्फे दरवर्षी नवरात्रौत्सवात मोठया उत्साहात साजरा करण्यात येत असून भक्तांच्या हाकेला धावणारी देवी म्हणून तिची महाराष्ट्रभर ख्याती आहे. या मंडळाने या वर्षी ७० व्या वर्षात पदार्पण केले आहे. या मंडळाचे वैशिष्ट्य म्हणजे या मंडळात ७० वर्ष एकच मूर्ती स्थापित केली जात आहे. या मंडळातील मूर्तीचे विसर्जन होत नाही. देवीसाठी तयार केलेल्या विशेष गाभाऱ्यात ती वर्षभर असते आणि नवरात्रीमध्ये तिची मंडळात स्थापना केली जाते. या मंडळाचा संपूर्ण पदभा
Stone Pelting ईद मिलादुन्नीच्या मिरवणुकीत मध्य प्रदेशातील मंदसौर येथे हनुमान मंदिरावर दगडफेक (Stone Pelting) करण्यात आली आहे. यामुळे याभागात हिंसाचार झाला आहे. मिरवणुकीत हनुमान मंदिरावर केलेल्या दगडफेकीत एक भाविकाला जबर मार बसला असून तो जखमी झाला आहे. याप्रकरणी आता हिंदू एकटवले असून त्यांनी हनुमान मंदिरासमोर हनुमान चालीसेचे पठण करायला सुरूवात केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल केला असून ही घटना १६ सप्टेंबर रोजी घडली आहे.
Lord Hanuman भगवान हनुमंतांचे जन्स्थान मानल्या जाणाऱ्या कर्नाटकातील गंगावठी तालुक्यातील रस्त्यांवरील विद्युत दिव्यांना करण्यात आलेले सुशोभीकरण हटविण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. शहरातील रस्त्यांवरील विद्युत दिव्यांनी भगवान राम आणि भगवान हनुमान यांच्या शस्त्रांस्त्रांचे प्रतीक म्हणून गदा आणि धनुष्य हे सुशोभिकरण म्हणून चित्रित केले होते. मात्र आता दरम्यान स्थानिक प्रसारमाध्यमानुसार, सार्वजनिक दिव्यांवर हनुमंताची गदा आणि प्रभु श्रीरामाचे धनुष्य अशा चिन्हांनी पथदिव्यांचे सुशोभिकरण केले, मात्र याप्रकरणी क
मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक रामकरन यादव यांच्या संकल्पनेतून कलेचा प्रचार आणि संवर्धन करण्याच्या हेतूने मध्य रेल्वेने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या ऐतिहासिक वारसा इमारतीत दोन नव्या शिल्पांचे अनावरण केले. ही दोन्ही शिल्पे श्रीगणेश आणि हनुमानाची आहेत
दाक्षिणात्य चित्रपटांनी प्रेक्षकांना भूरळ पाडली आहे. या वर्षाच्या सुरुवातीलाच प्रदर्शित झालेल्या ‘हनुमान’ (Jai Hanuman) चित्रपटाने बॉक्स ऑफिसवरही बक्कळ कमाई केली होती. या चित्रपटाचा पुढचा भाग येणार असे सांगितले जात असतानाच आज रामनवमीच्या शुभमुहूर्तावर या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची घोषणा करण्यात आली आहे. ‘जय हनुमान’ (Jai Hanuman) असे या चित्रपटाचे नाव असून पोस्टर रिलीज करत अधिकृत घोषणा करण्यात आली आहे.
उद्धवजी, हनुमान चालीसा भारतात नाही तर पाकिस्तानात जाऊन म्हणायची का? असा सवाल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना केला आहे. गुरुवारी अमरावती लोकसभेसाठी भाजपकडून नवनीत राणांचा अर्ज भरण्यात येणार आहे. यावेळी आयोजित सभेत ते बोलत होते.
कर्नाटकमध्ये काँग्रेसचे सिद्धरामय्या सरकार स्थापन होऊन वर्षही उलटलेले नाही. पण, अवघ्या वर्षभरातच सिद्धरामय्या सरकारने लांगूलचालनाचा कळस गाठल्यामुळे हिंदूंचे जगणे असाहाय्य झाले. नुकतेच अजानच्या वेळी हनुमान चालिसा लावल्याने, हिंदू दुकानदाराला धर्मांधांच्या टोळक्याने मारहाण केली. हा हिंदूद्वेषाच्या काँग्रेसी ‘सिद्धी’चाच परिणाम म्हणावा लागेल.
कर्नाटकातील बंगळुरु येथे 'हनुमान चालिसा' वाजविल्याबद्दल जमावाने दुकानात घुसून मुकेशला मारहाण करण्यात आली आहे. दरम्यान, सदर मारहाणीप्रकरणी व्यपाऱ्यांकडून जोरदार निषेध करण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी या घटनेविरुध्द एफआयआर दाखल केली आहे.
गुजरातमधील वडोदरामधील अजवा रोडवर असलेल्या एकतानगरमध्ये दोन गटात हाणामारी झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. हनुमान मंदिरात लाऊडस्पीकरवर हनुमान चालीसा वाजवली म्हणून कट्टरपंथी जमावाने विरोध केला. त्यानंतर मंदिर परिसरात दगडफेक केली. या दगडफेकीप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. आतापर्यंत ३ जणांना अटक करण्यात आली आहे.
शास्त्रीय पद्धतीने मधसंकलन व विक्री करत ‘मास्टर ट्रेनर’ म्हणून नाशिक जिल्ह्यात नावलौकिक मिळवणार्या वनवासी पाड्यावरील विलास दरोडे यांची ही यशोगाथा...
अयोध्या येथील श्रीराम जन्मभूमीत रामलल्लाच्या मूर्तीच्या प्रतिष्ठापनेनिमित्त कोराडी येथील महालक्ष्मी जगदंबा संस्थानद्वारे सात हजार किलोचा रामहलवा प्रसाद आज तयार करण्यात आला. हा प्रसाद तयार करण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपला सहभाग नोंदवून उपक्रमाला सुरूवात केली.
इंट्रोधर्म, कर्म आणि करुणेच्या त्रिवेणी संगमावर विलसित झालेले विमल कमलपुष्प म्हणजे श्रीराम! दशरथपुत्र, अयोध्यापती श्रीराम हा भारतीय अवतार संकल्पनेनुसार भगवान विष्णूंचा सातवा अवतार मानला जातो. सीता आदिशक्तीचा, तर लक्ष्मण शेषाचा अवतार मानले जातात. पृथ्वीवरील सज्जनांचे म्हणजे सामाजिक नीतीमूल्याचे रक्षण आणि अमंगल दुष्ट शक्ती नाश करून धर्माची पुनर्स्थापना हे अवतार संकल्पनेमागे मुख्य तत्त्व आहे.
दक्षिण आफ्रिकेचा फिरकी गोलंदाज केशव महाराजने आपण प्रभू श्रीरामाचा आणि हनुमानाचा भक्त असल्याचा खुलासा केला आहे. आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की, केशव महाराज हा दक्षिण आफ्रिकेचा प्रमुख फिरकी गोलंदाज आहे. दक्षिण आफ्रिकेत राहून सुद्धा केशव महाराज आपल्या हिंदू धर्माचे काटेकोरपणे पालन करतो.
दाक्षिणात्य सुपरस्टार चिंरजीवी याने अयोध्येतील राम मंदिरासाठी एक मोठी घोषणा केली आहे. दाक्षिणात्य अभिनेता तेजा सज्जाचा ‘हनुमान’ चित्रपट १२ जानेवारीला प्रदर्शित होणार आहे. नुकताच या चित्रपट निर्मात्यांनी एक कार्यक्रम आयोजित केला होता. ज्यात चिरंजीवीने हजेरी लावत हनुमान चित्रपटाच्या प्रत्येक तिकिटातून ५ रुपये काढून त्यातून जमा होणारी रक्कम ही राम मंदिरासाठी दान केली जाणार असल्याची घोषणा चिरंजीवी याने केली.
अयोध्येत २२ जानेवारीला होणाऱ्या राममंदीर उद्घाटन सोहळ्याची जोरदार तयारी सूरू आहे. भव्य मंदिराचे बांधकाम आता अंतिम टप्प्यात आले आहे. राममंदिराच्या उद्घाटन सोहळ्याच्या निमीत्ताने देशभरात उत्साहाच वातावरण आहे. राममंदिराच्या मुख्यद्वारावर अनेक मूर्त्या बसवण्यात आल्या आहेत.
नवीन वर्षात प्रेक्षकांना मालिका, चित्रपट आणि ओटीटी या तिन्ही मनोरंजनाच्या माध्यमांवर नानाविध आशय पाहता येणार आहे. यात प्रामुख्याने प्रभू श्री राम यांच्याभोवती फिरणाऱ्या कलाकृतींचा सहभाग अधिक असणार आहे. २२ जानेवारी २०२४ रोजी अयोध्येत प्रभू श्रीराम यांच्या मुर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाणार असून यासाठी देशभरातील लाखो रामभक्त या दिवसाची आतुरतेने वाट पाहात आहेत.
अयोध्येतील हनुमान गढीचे महंत राजूदास महाराज यांनी बाळासाहेबांचा आत्मा आज रडत असेल. त्यांचा स्वतःचा मुलगा सोनिया चरणी लीन झाला अस वक्तव्य केल आहे. एबीपी माझाशी बोलताना त्यांनी हे मत व्यक्त केले. राममंदीराच्या उभारणीत महाराष्ट्राच्या लोकांच मोठ योगदान आहे. असही ते यावेळी म्हणाले.
कोठारी बंधूंच्या बलिदानाने देशभरातील हिंदू पेटुन उठले. त्यांच्या हौतात्म्य १९९० च्या दशकात मोठ्या संख्येने तरुणांना मंदिर चळवळीशी जोडण्यात एक प्रमुख प्रेरणास्त्रोत ठरले होते. याच कोठारी बंधुंनी दोन दिवस आधी विवादीत ढाचावर चढुन भगवा फडकवला होता. कोण होते हे कोठारी बंधू आणि काय आहे त्यांच्या बलिदानाची गोष्ट हे सांगणारा हा लेख
"तालिबानच्या मानसिकतेवर एकच उपाय आहे, तो म्हणजे बजरंग बलीची गदा." असे विधान मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी इस्रायलच्या दहशतवादाविरुद्धच्या लढाईचे कौतुक करताना केले आहे. राजस्थानमधील तिजारा जिल्ह्यात एका सभेत बोलत होते.
"काँग्रेस नेत्यांचे बाबरीवरील प्रेम कमी होत नाही हे दुर्दैवी आहे. ते स्वतः रामभक्त नसून परकीय आक्रमक बाबरचे भक्त असल्याचे वेळोवेळी सांगतात. अयोध्येतील संत अशा लोकांना कोणत्याही मंदिरात जाऊ देणार नाहीत." असा इशारा हनुमानगडीचे महंत राजुदास यांनी काँग्रेस नेत्यांना दिला आहे.
अभिनेत्री कंगना रणौत यांनी गुरुवारी (२६ ऑक्टोबर २०२३) रामललाच्या दर्शनासाठी अयोध्येला पोहोचल्या आहेत. यावेळी त्यांनी रामललाच्या मंदिराचे बांधकामात मदत करणाऱ्या कामगारांशी मुलाखत केली. त्यावेळी त्या म्हणाला की, "'तुम्ही सर्व आमच्यासाठी हनुमानजीची सेना आहात, जी हे काम पूर्ण करत आहे."
गुजरातमधील वडोदरा येथे रामायणाला 'बनावट' संबोधून भगवान हनुमानाच्या मूर्तीबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याची घटना समोर आली आहे. शाळेतील एक विद्यार्थी हनुमानजींच्या दर्शनासाठी गेला होता, त्यामुळे तो शाळेत येऊ शकला नाही. यावर शाळेतील शिक्षकाने रामायण आणि हनुमानाबद्दल अपमानास्पद गोष्टी बोलल्या. हिंदू संघटनांनी याचा निषेध करत आरोपी शिक्षकावर कारवाईची मागणी केली आहे.
उत्तर प्रदेशमधील ललितपूर येथे तीन दारुड्यांनी देवाच्या मूर्तीची तोडफोड केली आहे. या प्रकरणी ५ ऑगस्ट २०२३ रोजी एफआयआर दाखल केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी मोहम्मद आसिफ आणि आमिरला अटक केली आहे, तर त्याचा मित्र नासिर फरार आहे. दारूच्या नशेत हे काम केल्याचे आरोपींनी सांगितले.
लोकसभेचे कामकाज दि. ८ ऑगस्ट रोजी तहकूब केल्यानंतर दुपारी १२ वाजता पुन्हा सुरू झाले. यादरम्यान अविश्वास ठरावावर चर्चा सुरू झाली. तेव्हा श्रीकांत शिंदेंनी सावरकर आणि हिंदुत्वांच्या मुद्याला हात घातला. श्रीकांत शिंदे म्हणाले की, २०१९ मध्ये हिंदूत्वाची साथ सोडून मविआसोबत गेलेल्यांनी खरी गद्दारी केली.१३ कोटी मतदारांशी ठाकरेंनी गद्दारी केली. आम्ही बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन जाण्याचे काम केले. इतकेच नाही तर काही लोक समाजवादीच्या इंडिया आघाडीत देखील सामील झाले. ज्या समाजवादीने कारसेवकांवर गोळ्या चालवण्याच काम के
मध्य प्रदेशातील डिंडोरी जिल्ह्यातील शाहपुरा येथील हनुमान मूर्तीचा अपमान करणाऱ्या अमजद खानचे घर बुलडोझर चालवून पाडण्यात आले आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, दिंडोरी जिल्ह्यातील शाहपुरा येथे आई शारदा टेकडीवर हनुमानाचे मंदिर आहे.
उत्तर प्रदेशातील सोनभद्र जिल्ह्यात मोहरमपूर्वी गोवंशाचे अवशेष सापडल्याने परिसरात तणावाचे वातावरण आहे. हे अवशेष गाईच्या वासराचे असल्याचे सांगितले जात आहे. मात्र हे अवशेष एका मंदिराजवळ सापडल्याने तणावाचे वातावरण परिसरात निर्माण झाले आहे. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी मोठी गर्दी झाली होती. संतप्त जमावाने घोषणाबाजी केली. दुसरीकडे पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून परिस्थिती आटोक्यात आणली आहे. लवकरच आरोपींला पकडून त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल , असे आश्वासन पोलीसांनी दिले आहे. ही घटना दि. २८ जुलै रोजी घडली.
उत्तर प्रदेशमधील शाहजहांपूर येथील हनुमान मंदिराजवळ एका गोणीत मांस सापडले आहे. गोणीतून रक्त वाहत होते, स्थानिक लोकांनी पोती उघडली असता त्यात मांस आढळले. यानंतर हिंदुत्ववादी संघटनांनी माहिती मिळताच रास्ता रोको आंदोलन केलं. एफआयआर नोंदवून आरोपींना तत्काळ अटक करण्याची मागणी संघटनांनी केली.
बुद्धिवंत हनुमानाने सुचवले की, रामाचे सामर्थ्य अफाट असल्याने त्याच्या नामाचे दगड बुडणार नाहीत. या रामनामाच्या दगडांनी अल्पावधीत सेतू बांधणे शक्य झाले. म्हणून समर्थ म्हणतात की, रामनामाने पाषाण तरले. भगवंताच्या नामाने निश्चितपणे (नेमस्त) पाषाणांना तारले. तसेच अनेक देहधारी पाषाणांना रामनामाने तारले आहे.
मुंबई/हिमालय प्रदेश : शिमल्याच्या जाखू मंदिरात हनुमानाची १०८ फूट उंच मूर्ती जाखू पर्वत येथे वसवण्यात आली आहे. तसेच, 'प्राइड ऑफ सिमला' नावाचा हा पुतळा जगातील सर्वात उंच पुतळ्यांपैकी एक असून हिमाचल प्रदेशात जाणाऱ्या भाविकांनी शिमल्यातील या हनुमान मंदिराला अवश्य भेट द्यावी असे हे निसर्गरम्य ठिकाण आहे. दरम्यान, सोशल मीडियावर हनुमानाची सिंदूर असलेली महाकाय मूर्ती तुम्ही अनेकदा पाहिली असेल जी शिमल्यात आहे. ही १०८ फूट उंचीची मूर्ती शिमल्याच्या कोणत्याही कोपऱ्यातून पाहता येते. समुद्रसपाटीपासून ८ हजार फूट उंचीवर जाख
ध्या आदिपुरुष या रामायणावर आधारित चित्रपटाची बरीच चर्चा भारतभर पहायला मिळत आहे.'सुपरस्टार' प्रभास'ने यात भगवान श्रीरामांची भूमिका साकारली आहे.
कर्नाटक विधानसभा निवडणूक प्रचारामध्ये काँग्रेसने आपल्या निवडणूक जाहीरनाम्यात ‘बजरंग दल’ या संघटनेवर बंदी घालण्यात येईल, अशी जी घोषणा केली, त्याचे तीव्र पडसाद केवळ कर्नाटकमध्येच नव्हे, तर संपूर्ण देशभरात उमटले. ‘बजरंग दल’ या संघटनेची तुलना देशद्रोही ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ या बंदी घालण्यात आलेल्या संघटनेशी करणार्या काँग्रेस नेत्याची या निमित्ताने कीव आली. आपल्या स्वार्थासाठी एखादा पक्ष किती खालच्या पातळीवर जाऊन राजकारण करतो, ते यानिमित्ताने जनतेला दिसून आले. बजरंग दलावर बंदी घालण्याच्या मागणीसंदर्भात तीव
विशेष प्रतिनिधी चोल काळातील हनुमानाची चोरी झालेली मूर्ती जप्त करण्यात आली असून ती तामिळनाडूच्या आयडॉल विंगकडे सोपवण्यात आली आहे.
रामनवमी आणि हनुमान जयंतीच्या मिरवणुका निघतात त्यामध्ये दंगली होतात असे, वादग्रस्त विधान जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून घाटकोपरमध्ये सभेत बोलताना आव्हाडांनी हे विधान केले होते. दरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आव्हाडांच्या या वक्तव्याचा समाचार घेतला.
मी हिंदु आहे, कट्टर हिंदु. असं वक्तव्य जितेंद्र आव्हाड यांनी केलं आहे. रामनवमी आणि हनुमान जयंतीच्या मिरवणुका निघतात त्यामध्ये दंगली होतात असे, वादग्रस्त विधान केल्यानंतर आव्हाडांनी हे वक्तव्य केलं आहे. दंगलींचा उल्लेख करत केलेल्या एका विधानावरुन मोठा वाद निर्माण झाला झाला, हे लक्षात येताच आव्हाडांनी स्पष्टीकरण दिलं आहे.
माजी मंत्री आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी हिंदू देवी-देवता आणि हिंदू सणांवर केलेल्या अवमानकारक वक्तव्याविरोधात भाजप नेत्यांमध्ये नाराजी दिसून येत आहे. हिंदू सणांच्या वेळी काढण्यात आलेल्या मिरवणुकीवर अशोभनीय वक्तव्य करून, जितेंद्र आव्हाड यांनी धार्मिक भावना दुखावल्या आहेत, असा आरोप मुंबई भाजप नेत्यांनी केला आहे. हिंदूंच्या भावना दुखावणारे विधान करणाऱ्या वाचाळवीर आव्हाडांवर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी मुंबई भाजपच्या शिष्टमंडळाने मुंबई पोलीस उपायुक्तांकडे केली आहे.
तुम्ही आजपर्यत असे अनेक व्हिडिओ पाहिले असतील ज्यात भजन गाणाऱ्या गायकासमोर पैशांचा ढीग असतो. पण असा व्हिडिओ क्वचितच पाहिला असेल ज्यात भजन गाणाऱ्या गायकाभोवती पोळ्यांचा ढीग आहे. असाच एक व्हिडिओ गुजरातमधून समोर आला आहे. पाटण येथील रोतालिया हनुमान मंदिरात प्रसिद्ध लोकगायक कीर्तिदान गढवी यांचा भजनाचा कार्यक्रम होता. या कार्यक्रमात येण्यासाठी जो पोळी आणेल त्यालाच प्रवेश दिला जाणार होता. त्यामुळे भजनाचा आंनद लुटण्यासाठी आलेल्या भक्तांनी मनाप्रमाणे पोळ्या घेऊन कार्यक्रमात दाखल झाले. त्यामुळे सोशल मीडियावर व्हायरल झ
ओडिशातील संबलपूर येथे हनुमान जन्मोत्सवानिमित्त काढण्यात आलेल्या मोटारसायकल रॅलीला कट्टरपंथी मुस्लिम जमावाने दि.१२ एप्रिल रोजी रॅली मशिदीजवळ पोहोचताच हल्ला केला. यावेळी दगडफेक ही करण्यात आली. त्यात १० पोलीस जखमी झाले आहे.यात एक महिला पोलीस कर्मचारी ही आहे. मात्र पोलिसांव्यतिरिक्त आणखी किती जण जखमी झाले आहेत, याची माहिती मिळालेली नाही. या घटनेनंतर संबलपूरमध्ये कलम १४४ लागू करण्यात आले आहे.