राम मंदिरासाठी चिरंजीवीची मोठी घोषणा, हनुमॅन चित्रपटाच्या तिकिटातील पैशातून करणार दान

    08-Jan-2024
Total Views |

hanuman movie 
 
मुंबई : दाक्षिणात्य सुपरस्टार चिंरजीवी याने अयोध्येतील राम मंदिरासाठी एक मोठी घोषणा केली आहे. दाक्षिणात्य अभिनेता तेजा सज्जाचा ‘हनुमान’ चित्रपट १२ जानेवारीला प्रदर्शित होणार आहे. नुकताच या चित्रपट निर्मात्यांनी एक कार्यक्रम आयोजित केला होता. ज्यात चिरंजीवीने हजेरी लावत हनुमान चित्रपटाच्या प्रत्येक तिकिटातून ५ रुपये काढून त्यातून जमा होणारी रक्कम ही राम मंदिरासाठी दान केली जाणार असल्याची घोषणा चिरंजीवी याने केली.
 
चिरंजीवी यावेळी म्हणाला की, “अयोध्येतील राम मंदिराची उभारणी हा इतिहासातील एक मैलाचा दगड आहे. मला २२ तारखेला राम मंदिर उद्घाटनासाठी आमंत्रण दिलं असून मी माझ्या कुटुंबांसह उपस्थित राहणार आहे. राम मंदिर उद्घाटनाचं औचित्य साधून ‘हनुमान’ चित्रपटाच्या टीमने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. चित्रपटाच्या विक्री झालेल्या प्रत्येक तिकिटातून ५ रुपये राम मंदिरासाठी दान करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयासाठी ‘हनुमान’ टीमला माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा”.