बाबरीवर भगवा फडकवणारे कोठारी बंधू

कोठारी बंधूंनी बलिदान दिलं त्या दिवशी काय घडलं होतं?

    27-Dec-2023
Total Views | 72
kothari bandhu
 
तारीख होती २ नोव्हेंबर १९९०, राममंदीर आंदोलन शिगेला पोहोचले होते. कारसेवक लाखोंच्या संख्येने अयोध्येमध्ये पोहोचत होते. तरुण, महीला, प्रौढ सर्वांचा यात समावेश होता. अशोक सिंघल यांच्या नेतृत्वाखाली लाखो लोक विवादीत क्षेत्राच्या दिशेने जात होते. शरयु नदीच्या किनाऱ्यावर एकत्र जमुन कारसेवकांनी हनुमान गढीच्या दिशेने चालायला सुरुवात केली. उत्तरप्रदेशमध्ये त्यावेळी समाजवादी पक्षाच्या मुलायमसिंग यादव यांचे सरकार होते. त्यांनी पोलीसांना बाबरी ला धक्का लागता कामा नये असे सक्त निर्देश दिले होते. तरीही श्रीरामजन्मभुमीला मुक्त करण्याचा संकल्प घेउन कारसेवक बाबरी ढाचाच्या दिशेने पुढे सरकत राहीले. या कारसेवकां मध्ये रामकुमार कोठारी आणि शरद कोठारी हे दोन सख्खे भाऊ देखिल होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक असलेले हे दोन बंधू मुळचे कलकत्त्याचे होते. कलकत्याहुन २०० कीमी पायी चालत ते अयोध्येत कारसेवेसाठी पोहोचले होते. कारसेवक मोठ्या संख्येने बाबरी ढाचाच्या दिशेने येताना पाहून पोलिसांनी कारसेवकांवर अमानुष गोळीबार केला. या गोळीबारात कोठारी बंधू जागीच गतप्राण झाले. कोठारी बंधूंच्या बलिदानाने देशभरातील हिंदू पेटुन उठले. त्यांचे हौतात्म्य १९९० च्या दशकात मोठ्या संख्येने तरुणांना मंदिर चळवळीशी जोडण्यात एक प्रमुख प्रेरणास्त्रोत ठरले होते. याच कोठारी बंधुंनी दोन दिवस आधी विवादीत ढाचावर चढुन भगवा फडकवला होता.
 
रामकुमार कोठारी आणि शरद कोठारी हे दोन भाऊ मुळचे कलकत्याचे, रामकुमारचे वय २३ आणि शरद चे वय अवघे २० वर्ष होते एकीकडे रामजन्मभुमीचे आंदोलन शिगेला पोहोचले होते तर दुसरीकडे कोठारी बंधुंच्या घरी त्यांची बहीण पूर्णिमा कोठारींच्या लग्नाची तयारी सुरु होती. ८ डिसेंबर १९९० ला लग्नाची तारीख ठरली होती. दोघांपैकी एकाने आंदोलनात सहभागी व्हावे व दुसऱ्याने बहीणीच्या लग्नाची तयारी पहावी असे नातेवाईकांचे व परिवीरचे मत होते. परंतु दोनही भावांनी आंदोलनात सहभागी होण्याचा निर्णय घेतला. २२ ऑक्टोबरच्या रात्री शरद आणि रामकुमार कोठारी कलकत्ता येथून निघाले व बनारस पर्यंत पोहेचले. सरकारने सर्व ट्रेन आणि बससेवा बंद केल्या होत्या. त्यामुळे तेथुन पुढचा साधारण २०० कीमीचा प्रवास त्यांनी पायी चालत पुर्ण केला. २५ ऑक्टोबरला अयोध्येच्या दिशेने निघालेले कोठारी बंधु ३० तारखेला अयोध्येत पोहोचले. त्याच दिवशी लहान भाऊ शरद सर्वात आधी विवादीत ढाचावर चढला त्याच्यापाठोपाठ रामकुमारही चढला व त्यांनी भगवा ध्वज फडकवला. त्यांच्यासोबत त्यावेळी आणखी काही कारसेवकही होते. पोलीसांनी कारसेवकांवर गोळीबार केला त्यात पाच जण मृत्युमुखी पडले तर कोठारी बंधूंना पोलिसांनी मारहाण करुन तेथुन बाहेर काढले. बाबरीला धक्का ही लागता कामा नये असे पोलीसांना आदेश दिलेले असताना घुमटावर चढुन भगवा फडकवणे मोठ्या धाडसाचे काम होते. यामुळे कारसेवकांमध्येही उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
 
या घटनेनंतर दोनच दिवसात २ नोव्हेंबरला अशोक सिंघल यांच्या नेतृत्वात शरयु नदीच्या घाटावरुन कारसेवक विवादीत क्षेत्राच्या दिशेने निघाले. उमा भारती, साध्वी ऋतंभरा, विनय कटियार यांच्यासह विश्व हिंदू परिषदेशी संबंधित अनेक संत मंडळी यावेळी अयोध्येत उपस्थित होते. कोठारी बंधुही विनय कटीयार यांच्यासोबत यात सहभागी होते. याही दिवशी पोलीसांनी कारसेवकांवर गोळीबार केला. पोलिसांचा गोळीबार होत असताना कोठारी बंधू लाल कोठी असलेल्या गल्लीमध्ये गेले. तिथुन बाहेर निघत असताना पोलिसांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. त्यात त्यांनी जागीच अंतिम श्वास घेतला. या गोळ्या त्यांच्या डोक्यात मारण्यात आल्या होत्या. हे कृत्य इतके अमानुष होते की कोठारी बंधूंच्या मृतदेहाचे कारसेवकांनी काढलेले फोटो आणि व्हीडीओ आपण पाहु ही शकणार नाही. ४ नोव्हेंबर १९९० रोजी शरद आणि रामकुमार कोठारी यांच्यावर शरयूच्या घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या अंत्ययात्रेला हजारो लोक जमले होते. कोठारी बंधु अमर रहे अशा घोषणा ही दिल्या गेल्या. कोठारी बंधू आपल्या बहीणीच्या लग्नालाही पोहचु शकले नाहीत.
 
येत्या २२ जानेवारीला अयाध्येमध्ये प्रभुश्रीरामचंद्रांच्या मुर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. श्रीरामजन्मभुमीच्या जागी भव्यरामंदीर उभे राहात आहे. अयोध्येमध्ये दर्शनासाठी आल्यावर कोठारी बंधूची बहीण पूर्णिमा कोठारी यांनी माध्यमांशी बोलताना म्हटल की माझ्या भावांनी मला राममंदीरांच्या रुपाने खुप मोठी भेट दिली आहे. आज राम मंदिराची होत असलेली उभारणी ही माझ्या दोन भावांना सर्वात मोठी श्रद्धांजली आहे.
 
-ऋतुवल नवले 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121