हनुमान चालीसा पठण करत असताना हिंदूंवर कट्टरपंथींची दगडफेक

परिस्थिती लक्षात घेता इंटरनेट बंद, ८ हल्लेखोर पोलिसांच्या ताब्यात

    17-Feb-2025
Total Views | 227
 
Hanuman Chalisa
 
पटना : बिहारच्या जमुईमध्ये हनुमान चालीसा (Hanuman Chalisa) पठण करत असणाऱ्या हिंदूंवर कट्टरपंथींनी हल्ला केला. जमावाने हिंदूंच्या ताफ्याला घेरत त्यांच्यावर दगडफेक केली असल्याची काळीज हेलावून टाकणारी घटना घडली. यावेळी अनेकांनी तोडफोड करण्याचा प्रयत्न केला होता. यावेळी हल्लेखोर हे कट्टरपंथी असल्याची माहिती समोर आली आहे. या हल्ल्यामध्ये हिंदू महिलाही जखमी झाल्या होत्या. या घटनेनंतर घटनास्थळी पोलिसांचा फौजफाटा तैनता झाला आणि त्यांना अटकही करण्यात आली.
 
प्रसारमाध्यमाच्या अहवालानुसार, रविवारी १६ फेब्रुवारी २०२५ रोजी हिंदू स्वाभिमान संघटनेचे कार्यकर्ते जमुईच्या बलियाडिह गावामध्ये हनुमान चालीसा पठण करण्यासाठी गेले होते. त्यावेळी हनुमान चालीसा पठणानंतर ते पुन्हा परतत असताना, मशिदीजवळ त्यांच्या वाहनांवर जमावाने हल्ला केला.
 
 
 
गावातील कट्टरपंथीनी मुस्लिमबहुल भागातून जात असताना हा हल्ला केला. या हल्ल्यामध्ये हिंदू स्वाभिमान संघटनेचे जिल्हाध्यक्ष नितीश कुमार आणि हिंदू कार्यकर्त्या खुशबू पांडे यांच्यासह सुमारे १० कार्यकर्ते गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्या नाकातोंडातून रक्तप्रवाह वाहत असल्याचे फोटो आणि व्हिडिओतून दिसत आहे.  
 
दरम्यान या घडलेल्या घटनेमुळे सोशल मीडियाच्या माध्यमातून कोणतीही चुकीची माहिती पसरवली जाऊ नये. या कारणाने इंटरनेट बंद ठेवण्यात आलेत. त्याचप्रमाणे याप्रकरणामध्ये ८ जणांना पोलिसांनी ताब्यात घेत मुसक्या आवळल्या असल्याचे वृत्त समोर आले आहे.
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121