मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Yogi Adityanath Janata Darshan) उत्तर प्रदेशच्या गोरखनाथ मंदिरात आयोजित सार्वजनिक दर्शनादरम्यान कन्नौज जिल्ह्यातील दिव्यांग पुजारी गोपालदास यांनी सोमवारी (दि. २६ मे) मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेतली. धर्म आणि संस्कृतीच्या जतन व विकासासाठी मुख्यमंत्र्यांनी केलेल्या सततच्या प्रयत्नांचे कौतुक करतानाच, त्यांनी कन्नौजमधील बजरंग बली मंदिराच्या बांधकामात येणाऱ्या अडथळ्यांचीही माहिती दिली. काही लोक मंदिर बांधू देत नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यावर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ त्यांना आश्वासन दिले की चौकशीनंतर योग्य ती कारवाई केली जाईल. कोणालाही मनमानी पद्धतीने वागण्याची परवानगी दिली जाणार नाही.
गोरखनाथ मंदिर संकुलातील महंत दिग्विजयनाथ स्मृती भवनासमोर आयोजित जनता दर्शनात खुर्च्यांवर बसलेल्या लोकांशी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी स्वतः संपर्क साधला. साधारण २५० लोकांना ते भेटले, त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. मुख्यमंत्र्यांनी सर्वांना आश्वासन दिले की प्रत्येक व्यक्तीला न्याय मिळेल. प्रत्येकाचे अर्ज संबंधित अधिकाऱ्यांकडे पाठवून त्यांचे त्वरित निवारण करण्याचे निर्देश देत, मुख्यमंत्र्यांनी लोकांना आश्वासन दिले की सरकार प्रत्येक पीडितांच्या समस्या सोडवण्यासाठी वचनबद्ध आहे.