मुंबई : मी हिंदु आहे, कट्टर हिंदु. असं वक्तव्य जितेंद्र आव्हाड यांनी केलं आहे. रामनवमी आणि हनुमान जयंतीच्या मिरवणुका निघतात त्यामध्ये दंगली होतात असे, वादग्रस्त विधान केल्यानंतर आव्हाडांनी हे वक्तव्य केलं आहे. दंगलींचा उल्लेख करत केलेल्या एका विधानावरुन मोठा वाद निर्माण झाला झाला, हे लक्षात येताच आव्हाडांनी स्पष्टीकरण दिलं आहे.
"मी असो बोललो की, सध्या परिस्थिती अशी तयार करण्यात येते की, रामनवमी-हनुमान जयंती हे उत्सव केवळ दंग्यांसाठीच आहे, हे दाखवलं जात. यामुळे हे उत्सव बदनाम होत आहे. मी हिंदू आहे, कट्टर हिंदु आहे. वासुदैव कुटुंबकम मानणारा हिंदू असल्याचंही आव्हाड म्हणाले."
"समाजात तेढ निर्माण होऊ नये म्हणून आमच्यासारखे लोक गेल्या ४० वर्षांपासून काम करत आहेत. देशात जे घडत आहे ते सनसनाटीच आहे. मी माझ्या डोळ्यांसमोर अनेक दंगली पाहिल्या आहेत. अनेक दंगली शमवल्याही आहेत. मी समाजाला जोडणारा माणूस आहे. मी कोणतंही विधान अत्यंत विचारपूर्वक आणि गांभीर्याने करतो. त्यामुळे मी जे बोललो आहे ते योग्य आहे."
"आता मी बोललो नाही, तर महाराष्ट्राला कळणार नाही. माणसाच्या मृत्यूपेक्षा कशाला किंमत असते का? आपण लढायला निघालो तर सत्य सांगावच लागतं. मला काही जन्मठेप होणार नाही. यावरही आणखी दोन दिवस जेलमध्ये जाईल. रामनवमी आणि हुनमान जयंती ज्या पद्धतीने केलं जायचं, रामाची, हनुमानाची पूजा व्हायची, हे मी घरात अनुभवल्याचं आव्हाड म्हणाले." असं जितेंद्र आव्हाड म्हणाले आहेत.