"मी श्रीरामाचा आणि हनुमानाचा भक्त"; 'या' परदेशी खेळाडूचा मोठा खुलासा

    09-Jan-2024
Total Views |
 maharaj
 
मुंबई : दक्षिण आफ्रिकेचा फिरकी गोलंदाज केशव महाराजने आपण प्रभू श्रीरामाचा आणि हनुमानाचा भक्त असल्याचा खुलासा केला आहे. आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की, केशव महाराज हा दक्षिण आफ्रिकेचा प्रमुख फिरकी गोलंदाज आहे. दक्षिण आफ्रिकेत राहून सुद्धा केशव महाराज आपल्या हिंदू धर्माचे काटेकोरपणे पालन करतो.
 
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकेतील मालिकेदरम्यान केशव महाराज जेव्हा फलंदाजीसाठी मैदानात येतो. तेव्हा 'राम सियाराम' हे गाणे वाजवले जाते. त्यामुळे केशव महाराजची मैदानात प्रवेश घेण्याच्या स्टाईलची चर्चा झाली होती. त्यावर आता केशव महाराजने स्वत: खुलासा केला आहे.
 
केशव महाराज स्वत: मैदानात प्रवेशावेळी हे गाणे वाजवण्याचे विनंती करतो. असा खुलासा त्याने केला आहे. या गाण्यामुळे एकाग्र होऊन फलंदाजी करण्यास मदत होते. असे देखील त्याने सांगितले. महाराज म्हणाला की, "मी भगवान हनुमान आणि प्रभू राम यांचा भक्त आहे, त्यामुळे मला वाटते की हे गाणे अगदी योग्य आहे. देवाने मला खूप आशीर्वाद दिला आहे. त्याने मला नेहमीच मार्ग दाखवला आहे, म्हणून मी हे करू शकतो. हे मला माझ्या झोनमध्ये येण्यास मदत करते. जेव्हा तुम्ही मैदानात प्रवेश करता तेव्हा ‘राम सियाराम’ची धून ऐकायला छान वाटते.”