भोंग्यावर हनुमान चालीसा लावली म्हणून कट्टरपंथींकडून मंदिरात दगडफेक!

    14-Mar-2024
Total Views | 144
Stone pelting in Vadodara over Hanuman Chalisa

गांधीनगर
: गुजरातमधील वडोदरामधील अजवा रोडवर असलेल्या एकतानगरमध्ये दोन गटात हाणामारी झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. हनुमान मंदिरात लाऊडस्पीकरवर हनुमान चालीसा वाजवली म्हणून कट्टरपंथी जमावाने विरोध केला. त्यानंतर मंदिर परिसरात दगडफेक केली. या दगडफेकीप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. आतापर्यंत ३ जणांना अटक करण्यात आली आहे.

एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, दि. १३ मार्च रोजी अजवा रोडवरील एकतानगरमध्ये असलेल्या मंदिरात नेहमीप्रमाणे लाऊडस्पीकरवर हनुमान चालीसा पठण सुरु होती. पंरतु कट्टरपंथी जमावाने त्यावर आक्षेप घेतला आणि नंतर दगडफेक सुरु झाली. यावेळी २५ ते ३० लोक तिथे जमा झाली. त्यामुळे स्थानिक हिंदूंनी, कट्टरपंथी जमावाने हनुमान चालीसा बंद करण्यासाठी हा गोंधळ घातल्याचं म्हणटले आहे. तर पोलिसांचे म्हणणे आहे की, हा गोंधळ लाऊडस्पीकरचा आवाज बंद करण्यासाठी होता.

एका वृत्तसंस्थेने सांगितले की, सुरुवातीला मंदिरात हरीश सरनिया आणि दीपक सरनिया नावाचे दोन तरुण उपस्थित होते. प्रथम राहिल शेख आणि इतर कट्टरपंथी त्यांच्याकडे आले आणि त्यांच्याशी वाद घालायला सुरुवात केली. यानंतर हाणामारी झाली आणि त्यानंतर दगडफेक सुरू झाली. यादरम्यान कट्टरपंथी जमावाने मंदिरात गोंधळ घातला आणि तेथे लावलेले लाऊडस्पीकरही तोडले. या मारामारीत दीपक, हरीश आणि राहिल जखमी झाले आणि त्यांना नंतर रुग्णालयात दाखल करण्यात आले. माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. रात्री उशिरापर्यंत या परिसरात कडक पोलीस बंदोबस्त होता.

दरम्यान या प्रकरणात आतापर्यंत बापोद पोलीस ठाण्यात एकूण ७ तरुणांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे. राहिल शेख, आसिफ शेख, सेजन अन्सारी, हुसेन लतीफ, दीपक आणि हरीश सरनिया अशी आरोपींची नावे आहेत.या घटनेबाबत वडोदराचे सह पोलिस आयुक्त मनोज निनामा म्हणाले, “एकता नगर हा हिंदू-मुस्लिम लोकवस्तीचा परिसर आहे. येथे आधी लाऊडस्पीकरच्या आवाजावरून वाद झाला आणि नंतर या वादाचे रुपांतर हाणामारीत झाले. याबाबत बापोद पोलिस ठाण्यात कारवाई सुरू आहे. तिन्ही जखमींवर उपचार सुरू असून, त्यांना कोणतीही गंभीर दुखापत नसून त्यांच्या प्रकृतीतही सुधारणा होत आहे. जखमींमध्ये २ हिंदू आणि १ मुस्लिम आहे. परिसरात आता शांतता आहे.”दरम्यान मंदिर परिसरातील व्हिडिओ फुटेज, साक्षीदार आणि इतर पुराव्यांच्या आधारे पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.



अग्रलेख
जरुर वाचा
ऐतिहासिक वसई किल्ला जागतिक वारसा यादीत समाविष्ट करण्याबाबत शासनदरबारी मागणी : खानिवडे

ऐतिहासिक वसई किल्ला जागतिक वारसा यादीत समाविष्ट करण्याबाबत शासनदरबारी मागणी : खानिवडे

११ जुलै २०२५ रोजी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ ऐतिहासिक किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश झाला आहे. अवघ्या महाराष्ट्रासह संपूर्ण देशाचा हा मोठा गौरव आहे. मात्र याचबरोबर पोर्तुगीजांच्या जुलमी जोखडातून वसई प्रांताला मुक्त करणाऱ्या नरवीर  चिमणाजी अप्पा यांच्या साहसी शौर्याची परिसीमा असलेल्या मुंब‌ईपासून अगदी हाकेच्या अंतरावरील वसईच्या ऐतिहासिक किल्लाचा देखील जागतिक वारसा यादीमध्ये समावेश व्हावा यासाठी वसईतील सामाजिक कार्यकर्ते तसेच शिवप्रेमीनितीन म्हात्रे यांनी ..

भाजपा महिला विभागाचे महिला बचत गटांना मार्गदर्शन :खानिवडे

भाजपा महिला विभागाचे महिला बचत गटांना मार्गदर्शन :खानिवडे

नायगांव पूर्व विभागातील जुचंद्र गावात (छत्रपती शिवाजी महाराज चौक) येथील भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा कार्यालयात जुचंद्र परिसरातील नव्याने तयार केलेल्या महिला बचत गटासाठी पहिल्यांदाच मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले होते. वसई विधानसभा आमदार स्नेहा दुबे पंडित यांच्या मार्गदर्शनात तसेच जिल्हाध्यक्षा प्रज्ञाताई पाटील यांच्या नेतृत्वात महिला मोर्चाच्याहर्षलाप्रविण गावडे यांनी आयोजन केले होते. ह्या महिला बचत गटाच्या मार्गदर्शन शिबिराला वसई पूर्व दक्षिण मंडळाचे अध्यक्ष उदय शेट्टी, अल्पसंख्यांक महिला मोर्चाच्..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121