नवी दिल्ली : लोकसभेचे कामकाज दि. ८ ऑगस्ट रोजी तहकूब केल्यानंतर दुपारी १२ वाजता पुन्हा सुरू झाले. यादरम्यान अविश्वास ठरावावर चर्चा सुरू झाली. तेव्हा श्रीकांत शिंदेंनी सावरकर आणि हिंदुत्वांच्या मुद्याला हात घातला. श्रीकांत शिंदे म्हणाले की, २०१९ मध्ये हिंदूत्वाची साथ सोडून मविआसोबत गेलेल्यांनी खरी गद्दारी केली.१३ कोटी मतदारांशी ठाकरेंनी गद्दारी केली. आम्ही बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन जाण्याचे काम केले. इतकेच नाही तर काही लोक समाजवादीच्या इंडिया आघाडीत देखील सामील झाले. ज्या समाजवादीने कारसेवकांवर गोळ्या चालवण्याच काम केले होते, त्यामुळे खरे गद्दार कोण हे तुम्हीच ओळखावे.
तसेच काही लोकांच्या सत्ताकाळात महाराष्ट्रात हनुमान चालिसा म्हणायला बंदी होती. हनुमान चालिसा बोलणाऱ्यांना तुरुंगात टाकण्यात आले. त्यांच्यावर देशद्रोहाचा आरोप लावण्यात आले, असा दावा ही श्रीकांत शिंदेंनी केला. त्याचवेळी भरसभेत शिंदेंनी हनुमान चालिसा ही बोलून दाखवली.
दरम्यान स्वांतत्र्यवीर सावरकरांच्या विचारावर शिवसेना पक्ष तयार झाला. त्यामुळे सावरकराचे विचार बाळासाहेब सुद्धा मानायचे. पण आज परिस्थिती अशी आली आहे की, सावरकरांना शिव्या देणाऱ्यासोबत काही लोक आघाडीत करतात. त्यामुळे हीच इंडिया आहे का? ,असा टोला ही श्रीकांत शिंदेंनी लगावला.