हनुमानच्या मुर्तीची विटंबना! अमजद खानच्या घरावर चालवले बुलडोझर; एनएसए लावण्याची मागणी

    31-Jul-2023
Total Views | 1053
 bulldozer
 
भोपाळ : मध्य प्रदेशातील डिंडोरी जिल्ह्यातील शाहपुरा येथील हनुमान मूर्तीचा अपमान करणाऱ्या अमजद खानचे घर बुलडोझर चालवून पाडण्यात आले आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, दिंडोरी जिल्ह्यातील शाहपुरा येथे आई शारदा टेकडीवर हनुमानाचे मंदिर आहे.
 
अमजद खान आणि फिरोज खान यांनी मंदिरात ठेवलेल्या हनुमानाच्या मूर्तीचा अपमान केला होता. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर हिंदू संघटनांनी आरोपींवर राष्ट्रीय सुरक्षा कायद्यानुसार (एनएसए) कारवाई करण्याची तसेच घर पाडण्याची मागणी केली होती.
 
याप्रकरणी हिंदू संघटनांनी पोलीस ठाण्याचा घेराव केला होता. दरम्यान, अमजद खान यांच्या घराचे बेकायदा बांधकाम प्रशासनाने जमीनदोस्त केले आहे. ही कारवाई होत असताना अमजद खान यांच्या घराला कुलूप होते. अमजद खान यांच्या कुटुंबीयांनीही शाहपुरा सोडल्याचे सांगितले जात आहे.
 
मात्र तरीही हिंदू संघटनांचा विरोध संपलेला नाही. आणखी एक आरोपी निलंबित वनरक्षक फिरोज खान याच्या घरावर बुलडोझर चालवण्याची मागणीही हिंदू संघटनांनी केली आहे. फिरोजचे घर शहडोल जिल्ह्यात असल्याचे बोलले जात आहे. दोन्ही आरोपींवर एनएसए अंतर्गत कारवाई करण्याचा प्रस्ताव मंत्रालयाकडे पाठवण्यात आल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121