जितेंद्र आव्हाडांच वक्तव्य आक्षेपार्ह, संवेदनशीलपणे बोलावं!

    22-Apr-2023
Total Views |
 
Devendra Fadanvis
 
 
मुंबई : रामनवमी आणि हनुमान जयंतीच्या मिरवणुका निघतात त्यामध्ये दंगली होतात असे, वादग्रस्त विधान जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून घाटकोपरमध्ये सभेत बोलताना आव्हाडांनी हे विधान केले होते. दरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आव्हाडांच्या या वक्तव्याचा समाचार घेतला.
 
उपमुख्यमंत्री म्हणाले, "जितेंद्र आव्हाडांच वक्तव्य आक्षेपार्ह आहे. त्यांनी संवेदनशीलपणे बोलावं. लोकांच्या मनात राम आणि हनुमानाबद्दल श्रध्दा आहे. रामनवमी आणि हनुमान जयंती अत्यंत शांतपणे ती साजरी केली जाते. त्यामुळे हा समाजाचा अपमान आहे. अशाप्रकारची वक्तव्य करणं ही चुकीची आहेत. भविष्यात दंगली होतील असं आव्हाडांनी केलेल्या वक्तव्याचा अर्थ नेमका घ्यायचा? दंगली घडवण्याचं तुम्ही ठरवलं आहे का?" असा सवाल यावेळी फडणवीसांनी उपस्थित केला.