ईद मिरवणुकीवेळी हनुमान मंदिरावर जिहाद्यांची दगडफेक

    16-Sep-2024
Total Views |

Stone Pelting
 
भोपाळ : ईद मिलादुन्नीच्या मिरवणुकीत मध्य प्रदेशातील मंदसौर येथे हनुमान मंदिरावर दगडफेक (Stone Pelting) करण्यात आली आहे. यामुळे याभागात हिंसाचार झाला आहे. मिरवणुकीत हनुमान मंदिरावर करण्यात आलेल्या दगडफेकीत एक भाविकाला जबर मार बसला असून तो जखमी झाला आहे. याप्रकरणी आता हिंदू एकटवले असून त्यांनी हनुमान मंदिरासमोर हनुमान चालीसाचे पठण करायला सुरूवात केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपींवर गुन्हा दाखल केला असून ही घटना १६ सप्टेंबर रोजी घडली आहे.
 
प्रसारमाध्यमानुसार, ही घटना मंदसौरच्या नेहरू बस स्थानक परिसरात घडली. याचठिकणी बालजीचे मंदिर आहे. जिथे हनुमानाचे मंदिर आहे. हे मंदिर हिंदूंसाठी श्रद्धेचे मुख्य केंद्र मानले जाते. याचठिकाणी सोमवारी अल्पसंख्यांकांनी ईदच्या मिरवणुकीत मंदिराच्या परिसराठिकाणी जाताना शेकडो जमावांपैकी काहींनी मंदिरावर दगडफेक केली.
 
मिरवणुकीतून फेकलेले दगड हे मंदिरात उपस्थित असलेल्या एका भाविकाला लागला होता. यामध्ये तो जखमी झाला होता. दरम्यान, या प्रकरणाची माहिती मिळताच हिंदू संघटनांनी संताप व्यक्त केला. त्यावेळी त्यांनी आता रस्त्यावर उतरत आंदोन केले आणि निदर्शनही दाखवली आहे. यावेळी काही स्थानिक व्यापाऱ्यांचाही पाठिंबा मिळाला आणि बाजारपेठा बंद करण्यात आल्या.
 
याप्रकरणाची माहिती पोलिसांना समजताच त्यांनी घटनास्थळी जाऊन वातावरण शांत करण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र घटनास्थळी उपस्थित असलेल्यांनी पोलिसांनी ही घटना अगदी हलक्यात घेतली असल्याचा दावा केला आहे. यावेळी प्रशासकीय अधिकारी त्याठिकाणी होते. बालाजी मंदिराचे पुजारी यांनी घटनास्थळी जाऊन दगडफेक करणाऱ्यांविरोधात तक्रार दाखल केली. याप्रकरणात पोलिसांनी संबंधित डगडफेक करणाऱ्यास लवकरात लवकर अटक करण्यात यईल असे सांगितले.
 
यावेळी दगडफेक करणाऱ्यांचे काही फुटेज हे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद करण्यात आले. तसेच याप्रकरणी घटनास्थळी आणि वाद पेटण्याची शक्यता असलेल्या ठिकाणी पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.