नवी दिल्ली : कर्नाटकातील बंगळुरु येथे 'हनुमान चालिसा' वाजविल्याबद्दल जमावाने दुकानात घुसून मुकेशला मारहाण करण्यात आली आहे. दरम्यान, सदर मारहाणीप्रकरणी व्यपाऱ्यांकडून जोरदार निषेध करण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी या घटनेविरुध्द एफआयआर दाखल केली आहे.
दरम्यान, सदर मारहाणीसंदर्भात कर्नाटक पोलिसांनी जातीय अँगल नाकारला असून निषेधानंतर एफआयआर दाखल केली आहे. दि. १७ मार्च रोजी संध्याकाळी ६ वाजण्याच्या सुमारास मुकेश त्यांच्या दुकानात हनुमान चालीसा ऐकत होते. त्यानंतर हनुमान चालीसा चालविल्यानंतर काही कालावधीतच सहा-सात तरुण दुकानात पोहोचले. त्यांनी अजानची वेळ सांगत त्यांनी मुकेशला हनुमान चालीसा थांबवण्यास सांगितले.
बंगळुरु येथील एका हिंदू दुकानदाराला मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, मुकेश नावाचा हा दुकानदार हनुमान चालीसा वाजवत होता. ही घटना रविवारी दि. १७ मार्च २०२४ रोजी घडली. व्यापाऱ्यांच्या एकजुटीनंतर पोलिसांनी या प्रकरणी ६ जणांविरुद्ध एफआयआर नोंदवला असून ३ जणांना अटक केली आहे. पोलिसांनी या प्रकरणात जातीय संबंध नाकारला आहे.
'अजान'च्या वेळी त्याच्या दुकानात 'हनुमान चालीसा' वाजवल्याबद्दल मुकेशला मारहाण झाल्याचा आरोप आहे. या घटनेचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ही घटना बेंगळुरूच्या नागरथपेट भागात घडली. सिद्दण्णा लेआउटजवळ मुकेश यांचे मोबाईलचे दुकान आहे. अजानची वेळ सांगताना त्यांनी मुकेशला हनुमान चालीसा थांबवण्यास सांगितले. मुकेशने याला नकार दिल्याने दोन्ही पक्षांमध्ये वाद सुरू झाला.
सदर वादानंतर या लोकांनी मुकेशला मारहाण केली. भांडण दुकानाबाहेर पडून रस्त्यावर पोहोचले. या भांडणात मुकेशचे कपडेही फाटले. या घटनेचा व्हिडिओही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये हनुमान चालीसा थांबवण्यासाठी आलेला तरुण आक्रमक पद्धतीने वर्तन करताना दिसत आहे.