रमजानच्या काळात ढाबा उघडल्याने जमावाकडून धारदार शस्त्रांनी हल्ला!

    18-Mar-2024
Total Views | 78
bangladesh-sylhet-for-being-open-in-ramzan


 
नवी दिल्ली :   रमजानच्या काळात एका हिंदूने ढाबा उघडल्यामुळे सदर व्यक्तीवर जीवघेणा हल्ला झाल्याची घटना घडली आहे. हिंदू व्यक्तीने रमजान काळात ढाबा सुरू ठेवल्याने सोहेल नामक व्यक्तीच्या नेतृत्वाखाली जमावाने सदर व्यक्तीवर धारदार शस्त्रांनी हल्ला करण्यात आला आहे. दरम्यान, सदर घटना ही बांगलादेशमध्ये घडली असून सदर व्यक्तीचे पैसेदेखील लुटण्यात आले आहेत.

दरम्यान, हल्ला झालेल्या व्यक्तीचे नाव राजीव कुमार डे असे असून सोहेल व त्याच्या साथीदारांकडून रमजानच्या सुरूवातील देणगीही मागण्यात आली होती, तसेच राजीव कुमार डे यांनी देणगी देण्यास नकार दिल्यामुळेच त्यांच्यावर धारदार शस्त्रांनी हल्ला करण्यात आल्याची शक्यता वर्तविली जात आहे.


हे वाचलंत का? - 'इंडी' आघाडीत सगळेच इंजिन, बोगी नाहीच!


बांगलादेशातील सिल्हेटमध्ये एका मुस्लिम कट्टरवाद्याने हिंदू खाद्यपदार्थांच्या दुकानावर हल्ला केला. सदर खाद्यपदार्थ दुकान रमजानच्या काळात दिवसा खुले होते. महत्त्वाचे म्हणजे, सदर घटना दि. १५ मार्च रोजी घडली. दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, सोहेल हुसैन असे मुस्लिम हल्लेखोराचे नाव असून बांगलादेशातील सत्ताधारी अवामी लीगची विद्यार्थी संघटना 'छात्र लीग'चा तो नेता असल्याचे सांगितले जाते.

राजीव कुमार डे असे बांगलादेशातील हिंदू पीडितेचे नाव असून रमजानच्या काळात डे यांनी त्यांचे दुकान दिवसाही उघडे ठेवले होते परंतु, रमजानमध्ये उपवास करणारे (रोजेदारां) मुळे दुकानासमोर पडदा टांगला गेला. दरम्यान, रमजानदिवशी दुकान सुरू ठेवण्यामागचे कारण डे यांनी सांगितले की, त्यांनी हे दुकान या रुग्णालयात येणाऱ्या हिंदू रुग्णांसाठी आणि सेवकांसाठी उघडले होते. परंतु, राजीव कुमार डे दररोज संध्याकाळी मुस्लिमांना इफ्तारी विकत असल्याने सोहेल आपल्या गुंडांसह डे यांच्या शॉपमध्ये पोहोचला आणि रमजानवर मुस्लिमांच्या भावना दुखावल्याचा आरोप करत त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला.



 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121