नवी दिल्ली, भारत आणि जपान २०२९-३० मध्ये एकाच वेळी शिंकानसेनची नवीनतम आवृत्ती, अल्फा-एक्स ज्याला E10 म्हणूनही ओळखले जाते ती सादर करण्यास सज्ज आहेत. सर्वात प्रगत इ१०च्या संचलनातून हाय-स्पीड रेल्वे तंत्रज्ञानात भारताची महत्त्वपूर्ण झेप दर्शवते.
नुकताच, बुलेट ट्रेन प्रकल्पाने बीकेसी आणि ठाणे दरम्यानच्या २१ किमी लांबीच्या समुद्राखालील बोगद्याच्या दिशेने जाणाऱ्या बोगद्याच्या ब्रेक थ्रू पार पाडत एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. याचसोबत, बुलेट ट्रेन प्रकल्पाने अलीकडेच ३१० किमी लांबीच्या व्हायाडक्ट बांधकाम पूर्ण करून एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. महाराष्ट्रात बांधकामाचे कामही वेगाने सुरू आहे. त्याच वेळी, ऑपरेशन्स आणि कंट्रोलसाठी सिस्टीम खरेदी करण्याची प्रगती देखील सुरू आहे.
शिंकानसेन E5 ज्याचा वेग ३२० किमी प्रतितास आहे, ही भारताची हाय-स्पीड रेल्वे प्रणालीसाठी पूर्वीची योजना होती. मात्र, आता भारतात शिंकानसेन E10 सादर करण्यावर सहमती झाली आहे, जी ४०० किमी प्रतितास या उच्च गतीसह एक सुधारित आवृत्ती आहे. E5 मालिका ही एक जपानी शिंकानसेन हाय-स्पीड ट्रेन आहे जी ५ मार्च २०११पासून पूर्व जपान रेल्वे कंपनीद्वारे तोहोकू शिंकानसेन सेवांवर चालविली जाते. जपान आणि भारत यांच्यातील धोरणात्मक भागीदारीच्या भावनेतून, जपान सरकारने मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पात E10 शिंकानसेन गाड्या सुरू करण्यास सहमती दर्शविली आहे.
यात सार्वधिक लक्षवेधी म्हणजे E10 भारत आणि जपानमध्ये एकाच वेळी लॉन्च केली जाईल. मुंबई-अहमदाबाद हाय-स्पीड रेल (एमएएचएसआर) प्रकल्पाचे यश भारतातील भविष्यातील बुलेट ट्रेन कॉरिडॉरचा पाया रचत आहे. भविष्यातील कॉरिडॉरवरही सक्रिय विचार सुरू आहे. विकासाची ही उल्लेखनीय गती, अत्याधुनिक जागतिक तंत्रज्ञानाचा वापर करून जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधांची अंमलबजावणी करण्याची भारताची क्षमता दर्शवते. या परिवर्तनाच्या प्रवासात जपान एक विश्वासू भागीदार म्हणून महत्त्वाची भूमिका बजावत आहे.