क्रांतीज्योती महात्मा फुले यांच्या जीवनावर आधारित 'फुले' चित्रपटातील काही दृश्यांना सेन्सॉर बोर्डाकडून कात्री लावण्यात आली आहे. याविरोधात वंचित बहुजन आघाडीकडून शुक्रवार, ११ एप्रिल रोजी पुण्यातील फुले वाड्यासमोर आंदोलन करण्यात आले.
Read More
वंचित बहुजन आघाडीला जास्त संख्याबळ मिळाले तर आम्ही सत्तेत राहण्याचा पर्याय निवडू, अशी घोषणा वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. शुक्रवार, २२ नोव्हेंबर रोजी त्यांनी आपल्या 'X' अकाऊंटवर याबाबत एक सूचक पोस्ट केली आहे.
(Prakash Ambedkar) एकीकडे सज्जाद नोमानींनी मुस्लिम समाजाला महाविकास आघाडीला मतदान करावं असं व्होट जिहादचे जाहीर आव्हान केले आहे. तर दुसरीकडे "तुमचं मत मोहम्मद पैगंबराच्या नावाने वंचित ला द्या", असं आवाहन वंचित बहुजन आघाडीच्या प्रकाश आंबेडकरांनी मुस्लिम समाजाला केले आहे. यासंदर्भात प्रसारमाध्यमांशी बोलत असतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रसारित करण्यात आला आहे. मोहम्मद पैगंबर बिलाचे कायद्यात रुपांतर करायचे असेल तर मुस्लिम बांधवांनी वंचितला मतदान करावं असं म्हणत प्रकाश आंबेडकरांनी मुस्लिम समाजाला साद घातली आहे.
"Manoj Jarange Patil यांनी निवडणुकीत उमेदवार न देता पाडापाडी करणार असल्याची घोषणा केली आहे. आमचा त्यांना सवाल आहे की ते दाऊदशी संबंधित असलेल्या पक्षाचे उमेदवार पाडणार आहेत की त्यांना जिंकवणार आहेत", असा सवाल वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर यांनी मनोज जरांगे यांना केला आहे.
( Vanchit Bahujan Aghadi ) स्वराज इंडिया पक्षाचे संस्थापक तसेच भारत जोडो अभियानाचे राष्ट्रीय संयोजक योगेंद्र यादव यांच्या अकोल्यातील विचारसभेमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सोमवारी दि. २१ ऑक्टोबर रोजी गोंधळ घातला. कार्यक्रमादरम्यान धक्काबुक्की, घोषणाबाजी करून खुर्च्यांची तोडफोड करण्यात आली. या गोंधळामुळे त्या भागात काही काळ चिंताजनक वातावरण निर्माण झाले होते.
विधानसभा निवडणूकीसाठी एकीकडे महायूती आणि महाविकास आघाडीचे जागावाटप सुरु असताना आता वंचित बहुजन आघाडीने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी शनिवारी पत्रकार परिषद घेत विधानसभेच्या ११ उमेदवारांची यादी जाहीर केली.
प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वात वंचित बहुजन आघाडीकडून राज्यात आरक्षण बचाव यात्रेचे आयोजन करण्यात आले असून चैत्यभूमीवरून या यात्रेला सुरुवात झाली आहे. राज्यातील २२ जिल्ह्यांमध्ये ही आरक्षण बचाव यात्रा सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.
लोकसभेच्या निकालात अपेक्षित निकाल न लागल्याने साहजिकच भाजप-रालोआच्या गोटाच मोठी उलथापालथ झाली. महाराष्ट्रातील सर्वात बलशाली पक्ष असलेल्या भाजपच्या जागा २३ वरून थेट नऊपर्यंत खाली आल्या. उलटपक्षी २०१९ साली एका जागेवर स्थिरावलेल्या काँग्रेसने १३ जागांवर मुसंडी मारली. एकाएकी असा उलटफेर का झाला? त्याचे चिंतन भाजपचे धुरीण करतीलच. पण, आकडेवारीवर नजर फिरवता, आश्चर्यकारक माहिती समोर येते.
विधानसभा निवडणूकांमध्ये वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस एकत्र लढणार असल्याचे वक्तव्य वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे. त्यांनी शनिवारी माध्यमांशी संवाद साधला. दरम्यान, त्यांच्या या विधानाने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
राज्यात लोकसभा निवडणूकांची रणधूमाळी सुरु असतानाच आता वंचित बहुजन आघाडीने काँग्रेसला मोठा धक्का दिला आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या महासचिव उत्कर्षा रुपवते यांनी वंचितमध्ये प्रवेश केला आहे. दरम्यान, त्या लोकसभा निवडणूक लढवण्याचीही शक्यता वर्तवण्यात येत आहे.
वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांना प्रेशर कुकर, तर रासपचे अध्यक्ष महादेव जानकर यांना शिट्टी ही निषाणी देण्यात आली आहे. मंगळवार, दि. ८ एप्रिल रोजी निवडणूक आयोगाने यासंदर्भातील यादी जाहीर केली.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ( nana patole ) यांनी पुन्हा प्रकाश आंबेडकरांना युती करण्याची साद घातली आहे. अजुनही वेळ गेलेली नाही. आपल्याकडे अर्ज मागे घेण्यापर्यत वेळ आहे अस त्यांनी प्रकाश आंबेडकरांना उद्देशुन म्हटलं आहे. अकोल्यामध्ये काँग्रेसचे उमेदवार अभय पाटील यांना उमेदवारी दिली आहे. त्यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आले असताना नाना पटोलेंनी हे वक्तव्य केलं.
वंचित बहुजन आघाडीने अमरावती लोकसभा मतदारसंघात रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांना पाठींबा देण्याचे जाहीर केले आहे. वंचितच्या प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर यांनी आनंदराज आंबेडकरांना पत्र लिहिले असून उमेदवारी अर्ज मागे न घेण्याची विनंती केली आहे.
वंचित बहुजन आघाडी अधिकृतरित्या महाविकास आघाडीतून बाहेर पडत आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याची घोषणा करताना वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी ठाकरे-पवारांच्या च्या घराणेशाहीवर टीका केली ते म्हणाले की, "ठाकरे-पवारांना 'वंचित'चा वापर घराणेशाही वाचवण्यासाठी करायचा होता, त्यांची घराणेशाही वाचवण्यास आम्ही नकार दिला आहे"
उबाठा गटाचे नेते संजय राऊत यांनी वंतिच बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांना चार जागांचा ( 4 seats to Vanchit in MVA ) प्रस्ताव कायम आहे. असं म्हटलं आहे. महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा तिढा आजही कायम आहे. त्यात प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडीला १२ जागांची मागणी केली होती. महाविकास आघाडीतील चारही पक्ष १२ १२ जागा लढवतील अशी त्यांची इच्छा होती.
प्रकाश आंबेडकर सोबत नसले तरी आम्ही जिंकू, असा विश्वास उबाठा गटाचे नेते संजय राऊतांनी व्यक्त केला आहे. सध्या वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीमध्ये सहभागी होण्याबाबत शंका व्यक्त करण्यात येत आहे. यातच आता संजय राऊतांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी सोमवारी माध्यमांशी संवाद साधला.
महाविकास आघाडीसोबत सूर जुळत नसल्यामुळे वंचित बहुजन आघाडीने लोकसभा निवडणूक स्वबळावर लढविण्याचे जवळपास निश्चित केले आहे. २८ मार्च रोजी प्रकाश आंबेडकर अकोला मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. मविआने त्यांना पाठविलेला चार जागांचा प्रस्ताव त्यांनी धुडकावला आहे.
प्रकाश आंबेडकरांनी आमचा प्रस्ताव मान्य केला असता तर आम्हाला आनंद झाला असता, असे वक्तव्य उबाठा गटाचे नेते संजय राऊत यांनी केले आहे. त्यामुळे महाविकास आघाडी आणि वंचित बहूजन आघाडीमध्ये बिनसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो’ हा आवाज कानावर पडताच क्षणी साक्षात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे डोळ्यांसमोर उभे राहतात. बाळासाहेबांच्या पश्चात उद्धव ठाकरे यांनी त्यांचे अनुकरण करीत, या घोषवाक्याद्वारे शिवसैनिकांना साद घालण्याचा प्रयत्न केला; पण त्याला कधीही ’ठाकरे’ शैलीची धार चढली नाहीच. केवळ ‘बाळासाहेबांचा पुत्र’ म्हणून उद्धवरावांनी मान-सन्मान पदरात पाडून घेतला खरा; पण त्यांना तो फारकाळ टिकवता आला नाही.
महाविकास आघाडीमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या जागावटपाचा तिढा अजूनही सुटलेला नाही. त्यामुळे प्रकाश आंबेडकर मविआमध्ये वंचित राहणार का? असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे. शनिवारी महाविकास आघाडीची महत्वाची बैठक पार पडली असून जागावाटप निश्चित करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
महाविकास आघाडीने वंचित बहुजन आघाडीला ( Vanchit Bahujan Aaghadi ) ४ जागांचा प्रस्ताव दिल्याची माहीती संजय राउत यांनी दिली आहे. देशभरात लोकसभा निवडणुकांची धामधुम सुरु झाली आहे. भाजपने आत्तापर्यंत उमेदवारांच्या दोन याद्या जाहीर केल्या आहेत. भाजपने महाराष्ट्रात लोकसभेसाठी २० उमेदवारांची घोषणा केली आहे. महायुतीच्या जागा आणि उमेदवार सोमवारपर्यंत जाहीर होतील असंही शिवसेना नेते संजय शिरसाट यांनी म्हटलं आहे.
वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडी(मविआ)मध्ये सहभागी होणार का, या प्रश्नाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. आगामी लोकसभा निवडणुकीकरिता महाराष्ट्रात वंचितला सोबत घेण्यासाठी मविआकडून प्रयत्न सुरू आहेत. परंतु, राज्यातील ४८ जागावाटपासंदर्भात महाविकास आघाडीत एकजूट पाहायला मिळत नाही. दरम्यान, संजय राऊत म्हणाले, वंचित बहुजन आघाडीला फक्त चार जागा देण्यात येतील.
महाविकास आघाडीसोबत अजून युती झालेली नाही. त्यामुळे त्यांच्या बैठकीला जाऊ नका, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी कार्यकर्त्यांना केले आहे. माझ्या आदेशाशिवाय कुठल्याही बैठकीला जाऊ नका असेही ते म्हणाले आहेत.
महाविकास आघाडीसोबत अजून वंचित बहुजन आघाडीची युती झालेली नाही. त्यामुळे माझ्या आदेशाशिवाय त्यांच्या बैठकीला जाऊ नका, असे आवाहन वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी केले आहे. दरम्यान, त्यानंतर महाविकास आघाडीकडून सारवासारव करण्यात येत असल्याने त्यांच्यात काहीही आलबेल नसल्याचे चित्र स्पष्ट होत आहे.
वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीसोबत गेली असली तरी त्यांच्यात काही आलबेल असल्याचे दिसत नाही. वंचित बहुजन आघाडीकडून सतत मविआवर वेगवेगळे आरोप करण्यात येत आहेत. दरम्यान, आता वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी थेट भाजपमध्ये जाण्याचा सूचक इशारा दिला आहे. ते टीव्ही ९ मराठी या वृत्तवाहिनीशी संवाद साधत होते.
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बुधवारी महाविकास आघाडीची बैठक पार पडली. या वेळी वंचित बहुजन आघाडीने मनोज जरांगेंना जालना मतदारसंघातून उमेदवारी देण्याची मागणी केली आहे. तसेच पुणे लोकसभा मतदारसंघातून अभिजित वैद्य यांना उमेदवारी देण्याची मागणीही करण्यात आली आहे.
महाविकास आघाडीमध्ये अजूनही जागावाटपाबाबत अंतिम निर्णय झालेला नसून आता वंचित बहुजन आघाडीने मविआला पत्र पाठवले आहे. दोन दिवसांत जागावाटपाचा फॉर्म्युला स्पष्ट करावा, अशी मागणी या पत्राद्वारे करण्यात आली आहे. वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रेखाताई ठाकूर आणि उपाध्यक्ष धैर्यवर्धन पुंडकर यांनी २२ फेब्रुवारी २०२४ रोजी उद्धव ठाकरे, शरदचंद्र पवार आणि मल्लिकार्जुन खर्गे यांना हे पत्र लिहिले आहे. तसेच रमेश चेन्नीथला, संजय राऊत, जयंत पाटील आणि नाना पटोले यांनादेखील हे पत्र पाठवण्यात आले असल्याचे सांगण्यात येत आहे.
ठाकरे गटाचे मराठवाडा संघटक डॉ. बी. डी. चव्हाण आणि अकोला जिल्ह्यातील विद्यमान ठाकरे गटाचे जिल्हा परिषद सदस्या गायत्री कांबे यांचे पती संगीत कांबे यांनी समर्थकांसह वंचित बहुजन आघाडीचे प्रवेश केला वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश केला आहे.
संजय राजाराम राऊतांनी जिथे जिथे पाऊल ठेवेलेलं आहे एकतर ते घर तुटलंय किंवा पक्ष फुटला आहे. उद्धवजी, पवार साहेब आणि काँग्रेस संपल्यानंतर आता वंचित बहुजन आघाडीकडे संजय राऊतांनी आपलं लक्ष वळवलेलं आहे, असा टोला भाजप आमदार नितेश राणेंनी लगावला आहे. मंगळवारी पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
आईचे पत्र हरवले, ते मला सापडले’ हा लहानपणीचा खेळ अनेकांच्या स्मरणातही असेल. सध्या महाविकास आघाडीतील घटक पक्षांत असाच काहीसा पत्रांचा खेळ रंगलेला दिसतो. वंचित बहुजन आघाडीचा ’मविआ’त समावेश करण्यासाठी सुरू असलेला हा खेळ. प्रकाश आंबेडकरांना सोबत घेण्यासाठी ठाकरे गट आग्रही असला, तरी काँग्रेस आणि शरद पवार फारसे उत्सुक नाहीत. त्यांच्या पक्षाच्या धरसोड वृत्तीचा पूर्वानुभव गाठीशी असल्यामुळे, ते ’ताकही फुंकून पिण्याच्या’ भूमिकेत आहेत.
भाजपची साथ सोडा आणि वंचितसोबत या अशी थेट ऑफर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना दिली आहे. मंगळवारी माध्यमांशी संवाद साधताना प्रकाश आंबेडकरांनी ही ऑफर दिली.
वंचित बहुजन आघाडी आणि महाविकास आघाडी एकत्र येण्याच्या चर्चा रंगल्या असतानाच आता प्रकाश आंबेडकरांनी मविआला दणका दिला आहे. वंचित बहुजन आघाडीने लोकसभेच्या १२ जागा मिळवण्याची इच्छा व्यक्त केल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी निवडणुकांबाबत एक मोठे विधान केले आहे. कुणी सोबत नसेल तर ४८ जागा ताकदीनं लढू, असा इशारा त्यांनी महाविकास आघाडीला दिला आहे. साने गुरुजींच्या जयंती निमित्त आयोजित करण्यात आलेल्या संविधान निर्धार सभेत ते बोलत होते.
वंचित बहुजन आघाडीकडून शनिवार दिनांक २५ नोव्हेंबर रोजी छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर संविधान सन्मान महासभेचे आयोजन करण्यात आले आहे. या महासभेसाठी प्रकाश आंबेडकरांसह त्यांचे हजारो समर्थक आणि भीम सैनिक एकत्रित येणार आहेत. एकीकडे प्रकाश आंबेडकरांच्या या रॅलीची चर्चा असताना महाराष्ट्राची हास्य जत्रा फेम गौरव मोरेचा या महासभेबाबतचा एक व्हिडिओ समोर आला आहे.
“शिवसेना पक्षाचे नाव आणि चिन्हदेखील एकनाथ शिंदे यांच्या गटाला मिळाल्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या गटाला नवीन पक्ष स्थापन करावा लागणार आहे. त्यासाठी किमान सहा महिन्यांचा कालावधी जाईल. अशा परिस्थितीत उद्धव यांच्या गटाला एक राजकीय पक्ष म्हणून निवडणुकीपासून वंचित राहवे लागू शकते,” असे भाकीत वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी वर्तविले आहे.
“अनेक दिवस चाललेले चर्चेचे गुर्हाळ, गुप्त बैठका आणि प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे दिलेल्या इशार्यानंतर अखेरीस वंचित बहुजन आघाडी आणि ठाकरे गटाच्या युतीवर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि वंचित बहुजनच्या प्रकाश आंबेडकर यांनी सोमवार, दि. २३ जानेवारी रोजी संयुक्तपणे पत्रकार परिषद घेत युतीची घोषणा केली आहे. या नव्या समीकरणामुळे महाविकास आघाडीच्या (मविआ) कडबोळ्यात चौथ्या भिडूची ‘एण्ट्री’ झाली आहे, अशी चर्चा जनसामान्यात रंगली आहे.
‘सत्तेपासून दूर राहिलेल्या बहुजनांची आघाडी’ असे शिवसेना आणि नव्या मित्रपक्षांचे गणित आहे. ज्यांचे घोडे सत्तेच्या गंगेत कधीच न्हाले नाही, त्यांना सोबत घेऊन उद्धव ठाकरे गतीने गर्तेत चालले आहेत.
केंद्र सरकारने कृषी क्षेत्राशी संबंधित तीन कायदे लागू केल्याने संपूर्ण देशातील वातावरण ढवळून निघाले आहे. सदर कायद्यांवर काही आक्षेप असल्याने याविरोधात शेतकऱ्यांनी दंड थोपटले आहेत.
दि. ८ सप्टेंबर १९८५ रोजी ‘वंचित विकास’ या ट्रस्टची पुण्यात स्थापना झाली. समाजातील अपंग, रोगी व्यक्तींसाठी केलेले काम म्हणजे फक्त सेवाकार्य आहे. पण, समाजाचे घटक असूनही आपल्या अधिकारांपासून वंचित असे दलित, भटके-विमुक्त, वनवासी, वेश्या आणि सर्व समाजातील स्त्रिया या वंचित गटांसाठी काम करणार्या ‘वंचित विकास’ ट्रस्टच्या कार्याचा घेतलेला हा मागोवा.
प्रकाश आंबेडकरांची घोषणा
ऐन विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर वंचित बहुजन आघाडीत फूट पडल्याचे स्पष्ट होते. जागावाटपामध्ये प्रकाश आंबेडकरांनी असमानता राखल्याने आपण हा निर्णय घेतल्याचे इम्तियाज जलील यांनी पत्रकात म्हणले आहे. यावर प्रकाश आंबेडकर यांनी अजून कोणतीही भूमिका स्पष्ट केली नाही.
युती किंवा आघाडी केली म्हणजे मतांची बेरीज होतेच, असे नाही. हे वास्तव समोर असूनही आज वंचितचे नेते काँग्रेसकडे १४४ जागा व मुख्यमंत्रिपद कशाच्या बळावर मागत आहेत?
बुतपरस्तांशी ओवेसींनी केलेली युती केवळ राजकीय फायद्यासाठीची, मुघलांची देशावरची कथित मालकी परत मिळवण्याच्या उद्दिष्टातली एक पायरी असते. त्यात दलितांच्या, बौद्धांच्या किंवा आंबेडकरी जनतेच्या श्रद्धा-आस्थेचा मानसन्मान ठेवण्याची त्यांना गरज वाटत नाही. हे समजून घेऊन प्रकाश आंबेडकरांनी व त्यांच्या कार्यकर्त्यांनी आता तरी जागे व्हावे.
मुळातच कच्चा लिंबू असल्याने त्याच्या म्हणण्याकडे ना कोणी लक्ष देत, ना कोणी थेट झिडकारून टाकत. तेव्हा मात्र हा कच्चा लिंबू मानभावीपणाने ‘मी नाही येणार बुवा तुमच्यात,’ असे म्हणत स्वतःच फार मोठा तीर मारल्याच्या आविर्भावात वागताना पाहायला मिळते. आज काँग्रेसशी डाव मोडल्याचे सांगणाऱ्या प्रकाश आंबेडकरांची अवस्था अगदी तशीच झाल्याचे दिसते.
ओवैसी बंधूंच्या एमआयएम या पक्षाशी हातमिळवणी करत ‘वंचित-बहुजन आघाडी’ ची स्थापना करणारे भारिप-बहुजन संघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीला ठेंगा दाखवत आपण स्वबळावरच निवडणूक लढविणार असल्याचे जाहीर केले.