वंचितला चार जागांचा प्रस्ताव कायम; प्रकाश आंबेडकरांशी आजही चर्चा करु

संजय राऊतांचे स्पष्टीकरण

    26-Mar-2024
Total Views |

vba
 
मुंबई: उबाठा गटाचे नेते संजय राऊत यांनी वंतिच बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांना चार जागांचा ( 4 seats to Vanchit in MVA ) प्रस्ताव कायम आहे. असं म्हटलं आहे. महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा तिढा आजही कायम आहे. त्यात प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडीला १२ जागांची मागणी केली होती. महाविकास आघाडीतील चारही पक्ष १२ १२ जागा लढवतील अशी त्यांची इच्छा होती.
 
हा प्रस्ताव सहाजिकच महाविकास आघाडीने मान्य केला नाही परंतु वंचित बहुजन आघाडीला चार जागांचा प्रस्ताव दिला. त्यानंतर प्रकाश आंबेडकरांनी आम्हाला चार जागांचा प्रस्ताव दिलेला नाही असेही म्हटले होते. त्यामुळे वंचितच्या महाविकास आघाडीतील समावेशाचा पेच कायम आहे.
 
 
प्रकाश आंबेडकरांनी ही निवडणुक स्वबळावर लढवण्याचा निर्णय घेतल्याचं सांगितलं जात होतं. पण आता संजय राऊत यांनी प्रकाश आंबेडकरांना चार जागांचा प्रस्ताव आजही खुला असल्याचं म्हटलं आहे. प्रकाश आंबेडकरांसोबत चर्चेचा पर्याय आजही खुला आहे असही ते म्हणाले.
 
दरम्यान, महाविकास आघाडीसोबत सूर जुळत नसल्यामुळे वंचित बहुजन आघाडीने लोकसभा निवडणूक स्वबळावर लढविण्याचे जवळपास निश्चित केले आहे. २८ मार्च रोजी प्रकाश आंबेडकर अकोला मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. मविआने त्यांना पाठविलेला चार जागांचा प्रस्ताव त्यांनी धुडकावला आहे.
 
 
याविषयी भाष्य करताना आंबेडकर म्हणाले, मी मविआला त्यांच्या चार जागा परत करीत आहे. आम्हाला चार जागा दिल्याचा प्रस्ताव त्यांनी दिला. मात्र प्रत्यक्षात आम्हाला अकोला आणि उर्वरित दोन जागा ऑफर केल्या. त्यामुळे त्यांनी खोटे बोलणे थांबवावे. आम्हाला कुठेतरी सामावून घ्यायचे, म्हणून त्यांचा प्रयत्न दिसतो आहे. त्यांचा निर्णय अद्याप झालेला नाही.
 
मविआमध्येच मतभेद आहेत. १५ जागांचा तिढा कायम आहे. काँग्रेसने उमेदवार यादी जाहीर केली, पण मतभेद असलेल्या मतदारसंघातील उमेदवार जाहीर केलेले नाहीत. काही मतदारसंघावर शिवसेनेने दावा केला आहे. त्यांच्याकडून पुन्हा प्रस्ताव आला, तर पुन्हा चर्चा करू, असेही प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले.

अग्रलेख
जरुर वाचा
हिंदू समाजाने जागृत होणे अत्यावश्यक: सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत

हिंदू समाजाने जागृत होणे अत्यावश्यक: सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला 100 वर्षे पूर्ण होतील. संघाचा जन्म, जन्मापासून करावा लागलेला संघर्ष, विस्तार व आज समाजातील सर्वच क्षेत्रांवर संघाचा पडलेला लक्षणीय प्रभाव, या सार्‍या प्रक्रियांबाबत समाजात, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरही कमालीचे कुतूहल आहे. यांसारख्या विविध विषयांवर ‘ऑर्गनायझर’चे संपादक प्रफुल्ल केतकर, ‘पांचजन्य’चे संपादक हितेश शंकर, सा. ‘विवेक’च्या संपादक अश्विनी मयेकर आणि मल्याळम दैनिक ‘जन्मभूमी’चे सहसंपादक एम. बालकृष्णन यांनी सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांच्याशी साधलेला हा विशेष संवाद.....

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121