"वंचितला जास्त संख्याबळ मिळाले तर आम्ही..."; प्रकाश आंबेडकरांचं सुचक विधान

    22-Nov-2024
Total Views |
 
Prakash Ambedkar
 
मुंबई : वंचित बहुजन आघाडीला जास्त संख्याबळ मिळाले तर आम्ही सत्तेत राहण्याचा पर्याय निवडू, अशी घोषणा वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. शुक्रवार, २२ नोव्हेंबर रोजी त्यांनी आपल्या 'X' अकाऊंटवर याबाबत एक सूचक पोस्ट केली आहे.
 
 
 
राज्यात यंदा महाविकास आघाडी आणि महायूती यांच्यात थेट लढत होती. तर दुसरीकडे, बच्चू कडूंच्या नेतृत्वातील तिसरी आघाडी आणि वंचित बहुजन आघाडीदेखील निवडणूकीच्या रिंगणात होती. वंचितने स्वबळावर निवडणूका लढवल्या असून आता सर्वांच्या नजरा निकालाकडे लागल्या आहे.
 
दरम्यान, निकालाच्या आधी प्रकाश आंबेडकरांनी आपल्या पाठिंब्याबाबत सूचक विधान केले. ते म्हणाले की, "जर उद्या वंचित बहुजन आघाडीला महाराष्ट्रात सरकार स्थापन करण्यासाठी पक्षाला किंवा युतीला पाठिंबा देण्याजोगे संख्याबळ मिळाले, तर आम्ही सरकार स्थापन करणाऱ्यांसोबत राहण्याचा पर्याय निवडू," असे ते म्हणाले.