वंचितच्या जागांचा तिढा सुटला! प्रकाश आंबेडकरांना मिळणार इतक्या जागा?

    05-Mar-2024
Total Views |
VBA Prakash Ambedkar

मुंबई : 
वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडी(मविआ)मध्ये सहभागी होणार का, या प्रश्नाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. आगामी लोकसभा निवडणुकीकरिता महाराष्ट्रात वंचितला सोबत घेण्यासाठी मविआकडून प्रयत्न सुरू आहेत. परंतु, राज्यातील ४८ जागावाटपासंदर्भात महाविकास आघाडीत एकजूट पाहायला मिळत नाही. दरम्यान, संजय राऊत म्हणाले, वंचित बहुजन आघाडीला फक्त चार जागा देण्यात येतील.


हे वाचलंत का? >>   पटोले-राऊत भिडले! शाहू महाराजांच्या उमेदवारीवरून वाद?
 
वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्याकडून जागांसंदर्भात यादी येईल, असे सांगतानाच राऊत म्हणाले, जर त्यांनी कोणती मागणी केली असेल तर त्यावर नक्कीच चर्चा होते. आगामी बैठकीत यावर लवकरच चर्चा होणार आहे, असेही संजय राऊत म्हणाले.


जागावाटपासंदर्भात 'मविआ'ची मुंबईत बैठक

मविआतील जागावाटपाचा तिढा लवकरच सुटण्याची शक्यता आहे. उद्या मुंबईत मविआच्या नेत्यांमध्ये जागांसंदर्भात चर्चा होणार आहे. या चर्चेअंती जागावाटपाची यादी येण्याची चिन्हे आहेत. मुंबईत होणाऱ्या लोकसभेच्या जागावाटपाबाबत बैठकीला वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांना निमंत्रण देण्यात आले आहे.

एकंदरीत, संजय राऊत यांनी म्हटले की, महाविकास आघाडीने वंचितसाठी ४ ते ५ जागा सोडणार आहे. त्यामुळे उद्या होणाऱ्या बैठकीला प्रकाश आंबेडकर उपस्थित राहणार का, तसेच, ते नेमकी काय भूमिका घेणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष असणार आहे.