'वंचित'चा महाराष्ट्र बंद मागे

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    24-Jan-2020
Total Views |
Maharashtra _1  
 


मुंबई : नागरिकत्व दुरुस्ती कायदा आणि एनआरसीविरोधात पुकारलेला महाराष्ट्र बंद अखेर वंचित बहुजन आघाडीने मागे घेतला आहे. वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी ही घोषणा केली. आम्ही कोणावरही हिंसाचारासाठी दबाव टाकलेला नव्हाता, असा दावा जरी त्यांनी केला असला तरीही बंदचे पडसाद राज्यभर उमटले. अनेक ठिकाणी वाहनांची जाळपोळ करण्यात आली, तसेच दुकानांची तोडफोडही करण्यात आली. या बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला.

 

सीएए आणि एनआरसी विरोधात पुकारलेल्या या बंदला ३५ संघटनांनी पाठींबा दिला होता, असा दावा आंबेडकर यांनी केला. मात्र, मुंबई आणि इतर प्रमुख शहरांत जनजीवन सुरळीत सुरू होते. तुरळक घटना वगळता आंदोलनाचा फारसा परिणाम जनजीवनावर झाला नाही. मुंबईतील घाटकोपर, चेंबूर आदी परिसरात आंदोलकांनी निदर्शने केली.

 

औरंगाबादमध्येही या बंदला हिंसक वळण मिळाले आहे. वाळूजला जाणाऱ्या सिटीबसवर दगडफेक करण्यात आली. यावेळी बसची काच फुटली. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे. मात्र हिंसक वळण लावणारे, तोडफोड करणारे कार्यकर्ते हे वंचित बहुजन आघाडीचे नाहीत असा दावा प्रकाश आंबेडकर यांनी केला. तसेच काही लोक बंदला जाणीवपूर्वक हिंसक वळण लावण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांना पोलिसांनी शोधून काढावे अशी मागणी केली.


वंचितने पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला राज्यात संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. मुंबईत जनजीवन सुरळीत असून काही भागात तणावपूर्ण शांतता आहे. अकोला, औरंगाबाद, सोलापूर, हिंगोली याठिकाणी बंदला उस्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. इंदापूरमध्येही कडकडीत बंद पाळण्यात आला आहे. बंदला कुठेही गालबोट लागू नये याकरिता महाराष्ट्र पोलिसांकडून चोख बंदोबस्त करण्यात आला आहे.




@@AUTHORINFO_V1@@