Shekhar Joshi

आषाढी एकादशीच्या श्री विठ्ठल-रुक्मिणी महापूजेचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निमंत्रण ; मंदिर समितीच्या शिष्टमंडळाने घेतली सदिच्छा भेट

श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या आषाढी एकादशीच्या शासकीय महापुजेचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्यावतीने निमंत्रण देण्यात आले. आषाढी एकादशी दिवशी रविवार, दि. ६ जुलै रोजी पहाटे २.२० वाजता मुख्यमंत्री महोदय व मानाचे वारकरी यांच्या हस्ते सपत्नीक श्री विठ्ठल-रुक्मिणीमातेची शासकीय महापूजा करण्यात येईल. या महापूजेचे निमंत्रण देण्यासाठी मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज-औसेकर यांच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री फडणवीस यांची वर्षा निवासस्थान, मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली.

Read More

"स्मिता पाटील म्हणजे दैवत, त्यांचा बायोपिक करण्याची", पूजाने व्यक्त केली इच्छा

‘श्रावणक्वीन’ या स्पर्धेतून मराठी मनोरंजनसृष्टीला एक नवा चेहरा मिळाला तो म्हणजे अभिनेत्री पूजा सावंत हिचा. २०१० साली प्रदर्शित झालेल्या क्षणभर विश्रांती या चित्रपटातून पुजाने अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. त्यानंतर ‘दगडी चाळ’, ‘आता गं बया’, ‘लपाछपी’, ‘नीळकंठ मास्तर’ अशा अनेक चित्रपटांत तिने विविधांगी भूमिका साकारल्या. महत्वाती बाब म्हणजे लपाछपी या चित्रपटासाठी तिला दादासाहेब फाळके यांच्या १४९व्या पुण्यतिथी निमित्त ‘दादासाहेब फाळके सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कार २१ एप्रिल २०१८ रोजी प्रदान करण्यात आला होता.

Read More

'मुसाफिरा'... स्कॉटिश हायलँड्सच्या आयल ऑफ स्कायवर चित्रित झालेला पहिला भारतीय मराठी चित्रपट

अभिनेता आणि दिग्दर्शक पुष्कर जोग पुन्हा एकदा नवा कोरा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहे. खरंतर चित्रपटाच्या घोषणेपासूनच 'मुसाफिरा'ची सर्वत्र चर्चा होती. एक म्हणजे चित्रीकरण स्थळ आणि दुसरे म्हणजे चित्रपटाची तगडी स्टारकास्ट. तसेच, महत्वाची बाब म्हणजे मुसाफिरा या चित्रपटाची एक खासियत म्हणजे या चित्रपटाचे चित्रिकरण स्कॉटिश हायलँड्सच्या आयल ऑफ स्कायवर झाले असून तेथे चित्रिकरण करणारा हा भारतातील पहिला मराठी चित्रपट ठरला आहे. त्यामुळे हा चित्रपट कधी प्रदर्शित होणार हे जाणून घेण्यासाठी अनेक जण उत्सुक होते

Read More

स्कॉटिश हायलँड्सच्या आयल ऑफ स्कायवर चित्रित झालेला पहिला भारतीय चित्रपट

मराठी चित्रपटांचे आशय-विषय, विषयांची मांडणी व त्यानुसार कलाकारांची निवड ही इतर भाषिक चित्रपटांच्या तुलनेने बदलत आहेच. अशात हिंदी चित्रपटांच्या पाठोपाठ मराठी चित्रपटांचेही परदेशात चित्रिकरण मोठ्या प्रमाणात होत आहे. मराठी चित्रपटसृष्टीत अनेक विषयांवर आधारित चित्रपटांना प्रेक्षक भरघोस प्रतिसाद देतात. त्यातील एक महत्वाचा आणि जिव्हाळ्याचा विषय म्हणजे मैत्री. ‘दुनियादारी’, ‘फ्रेंड्स’, ‘क्लासमेट’ अशा मैत्रीवर आधारित चित्रपटांपाठोपाठ आता ‘मुसाफिरा’ हा आणखी एक मैत्रीची नवी व्याख्या सांगणारा चित्रपट प्रेक्षकांच्या भे

Read More

जाणून घ्या! बाप्पाच्या पूजनाचे मुर्हूर्त!

ठाणे,गणेश पूजनासाठी असे आहेत मुहुर्त

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121