प.बंगालमध्ये चंपालांनी दुर्गापूजेची सजावट आणि ममतांच्या वेशात देवीची मूर्ती

    11-Oct-2021
Total Views |
west bengal _1  



कोलकाता -
पश्चिम बंगालच्या दमडममध्ये चपलांनी वापर करुन दुर्गा पूजेचा मंडप सजवल्याने रोष उडला आहे. ही पूजा दमदम पार्क भारत चक्र पूजा समितीद्वारे आयोजित केली आहे आणि त्यांनी दावा केला की, आम्ही गेल्यावर्षी संसदेच्या दोन्ही सभागृहांनी मंजूर केलेल्या शेतकरी विधेयकाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांची दुर्दशा म्हणून ही सजावट करण्याचा प्रयत्न केला आहे.

चपलांचा वापर करुन पूजेची सजावट केल्याचा नेटिझन्सनी निषेध केला आहे. पश्चिम बंगालचे विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलद्वारे, हा मुद्दा मांडून आयोजकांना 'घृणास्पद कृत्य' केल्याबद्दल फटकारले आले. त्यांनी मुख्य आणि गृह सचिवांनाही या प्रकरणात हस्तक्षेप करण्याची आणि पूजा परिसरातून पादत्राणे काढण्याची विनंती केली आहे. मेघालयचे माजी राज्यपाल तथागत रॉय यांनीही अधिकारी यांच्या टि्वटवर रिप्लाय देताना म्हटले आहे की, “कलात्मक स्वातंत्र्याच्या नावाखाली सर्व काही सहन केले जाऊ शकत नाही. हा दुर्गा देवीचा घोर अपमान आहे आणि आमच्या धार्मिक भावना दुखावणार आहे.” याशिवाय पश्‍चिम बंगालच्या बेहरामपूर येथील दुर्गपूजा मंडपामध्ये “बलात्कार” ही थीम आहे.


सरकार आणि इतर विविध स्त्रोतांकडून मोठ्या प्रमाणात निधी मिळवणाऱ्या क्लबद्वारे आयोजित केलेल्या या पूजा पूजेचे पावित्र्य नष्ट करत आहेत. या पूजा प्रत्यक्षात राजकीय प्रचाराचे आखाडे बनले आहेत. यावर्षी अनेक दुर्गा पूजा मंडळांमध्ये देवी दुर्गाच्या विग्रहाच्या जागी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची मूर्ती बसवण्यात आली आहे. यामुळे सर्वसामान्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे. परंतु राज्य सरकारकडून वित्तपुरवठा करणारे क्लब टीएमसी सुप्रिमोशी आपली निष्ठा सिद्ध करण्यात व्यस्त आहेत. सत्ताधारी मंडळींना भिती दाखवण्याच्या भयावह प्रदर्शनात, दक्षिण कोलकाताच्या एका क्लबने दुर्गा पूजेचे 'खेळ होबे' हा विषय म्हणून निवडून निर्लज्जपणे राजकारण केले आहे. पश्‍चिम बंगालचे लोक देवी दुर्गाचे सर्वात मोठे भक्त असल्याचा अभिमान बाळगतात आणि लाखो रुपये खर्च करणाऱ्या दुर्गापूजा मंडळांवर अभिमान दाखवतात.