'मुसाफिरा'... स्कॉटिश हायलँड्सच्या आयल ऑफ स्कायवर चित्रित झालेला पहिला भारतीय मराठी चित्रपट

    24-Nov-2023
Total Views | 37

musafira 
 
मुंबई : अभिनेता आणि दिग्दर्शक पुष्कर जोग पुन्हा एकदा नवा कोरा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहे. खरंतर चित्रपटाच्या घोषणेपासूनच 'मुसाफिरा'ची सर्वत्र चर्चा होती. एक म्हणजे चित्रीकरण स्थळ आणि दुसरे म्हणजे चित्रपटाची तगडी स्टारकास्ट. तसेच, महत्वाची बाब म्हणजे मुसाफिरा या चित्रपटाची एक खासियत म्हणजे या चित्रपटाचे चित्रिकरण स्कॉटिश हायलँड्सच्या आयल ऑफ स्कायवर झाले असून तेथे चित्रिकरण करणारा हा भारतातील पहिला मराठी चित्रपट ठरला आहे.
त्यामुळे हा चित्रपट कधी प्रदर्शित होणार हे जाणून घेण्यासाठी अनेक जण उत्सुक होते. परंतु आता ही प्रतीक्षा संपली असून एका दिमाखदार सोहळ्यात 'मुसाफिरा' च्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आली आहे. यावेळी ढोल ताशाच्या गजरात 'मुसाफिरा'च्या २० फूट लांब भव्य पोस्टरचे अनावरणही करण्यात आले. प्रेमाची नवीन परिभाषा सांगणारा हा चित्रपट २ फेब्रुवारी २०२४ मध्ये प्रदर्शित होणार आहे.
 
मैत्री हा विषय नेहमीच प्रेक्षकांसाठी जिव्हाळ्याचा विषय असतो. त्यामुळे असे चित्रपट बॉक्स ऑफिसवर गाजतात. 'मुसाफिरा' ही असाच मैत्रीवर बेतलेला चित्रपट आहे. आनंद पंडित मोशन पिक्चर्स, गुझबम्प्स एंटरटेन्मेंट आणि नितीन वैद्य निर्मित या चित्रपटाचे दिग्दर्शन पुष्कर जोग यांनी केले आहे.
 
चित्रपटाबद्दल दिग्दर्शक पुष्कर जोग म्हणतात, '' स्कॉटिश हायलँड्सच्या आयल ऑफ स्कायवर चित्रित झालेल्या पहिल्या भारतीय चित्रपटाचा मान 'मुसाफिरा'ला मिळाला आहे, ही खूप आनंदाची गोष्ट आहे. हा चित्रपट केवळ तरुणाईसाठी मर्यादित नसून हा चित्रपट प्रत्येक वयोगटासाठी आहे. हृदयस्पर्शी कहाणी असेलला हा चित्रपट जुन्या मैत्रीची आठवण करून देणारा आहे. आजच्या धकाधकीच्या काळात मित्रपरिवारापासून दूर गेलेल्या मित्रमैत्रीणींना पुन्हा एकत्र आणणारा ‘मुसाफिरा’ आहे”. या चित्रपटात पुष्कर जोग, पूजा सावंत, पुष्कराज चिरपुटकर, भोजपुरी स्टार स्मृती सिन्हा, दिशा परदेशी यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
अग्रलेख
जरुर वाचा
अहिंसेच्या वाटेवर तलवारीचा ठसका : ‘संगीत संन्यस्त खड्ग’

अहिंसेच्या वाटेवर तलवारीचा ठसका : ‘संगीत संन्यस्त खड्ग’

मराठी रंगभूमीवर परंपरेची पाठराखण करणारी अनेक नाटके आली. काही काळाच्या वाळवंटात रुतून गेली, तर काही आजही काळाच्या गर्जनेला उत्तर देताना नव्या अर्थाने समोर येतात. ’संगीत संन्यस्त खड्ग’ हे नाटक त्याच परंपरेतील एक तेजस्वी तलवार, जी केवळ शस्त्र नाही, तर विचारांची लखलखीत धारही आहे. या नाटकाची रचना स्वयं स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी १९३१ रोजी केली होती. राजकीय क्रांतिकारकाच्या लेखणीतून उतरलेलं हे नाटक, केवळ नाट्यशास्त्रीय नव्हे, तर तत्त्वज्ञानाचंही एक मोठं दालन उघडतं. गौतम बुद्धाच्या काळातील शाय ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121