'या' नेत्याला मंत्रीपद मिळण्याची शक्यता!
मुंबई: गेले अनेक दिवस संपूर्ण महाराष्ट्रभर चर्चेत असलेल्या पुजा चव्हाण मृत्युप्रकरणी दोषारोप झालेल्या संजय राठोड यांनी अखेर वनमंत्री पदाचा राजीनामा दिला. आणि आता या पदावर कोण विराजमान होणार यासाठी अनेकांमध्ये चढाओढ आणि कुरघोडी सुरु असल्याच्या चर्चा रंगत आहेत. आणि सध्या राठोड यांच्या जागी आता विदर्भातल्या एका नेत्याच्या नावाची जोरदार चर्चा आहे. त्यामुळे आता राठोडांचा राजीनामा राष्ट्रवादीच्या पथ्थ्यावर पडल्याय असं म्हणता येऊ शकते.
यवतमाळमधील पुसदचे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे आमदार इंद्रनील नाईक यांची नियुक्ती होऊ शकते, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगते आहे. आणि याच संदर्भात बैठकीसाठी सध्या आ.नाईक मुंबईमध्ये असल्याचे सुद्धा वृत्त समोर येत आहे.
खरंतर राठोडांनी राजीनामा दिल्यानंतर हे प्रकरण इथेच संपेल असं वाटत असतानाच आता पुजाच्या चुलत आजीने चव्हाण कुटुंबीयांवर खळबळजनक आरोप केले आहेत. संजय राठोड यांनी सदर प्रकरण मिटवण्यासाठी तब्बल ५ कोटी रुपये दिल्याचा थेट आरोप त्यांनी केला आहे. त्यामुळे आता पुजा चव्हाण मृत्युप्रकरण नक्की कोणते वळण घेणार आणि यासगळ्या पुजाला न्याय मिळणार की नाही हा प्रश्न मात्र अनुत्तरीतच राहतो.