रांची - विद्येची देवता असणाऱ्या सरस्वती मातेच्या विसर्जनाच्या दिवशीही झारखंडमध्ये अशांतता होती. हजारीबाग, कोडरमा आणि जामतारा या तीन जिल्ह्यांमध्ये सरस्वती विसर्जनावेळी अशांततेच वातावरण पसरलेले होते. सरस्वती पूजनाच्या मूर्ती विसर्जनाच्या वेळी येथे कट्टरपंथियांच्या जमावाने गोंधळ घातला.
हजारीबागमध्ये रुपेश कुमारची हत्या
१७ वर्षीय रुपेश कुमार (वडील सिकंदर पांडे) आता या जगात नाहीत. ते सरस्वती मातेच्या मूर्तीचे विसर्जन करणार होते. हजारीबागच्या बार्ही पोलीस ठाण्यांतर्गत नैतांड गावात लखना दुलमाहा इमामबाराजवळ विसर्जनासाठी जाणाऱ्या लोकांशी मुस्लिम तरुणांची हाणामारी झाली. यामध्ये रूपेश कुमार यांनाही मारहाण करण्यात आली, त्यामुळे ते बेशुद्ध झाले. रुग्णालयात नेले असता त्यांना मृत घोषित करण्यात आले. रुपेश हा त्याच्या आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा होता. सरस्वती मूर्ती विसर्जनासाठी जात असताना वाटेत मारामारी झाल्याचे गावकरी व कुटुंबीय सांगत आहेत. याउलट बार्हीचे डीएसपी नजीर अख्तर यांनी दैनिक जागरणला सांगितले की, “हे प्रकरण प्रेमप्रकरणाशी संबंधित असल्याचे दिसते. दुलमाहा पंचायतीच्या पप्पू अस्लमसह चौघांना ताब्यात घेतले आहे. त्यांची चौकशी केली जात आहे. पोलीस या प्रकरणाचा गांभीर्याने तपास करत आहेत.”
कोडरमा येथील हाणामारीत ८ जखमी
कोडरमा जिल्ह्यात मर्काचो नावाचे एक पोलीस ठाणे आहे. करबलानगर येथून सरस्वती मातेचे विसर्जन करण्यासाठी निघालेल्या मिरवणुकीत कट्टरपंथी जमावाने हाणामारी केली. यादरम्यान एका बाजूचे ५ तर दुसऱ्या बाजूचे ३ म्हणजे एकूण ८ जण जखमी झाले. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सरस्वती मातेच्या मूर्तीची विसर्जन मिरवणूक जल्लोषात काढण्यात आली. मोठ्या आवाजातील संगीतामुळे पाळीव प्राणी इकडे तिकडे धावू लागले, असा आरोप आहे. त्यामुळे करबलानगरच्या लोकांनी जनरेटर-डीजे बंद करण्यास सांगितले. यावरून दोन्ही पक्षांमध्ये वाद झाला, त्यानंतर हाणामारी झाली.