जो बोया है, वही पायेगा ! तेरा किया आगे आयेगा !

    24-Feb-2021
Total Views | 76

chitra wagh_1  
 
 

 
पूजा चव्हाणच्या प्रकरणी राठोडांवर गुन्हा दाखल करण्याची वाघ यांची मागणी

मुंबई : पूजा चव्हाण प्रकरणी शिवसेना नेते व मंत्री संजय राठोड यांच्यावर आरोप होत असताना, काल राठोड यांनी समाजाचा कार्ड फिरवत माध्यमांसमोर येऊन सारवासारव करत स्पष्टीकरण दिले.यावर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी स्त्रियांवर अत्याचार किंवा त्यांना त्रास देणाऱ्या आरोपीला कुठलीही जात नसते. त्यामुळे शिवसेना नेते संजय राठोड यांच्या मुसक्या आवळून त्यांची चौकशी झाली पाहिजे, पूजाच्या मृत्युला जबाबदार संजय राठोड हेच असून राठोड हे हत्यारे आहेत असे त्यांनी म्हटले.
 
चित्रा वाघ संजय राठोड यांच्याबद्दल म्हणाल्या की, समाजाला वेठीस धरून मी निर्दोश आहे, हे सांगण्याचा केविलवाणा प्रयत्न संजय राठोड यांनी केला आहे. याला काहीही अर्थ नाही. कारण गुन्हेगाराला कोणतीही जात नसते हे माननारी मी आहे. १५ दिवसानंतर बंजारा समाजाची काशी असणाऱ्या पवित्र पोहरादेवीकडे जाऊन संजय राठोड यांनी पोहरादेवीचं दर्शन घेतलं. हे म्हणजे स्वतः केलेल्या पापाची कबुली देण्यासाठी संजय राठोड तेथे गेले आहेत.
 
पुढे वाघ म्हणाल्या की, ज्या पद्धतीने स्वतः चूका करायच्या आणि संपूर्ण समाजाला वेठीस धरायचं हा एक नवा ट्रेंड राजकारणात सुरू झालेला आहे. त्या-त्या ठिकाणी त्या-त्या मंत्र्याच्या समाजाला एकत्रित करायचं त्याचे फोटो, व्हिडिओ पाठवायचे, असे करून समाजाला एकत्रित करायचं, असे सुरू आहे. यावेळी लाखो लोकं जरी त्या ठिकाणी एकत्रित येऊन मोठ-मोठ्या घोषणा केल्या. तरीही संजय राठोड हा हत्यारा आहे. यावर आम्ही ठाम आहोत. कारण अद्याप सर्वच प्रश्न अनुत्तरीत आहेत.
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121