कर्नाक उड्डाणपुलाचे नामकरण 'सिंदूर उड्डाणपूल भारतीय सैन्याच्या शौर्याला वंदन करण्यासाठी आणि अनेकविध मोहिमांमध्ये दाखवलेल्या सामर्थ्याचा गौरव करण्याच्या उद्देशाने कर्नाक उड्डाणपुलाचे नामकरण 'सिंदूर उड्डाणपूल' असे करण्यात आले आहे. 'सिंदूर' नावामागे राष्ट्राभिमान आणि सैन्याच्या पराक्रमाचे प्रतीक दडले आहे, असे गौरवोद्गार राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले. सिंदूर (पूर्वीचे कर्नाक) रेल्वेपुलाच्या उदघाटनप्रसंगी ते बोलत होते. नियोजित वेळेत प्रकल्पाचे आव्हानात्मक काम पार पडल्याबद्दलही मुख्यमंत्री फडणव
Read More
कल्याण रेल्वे स्थानकावरील फलाट क्रमांक पाचवरुन दोन गांजा तस्करांना कल्याण रेल्वे गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या गांजा तस्करांची नावे मेहताब शेख आणि लाल कोटकी अशी आहे. यापैकी मेहताब हा मुंब्रा शीळ परिसरात राहतो. तर लाल हा कर्नाटकातील कुलबर्गी येथे राहणारा आहे. या दोघांकडून ४ लाख १७ हजार ३६० रुपये किंमतीचा गांजा पोलिसांनी हस्तगत केला आहे.
जम्मू-काश्मीरमधील पहलगाव येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर वसईत भाजपच्या कार्यकर्त्यांनी तीव्र निषेध व्यक्त केला. या हल्ल्यात भारतीय नागरिकांचे मोठे नुकसान झाल्याने संतप्त भाजप कार्यकर्त्यांनी पाकिस्तानविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. पाकिस्तानचा झेंडा जाळून जाहीर निषेध नोंदवला.
( on work of the new Thane railway station MP Mhaske draws the attention of the Railway Minister ) देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय रेल्वेच्या माध्यमातून संपूर्ण देशाला जोडले जात आहे. त्याचबरोबर महाराष्ट्राच्या रेल्वे विकासात गेल्या दशकभरात ऐतिहासिक बदल घडले आहेत. ठाणे आणि मुलुंड दरम्यानच्या नवीन रेल्वे स्थानकाच्या कामाला गती द्यावी, दिवा-रत्नागिरी पॅसेंजर ट्रेन पुन्हा दादरपर्यंत सुरू करावी, कोकणच्या सर्व गाड्यांना दिवा स्थानकावर थांबा द्यावा, कल्याण-पुणे लोकल करावी, दिवा-वसई लोकल स
train accident जळगावातील परांडा रेल्वेस्थानकावर रेल्वे अपघाताची घटना घडली आहे. पुष्पक एक्सप्रेस या रेल्वेला आग लागल्याची अफवा पसरली होती. या भीतीने अनेक प्रवाशांनी रेल्वेतून उड्या मारल्या. याचवेळी समोरून येणाऱ्या बंगळुरू कर्नाटक रेल्वेने पुष्पक रेल्वेला धडक दिली. या अपघातामध्ये ११ जणांचा मृत्यू झाला असून २० जण जखमी असल्याचे वृत्त आहे. ही घटना दि : २२ जानेवारी २०२५ सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या अपघाताचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
(Kanpur) कानपूरच्या शिवराजपूरमधील बराजपूर रेल्वे स्थानकाजवळ रेल्वे रुळावर रिकामा गॅस सिलडर आढळल्याने सगळीकडे खळबळ उडाली आहे. ही घटना मंगळवारी ३१ डिसेंबरच्या रात्री घडली. रेल्वे पोलीस आणि जीआरपीने गॅस सिलेंडर ताब्यात घेऊन तपास सुरू केला आहे. बुधवारी जीआरपीच्या एसपीने घटनास्थळी तपासणी केली. रेल्वे पोलीसांनी गॅस सिलेंडर ताब्यात घेऊन तपास सुरू केला.
ठाणे : ठाणे-मुलुंड दरम्यान होत असलेल्या नवीन रेल्वे ( Railway ) स्थानकाच्या कामात रेल्वेच्या उच्च दाब वीज वाहिनीचा अडथळा होत आहे. तेव्हा, स्थानकाचे काम थांबु नये यासाठी यावर महिनाभरात तोडगा काढण्याचे निर्देश महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिले आहेत.
(Marathi Language)एकीकडे केंद्र सरकारकडून मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात येतो तर दुसरीकडे आपल्याच मराठीबहुल महाराष्ट्रात मराठीची वारंवार गळचेपी होताना दिसते. ज्या महाराष्ट्रात अन् मुंबईत मराठी भाषा रुजली, वाढली त्याच ठिकाणी मराठी भाषेच्या अपमानाच्या घटना सातत्याने घडत आहेत. अशातच मुंबईत पुन्हा एकदा मराठी भाषेविरोधातील संतापजनक घटना समोर आली.
अंबरनाथ येथे असलेल्या इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन (IRCTC) च्या रेल नीर प्लांटमध्ये लवकरच नवीन पाण्याची लाइन जोडली जात आहे, ज्यामुळे उत्पादन क्षमता वाढेल. उन्हाळ्यात मुंबईतील बहुतांश लोकल रेल्वे स्थानकांवर पाण्याची मागणी वाढते आहे. अनेक वेळा ही मागणी आयरसीटीसीकडून पूर्ण होत नाही. प्लांट सध्या दररोज २ लाख एक लिटर रेल नीरच्या बाटल्या तयार करतो, ज्या १४,००० बॉक्समध्ये पॅक केल्या जातात. रेल्वेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, नवीन लाईन जोडल्यानंतर ही क्षमता दररोज २०,००० बॉक्सपर्यंत वाढेल.
( Nalasopara TC ) मुंबई, मराठी भाषा आणि मराठी माणूस हे अतूट समीकरण. मात्र, नालासोपाऱ्यातील एका धक्कादायक प्रकाराने सोशल मीडियासह सर्व स्तरातून संताप व्यक्त केला जात आहे. नालासोपाऱ्यातील एका मुजोर टीसीने रेल्वेमध्ये मराठी भाषेत बोलणार नाही, अशी लेखी हमी एका मराठी दाम्पत्याकडून घेतल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. घडलेला हा प्रकार समजताच मराठी एकीकरण समितीच्या संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेतली.
( Dadar Railway Station ) मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या दादर रेल्वे परिसरातील अस्वच्छता, फेरीवाल्यांचा विळखा आणि टॅक्सीवाल्यांच्या मनमानीकडे मुंबई भाजपने रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांचे लक्ष वेधले आहे. यासंदर्भातील निवेदन रेल्वेमंत्र्यांना सादर करीत समस्यांचे निराकरण करण्याची विनंती भाजपने रेल्वे मंत्र्यांना केली आहे.
बांगलादेशात अवैधरित्या भारतात प्रवेश केल्याप्रकरणी आगरतळा रेल्वे स्थानकावर पाच जणांना अटक करण्यात आली होती. शासकीय रेल्वे पोलिस आणि सीमा सुरक्षा दलाने तसेच रेल्वे संरक्षण दलाने केलेल्या संयुक्त कारवाईत अटक केल्याची घटना आहे.
सुरतच्या कोसंबा रेल्वे स्थानकजवळ, रेल्वे रुळावरील फिश प्लेट्स काही अज्ञातांनी काढल्याची धक्कादायक घटना शनिवारी घडली.
सुटकेसमधून मृतदेहाची विल्हेवाट लावण्यास निघालेल्या दोन आरोपांना दादर स्थानकातून अटक केल्यानंतर आता पुन्हा धक्कादायक बातमी समोर येत आहे. नंदीग्राम एक्सप्रेस दि. ९ ऑगस्ट रोजी दादर स्थानकात आल्यानंतर एकच खळबळ उडाली. कारण या एक्सप्रेसच्या शौचालयात एका प्रवाशाचा मृतदेह आढळला. या प्रवाशाने आत्यहत्या केली असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे. दरम्यान रेल्वे प्रशासनाकडून ही या प्रकरणाची चौकशी सुरु आहे.
केंद्र व राज्य सरकार आणि ठाणे महापालिकेच्या प्रयत्नामुळे मनोरुग्णालयाच्या सुमारे १४ एकर जागेवर ठाणे आणि मुलुंड दरम्यान होत असलेल्या विस्तारीत नवीन ठाणे रेल्वे स्थानकाच्या प्रकल्पाचा खर्च ६४ कोटींनी वाढला आहे.
ओव्हर हेड वायर तुटून ट्रॅकवर पडल्याने मोठा स्फोट झाल्यासारखा आवाज आला आणि लोकल जागच्या जागी थांबल्याची घटना डोंबिवली ठाकुर्ली रेल्वे मार्गावर घडली.
मुंबई महापालिकेकडून दि. ७ जुलै ते ८ जुलैपर्यंत २४ तासात पडलेल्या पावसाळी परिस्थितीच्या अहवाल जारी करण्यात आला आहे. या अहवालानुसार, मुंबई शहरात ११५.६३ मिलिमीटर , पूर्व उपनगरात १६८.६८ मिलिमीटर, पश्चिम उपनगरात १६५.९३ मिलिमीटर पाऊस पडलेला आहे. दरम्यान हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार,कुलाब्यात ८३.८ मिलिमीटर आणि सांताक्रुझमध्ये २६७.९ मिलिमीटर पाऊस पडलेला आहे. तसेच कुलाबा वेधशाळेने पुढील २४ तासात वर्तवलेल्या अंदाजानुसार मुंबई शहर आणि उपनगरात आकाश सामान्यत: ढगाळ राहून मध्यम ते जोरदार पाऊस पडेल.
मध्य रेल्वेवर घेण्यात आलेला जम्बो मेगाब्लॉकमुळे प्रवाशांचे प्रंचड हाल होताना दिसून येत आहे. जम्बो मेगाब्लॉकमुळे बेस्ट बसच्या फेऱ्या वाढविण्यात आल्या असून प्रवाशांना पर्यायी मार्ग म्हणून ज्यादा बस सोडण्यात आल्या आहेत. दरम्यान, बेस्ट बस फेऱ्या वाढविल्या असल्या तरी सीएसएमटी स्थानकातून एकही लोकल सुटलेली नसल्याचे पाहायला मिळाले.
वरळी शिवडी उन्नत मार्गिकेच्या प्रभादेवी रेल्वेस्थानकावरून जाणाऱ्या पुलाचा तिढा सुटण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (एमएमआरडीए) या पुलाच्या संरचनेत बदल करण्याचा विचार सुरू आहे. हा बदल केल्यास परिसरातील १९ इमारती वाचणार असून, त्यातून या इमारतीतील रहिवाशांच्या पुनर्वसनावर कराव्या लागणाऱ्या खर्चाचीही बचत होणार आहे.
मानखुर्द रेल्वे स्थानक जवळ मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशनच्या कामासाठी खोदण्यात आलेल्या खड्ड्यात पडून एका सहा वर्षाच्या चिमुरड्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. आयुष राजेश शेगोकार असे या दुर्देवी मृत्यू पावलेल्या चिमुरड्याचे नाव आहे. या प्रकरणी लोहमार्ग पोलिसांनी निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस करत आहे.
सत्तेत असताना तुम्ही मोहम्मद अली रोडवरची बिर्याणी खाण्यात मश्गुल होतात, असा टोला मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी उबाठा गटाचे नेते संजय राऊत यांना लगावला आहे. गुरुवारी माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी हे वक्तव्य केले आहे.
अहमदनगर शहराचे नाव ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर’ करण्याचा निर्णय महायुती सरकारने घेतला आहे. दि. १३ मार्च रोजी मंत्रिमंडळ बैठकीत त्यास मान्यता देण्यात आली. पुणे येथील वेल्हे तालुक्यातल्या ज्या राजगड किल्ल्यावरुन छत्रपती शिवाजी महाराजांनी २७ वर्षे स्वराज्याचा कारभार केला, त्या ऐतिहासिक राजगड किल्ल्याचे, स्वराज्याच्या पहिल्या राजधानीचे नाव वेल्हे तालुक्याला देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
लोहमार्ग पोलीस, मुंबई आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांच्या मार्गदर्शनाखाली लोहमार्ग पोलीस, मुंबई आणि व्हीजेटीआय, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने दि. ८ मार्च रोजी होणाऱ्या जागतिक महिला दिनानिमित्त 'खाकीतील सखी विशेष अभियान' दि. ५ मार्च रोजी वडाळा रेल्वे स्थानक येथे राबविण्यात आले.
ठाणे स्थानकाबाहेरील गावदेवी येथील शेअर रिक्षामधुन लोकमान्य नगर येथे जाणाऱ्या कुटुंबाची गहाळ झालेली सोन्याच्या दागिन्यांची बॅग पोलीस उपनिरिक्षक प्रविण जाधव यांच्यामुळे सुखरूप परत मिळाली आहे.सोमवारी वर्तकनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक वाकचौरे यांच्याहस्ते या कुटुंबाला गहाळ झालेली बॅग देण्यात आली. यावेळी, उपनिरिक्षक जाधव यांच्यासह पोलीस कॉन्स्टेबल विकास सस्ते उपस्थित होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अयोध्या धाम रेल्वे स्थानकाचं उद्घाटन केले. यावेळी राज्यपाल आनंदीबेन पटेल आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ उपस्थित होते. योगी सरकारमधील अनेक केंद्रीय मंत्री आणि मंत्रीही उपस्थित होते. पंतप्रधान मोदी यांनी अयोध्या धाम जंक्शन येथून अमृत भारत आणि वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला. पंतप्रधान मोदी यांचं अयोध्येत पोहोचताच जंगी स्वागत करण्यात आलं.
अंधेरी रेल्वे स्थानक येथे गोपाळकृष्ण गोखले पूलाच्या गर्डर स्थापित करण्याच्या कामासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्यावतीने रविवार, दि. ३ डिसेंबर रोजी सकाळी १२. ४५ ते पहाटे ४.४५ वाजेपर्यंत (दि. २ डिसेंबरच्या मध्यरात्री) रेल्वे भागात गर्डर स्थापित करण्यासाठी विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहे.
मुंबई शहर व उपनगरातील सर्व रेल्वे स्थानकांवरील स्वच्छतागृहांची साफसफाई मुंबई महापालिकेच्या माध्यमातून करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महापालिका आयुक्तांना दिले. दरम्यान, वर्षा निवासस्थानी झालेल्या बैठकीत मुंबई शहरातील स्वच्छता, प्रदूषण याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. त्यावेळी मुंबईतील रेल्वे स्थानकांवरील स्वच्छतागृहांबाबत देखील चर्चा करण्यात आली.
शभरात विविध ठिकाणी वास्तव्यास असलेले लोक दिवाळी साजरी करण्यासाठी आपापल्या घरी जात आहेत. त्यामुळे बसस्थानक आणि रेल्वे स्थानकांवर मोठ्या प्रमाणात लोकांची गर्दी पहायला मिळत आहे. दरम्यान, गुजरातमधील सुरत रेल्वे स्थानकावर चेंगराचेंगरीची घटना समोर आली आहे.
रेल्वे फलाटावर भोंडला, गरबा खेळण्याबरोबरच फलाटावरच फुलांची आणि रांगोळ्यांची आकर्षक सजावट फुलांच्या माळांनी सजवण्यात आलेले लोकलचे डब्बे, आरत्या आणि भजनाच्या सुरांच्या तालात एकमेकांना मिठाई देऊन लोकलने प्रवास करणाऱ्या रोजच्या प्रवाश्यानी दसरा संमेलन आनंदात साजरे केले.
मध्य रेल्वे मुंबईच्या बदलापूर, अंबरनाथ रेल्वे स्थानकादरम्यान एक नवीन रेल्वे स्थानक उभारण्यात येणार आहे. याकरता गेल्या ८ वर्षांपासून प्रवासी मागणी करत होते. ११ ऑक्टोबरला प्रवाशांच्या मागणीला यश आले असून मध्य रेल्वेकडून स्थानक उभारणीला सुरुवात झाली आहे.
मुंबईसह ठाणे, पुणे, नाशिक जिल्ह्यातील दळववळणाच्या दृष्टीने एक महत्त्वाचे स्थानक म्हणजे मध्य रेल्वेमार्गावरील कल्याण जंक्शन. ब्रिटिशकालीन या स्थानकाचा कायापालट करण्याबरोबरच लोकल व लांबपल्ल्याच्या गाड्यांसाठी स्वतंत्र रेल्वेमार्गिका उभारुन स्थानकाचा लवकरच कायापालट करण्यात येणार आहे. त्यानिमित्ताने...
माटुंगा रोड रेल्वे स्टेशन ते टी एच कटारिया मार्ग परिसरामध्ये माटुंगा लेबर कॅम्प ते माटुंगा वेस्टर्न रेल्वे (तरंगता पूल) शाहूनगर बीट क्र.३, या परिसरामध्ये रात्रीच्या वेळी बहुतेक विद्युत खांबातील लाईटी बंद पडलेली आहे. गेल्या अनेक दिवसपासून विद्युत खांबामधील लाईटचं गायब आहे.वारंवार पालिका व बेस्ट प्रशासनाच्या निदर्शनात आणून देखील अद्यापही काही कारवाई झालेली नसल्याचे स्थानिक कार्यकर्ते संजय भालेराव यांनी सांगितले.
राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) अटक केलेल्या दहशतवादी कासिफ खानच्या चौकशीत अनेक मोठे खुलासे समोर आले आहेत. आरोपींनी सांगितले की, भोपाळमध्ये बॉम्बस्फोटाचा कट होता. यासोबतच मध्य प्रदेशात ISIS चे नेटवर्क तयार करण्याची जबाबदारी कासिफवर सोपवण्यात आली होती. कासिफ सोशल मीडियावर केवळ अतिरेक्याचा प्रचार करत नव्हता, तर तो जंगलात शस्त्रास्त्रांचे प्रशिक्षणही देत होता. सध्या आरोपी रिमांडवर आहे.
रेल्वे स्थानक, बस स्थानक असो किंवा बाजारपेठ अशा सर्वच ठिकाणी स्वच्छ, स्वतंत्र अशी महिला शौचालये नसल्याने महिलांची नेहमीच कुंचबणा होत असते. बहुतांश वेळा अनेक ठिकाणी शौचालये ही नाहीत अशी परिस्थिती दिसून येते. या परिस्थितीत कल्याण डोंबिवली महापालिकेने शहरात सात ई -शौचालय उभारले आहेत. हे ई शौचालय गेल्या अनेक वर्षापासून वापराविना धूळ खात पडून आहेत. ही ई शौचालय मोफत तत्वावर चालविणा:या संस्थांच्या महापालिका शोधत आहे. पण अशा संस्था मिळत नसल्याने ई शौचालय धूळ खात पडून आहेत.
पनवेल रेल्वे स्थानकातून सर्वांना आश्चर्यचकित करणारी घटना समोर आली आहे. यासंबंधी ट्विटरवर एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहेत. यात ४ ते ५ व्यक्ती पनवेल रेल्वे स्थानकात चक्क नमाज पठण करत आहेत. रेल्वे स्थानकात आजूबाजूला माणसांची रेलचेल सुरु असताना हा प्रकार घडत आहे.
अलप्पुझा-कन्नूर एक्झिक्युटिव्ह एक्स्प्रेसला कन्नूर रेल्वे स्थानकावर दि. ३१ मे रोजी रात्री भीषण आग लागली.अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे. यात कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती नाही. त्याचवेळी रेल्वे अधिकाऱ्यांनी या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. यापूर्वीही दि. २ एप्रिल रोजी एका व्यक्तीने या ट्रेनला आग लावली होती, त्याला अटक करण्यात आली होती. दरम्यान यावेळी कन्नूर-अलाप्पुझा एक्झिक्युटिव्ह एक्स्प्रेस (१६३०६) कन्नूर रेल्वे स्थानकावर थांबलेल्या अज्ञात व्यक्तीचा सध्या पोलिसांनी शोध सुरू केल
पावसाने दाणादाण उडवल्याने रस्त्यांची अक्षरशः चाळण होऊन खड्डे पडले असतानाच ठाणे जिल्ह्यात सुरू असलेल्या अवजड वाहनांच्या वर्दळीमुळे नाहक ताप वाढला आहे.
अश्विन मलिक मेश्राम फौंडेशनतर्फे हमालांसाठी ई श्रमिक कार्ड आणि आयुष्यमान भारत हेल्थ कार्ड या केन्द्र सरकारचे दोन उपक्रम एकाच दिवशी मुंबई सेंट्रल रेल्वे स्टेशन स्तिथ हमाल विश्रांतीगृह येथे राबविण्यात आले.
मुंबईतील हार्बर रेल्वे मार्गावरील महत्वाचे स्थानक असलेल्या चेंबूर स्थानकाला दुर्गंधीने वेढले आहे. स्थानक परिसरातील अनधिकृत फेरीवाले, खाद्यपदार्थ विक्रेते यांमुळे लोकांना स्थानक परिसरातून ये -जा करताना त्रासाला सामोरे जावे लागते आहे
कुलींच्या प्रसाधनगृहाचे नमाज पडण्याच्या जागेत रूपांतर केल्याचा प्रकार 'क्रांतीवीर संगोली रायाण्ण' (केएसआर) या रेल्वे स्थानकावर करण्यात आला. हा संपूर्ण प्रकार बुधवारी, २ जानेवारी रोजी उघडकीस आला. एका सार्वजनिक मालमत्तेचे मशिदीत रूपांतर केल्याबद्दल हिंदू कार्यकर्त्यांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.
केंद्र सरकारने कृषी क्षेत्राशी संबंधित तीन कायदे लागू केल्याने संपूर्ण देशातील वातावरण ढवळून निघाले आहे. सदर कायद्यांवर काही आक्षेप असल्याने याविरोधात शेतकऱ्यांनी दंड थोपटले आहेत.
माजी आमदार संदीप नाईक यांचे प्रतिपादन
डेन्व्हर रेल्वे स्टेशन. पूर्वेला जाणारी रेल्वे लवकरच सुटणार होती. येणार्या प्रवाशांची झुंबड उडाली होती. एका डब्यात खिडकीनजीकच्या सीटवर उत्तम पोशाखातील एक देखणी तरुणी बसली होती. गाडी सुटण्यापूर्वी काही क्षण दोन तरुण घाईघाईने डब्यात चढले.
पाकिस्तानमध्ये कराची-रावळपिंडी तेजगाम एक्स्प्रेसला आज सकाळी लागलेल्या भीषण आगीमुळे ६२ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे तर मृतांच्या आकड्यात आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
हरवलेली मौल्यवान वस्तू आपल्याला परत मिळण्याची शक्यता फारच कमी असते. पण ही शक्यता ज्यांच्याबाबतीत खरी ठरते त्या व्यक्ती नशीबवान ठरतात. अशीच एक घटना कॉटनग्रीन स्टेशनवर घडली.
वडाळा, माटुंगा आणि शिवडी या तीन रेल्वे स्थानकांवर शनिवारी रेल्वे सुरक्षा बल, रेल्वे पोलीस आणि ९७० रेल्वे इंजिनिअरिंग रेजिमेंट (टेरिटोरिअल आर्मी) चे जवान यांच्या संयुक्त विद्यमानाने रेल्वे प्रवाशांमध्ये सुरक्षेच्या दृष्टीने जनजागृती करण्यात आली.
देवळाली रेल्वे स्थानकात एक बेवारस बॅग सापडली असून बॉम्ब शोधक नाशक पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले.
विमानतळाप्रमाणेच आता रेल्वे स्थानकावरही सुरक्षा यंत्रणा कडक करण्यात येणार आहे. त्या दृष्टीने योग्य पावले उचलत रेल्वेने योजना आखली आहे.
मायानगरी मुंबईच्या रेल्वे स्टेशनवर हजारो मुले महाराष्ट्रातून तसेच परराज्यांतून विविध कारणांसाठी दाखल होतात. त्यांची न कुठे दखल, ना कुणाला चिंता...
नेरूळ-उरण रेल्वे मार्गाच्या माध्यमातून सिडकोतर्फे २ हजार कोटी खर्च करून सीवूड्स ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सुलभरित्या जोडणारे इंटीग्रेटड नेटवर्क विकसित करण्यात येत आहे.