मानखुर्दमध्ये सहा वर्षांच्या चिमुकल्याचा खड्ड्यात पडून मृत्यू

लोहमार्ग पोलिसांनी निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल केला

    22-Apr-2024
Total Views |

mankhurd


मुंबई, दि.२२ : प्रतिनिधी 
मानखुर्द रेल्वे स्थानक जवळ मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशनच्या कामासाठी खोदण्यात आलेल्या खड्ड्यात पडून एका सहा वर्षाच्या चिमुरड्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. आयुष राजेश शेगोकार असे या दुर्देवी मृत्यू पावलेल्या चिमुरड्याचे नाव आहे. या प्रकरणी लोहमार्ग पोलिसांनी निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस करत आहे. सोमवार दि.२२ रोजी सकाळी तो त्याच्या घरापासून जवळ मानखुर्द रेल्वे स्थानक लगत असलेल्या आणि पाण्यानी भरलेल्या खड्ड्याजवळ मित्रांसह खेळायला गेला होता. अचानक तो खड्डात पडला आणि बुडाला. तत्काळ खड्ड्यात बुडालेल्या आयुषला बाहेर काढले आणि पालिकेच्या शताब्दी रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.


यावेळी मानखुर्द रेल्वे स्थानकात उभ्या प्रवाश्यांनी हे दृश्य बघितले आणि त्या खड्ड्याकडे धाव घेतली. गर्दी झाल्यानंतर लोहमार्ग पोलिस देखील तिथे दाखल झाले. या प्रकरणी लोहमार्ग पोलिसांनी निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस करत आहे. दरम्यान, मानखुर्द येथील स्थानकाच्या पुनर्विकासाचे काम यावर्षी एप्रिलमध्ये सुरू झाले होते. पुढील तपास पोलीस विभाग करत असून अहवालाची प्रतीक्षा आहे, अशी माहिती मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशनच्या वरिष्ठ अधिकाऱयांनी दिली आहे.
अग्रलेख
जरुर वाचा
पोटच्या मुलींना विष देणाऱ्या क्रूर मातेचा पर्दाफाश; पाच दिवसांची पोलीस कोठडी

पोटच्या मुलींना विष देणाऱ्या क्रूर मातेचा पर्दाफाश; पाच दिवसांची पोलीस कोठडी

ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातीलअस्नोली गावात एक हृदयद्रावक घटना घडली असून, पोटच्या तीन सख्ख्या मुलींना विष घालून हत्या करणाऱ्या आईला पोलिसांनी रविवारी पहाटे अटक केली. काव्या (वय १०), दिव्या (वय ८) आणि गार्गी भेरे (वय ५) अशी मृत झालेल्या मुलींची नावे असून, संध्या संदीप भेरे (रा. चेरपोली) असं अटक केलेल्या महिलेचं नाव आहे. या प्रकरणी किन्हवली पोलीस ठाण्यात तिन्ही मुलींच्या हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपी आईला रविवारी न्यायालयात हजर केल्यानंतर पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121