शिवाई आंतरशालेय वर्षा मिनी मॅरेथॉन स्पर्धला उत्स्फुर्त प्रतिसाद

    27-Jul-2025
Total Views |

डोंबिवली : शिवाई बालक मंदिर ट्रस्ट डोंबिवली आयोजित कल्याण तालुका शिवाई आंतरशालेय वर्षा मिनी मॅरेथॉन स्पर्धेला विद्यार्थ्यांकडून चांगला प्रतिसाद लाभला. संचालक अध्यक्षा दिवगंत सीमा शशिकांत ठोसर चॅम्पियनशीपफिरता चषक शिवाई बालक मंदिर, डोंबिवली पूर्व या शाळेने पटकाविला.

या स्पर्धेचे आयोजन डॉ. नानासाहेब धर्माधिकारी मार्ग, निवासी विभाग, एमआयडीसी, फेज 2 डोंबिवली पूर्व येथे करण्यात आले होते. यंदाचे स्पर्धेचे 21 वे वर्ष होते. या स्पर्धेत कल्याण तालुक्यातील 71 शाळांमधील सुमारे 2635 स्पर्धक सहभागी झाले होते. स्पर्धा एकूण 6 गटात घेण्यात आली. 8 ते 15 वर्ष वयोगटातील स्पर्धक या स्पर्धेत सहभागी झाले होते. या स्पर्धेसाठी मुलांचे तीन गट करण्यात आली असून त्यात 1920 स्पर्धक तर मुलींच्या तीन गटात 715 स्पर्धक सहभागी झाले होते. प्रथम पारितोषिक स्पर्धक विजेत्यांना सायकल, मेडल,प्रमाणपत्र द्वितीय क्रमांकाला स्पोर्टस शूज, मेडल, प्रमाणपत्र आणि तृतीय क्रमांकाला स्पोट्स बॅग, मेडल आणि प्रमाणपत्र देण्यात आले. या स्पर्धेचे उद्घाटन भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पोलिस उपायुक्त पंकज शिरसाट, वाहतूक विभागाचे मिलिंद झोडगे, माजी नगरसेविका सरोज भोईर, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रकाश म्हात्रे, शिवप्रतिमा मित्र मंडळअध्यक्षा रामदास मेंगडे, माजी उपमहापौर शरद गंभीरराव, राजीव तायशेटे, विश्वस्त मंडळ अध्यक्षा सरिता चंदने, शालेय समितीचे अध्यक्ष विप्लव भागवत आदी मान्यवर उपस्थित होते.

रविंद्र चव्हाण म्हणाले, दिवगंत अॅड शशिकांत ठोसर व दिवंगत सुरेंद्र बाजपेयी यांनी डोंबिवलीत 21 वर्षापासून मैदानी खेळाची विद्याथ्र्यामध्ये आवड व क्रीडा संस्कृतीची चळवळ सुरू केली आहे. ती अधिक बळकट करणे गरजेचे आहे असे सांगितले.

13 ते 15 वयोगट (मुले) 5 कि मी
प्रथम क्रमांक - विराज सकट (शिवाई बालकमंदिर)
द्वितीय क्रमांक- ओमकार गुरव (के.रा. कोतकर विद्यालय)
तृतीय क्रमांक - वेदांत पाटील (डॉन बास्को स्कूल)

मुली 4 किमी
प्रथम क्रमांक - मनाली साहू (गुरूकुल इंटर नॅशनल बदलापूर)
द्वितीय क्रमांक- दुर्गा खामकर (रजनीगंधा माध्यामिक)
तृतीय क्रमांक- तन्वी माने (सेंट जॉन हायस्कूल)

वयोगट 11 ते 13 मुले 4 किमी
प्रथम क्रमांक- यश पाटील (जी. आर. पाटील विद्यामंदीर)
द्वितीय क्रमांक- आयुष पांडे (महिला समिती इंग्लीश हायस्कूल)
तृतीय क्रमांक- सार्थक यादव (गुरूकुल इंटरनॅशनल स्कूल)
मुली 3 किमी
प्रथम क्रमांक भक्ती कदम (गुरूकुल इंटरनॅशनल स्कूल)
द्वितीय क्रमांक - सानवी कदम (ओमकार इंग्लीश स्कूल)
तृतीय क्रमांक- अनन्या पाटील (सेंट जोसेफ हायस्कूल)

वयोगट 8 ते 11 मुले 2 किमी
प्रथम क्रमांक - तेजप्रताप कुमार (मध्य रेल्वे उच्च माध्यामिक)
द्वितीय क्रमांक- दिशांत तिकुडवे (शिवाई बालक मंदिर)
तृतीय क्रमांक- रीदम सेले (गुरूकुल इंटरनॅशनल स्कूल )

मुली 1 किमी
प्रथम क्रमांक - मधुश्री मेथे (ओमकार इंग्लीश स्कूल)
द्वितीय क्रमांक- लावण्या सकट (शिवाई बालक मंदिर)
तृतीय क्रमांक- स्तुती फातरपेकर (गुरूकुल इंटरनॅशनल स्कूल)