शिवडी वरळी उन्नत मार्गाचा तिढा सुटणार

इमारती बाधित होऊ नये म्हणून एमएमआरडीएकडून प्रयत्न

    23-May-2024
Total Views | 25

shiwree vorli


मुंबई, दि.२२ : प्रतिनिधी 
वरळी शिवडी उन्नत मार्गिकेच्या प्रभादेवी रेल्वेस्थानकावरून जाणाऱ्या पुलाचा तिढा सुटण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (एमएमआरडीए) या पुलाच्या संरचनेत बदल करण्याचा विचार सुरू आहे. हा बदल केल्यास परिसरातील १९ इमारती वाचणार असून, त्यातून या इमारतीतील रहिवाशांच्या पुनर्वसनावर कराव्या लागणाऱ्या खर्चाचीही बचत होणार आहे.

एमएमआरडीएकडून वरळी-शिवडी उन्नत मार्गिकेसाठी प्रभादेवी रेल्वेस्थानकाच्या भागात दुमजली पुलाची उभारणी केली जाणार आहे. त्यानुसार स्थानिक वाहतुकीसाठी रेल्वेमार्गिकेवर एक पूल उभारला जाणार आहे. त्यावरून वरळी-शिवडी उन्नत मार्गिका जाईल. यासाठी जगन्नाथ भातणकर मार्गावरील प्रभादेवी रेल्वेस्थानकावरील उड्डाणपुलाच्या दोन्ही बाजूंची १३० फूट ते १६० फूट जागेची आवश्यकता होती. मात्र पुनर्वसनाचा अपेक्षित मोबदला मिळत नसल्याने स्थानिकांनी प्रकल्पाला विरोध केला होता.

मात्र या पुनर्वसनावर मोठा खर्च अपेक्षित असल्याने एमएमआरडीएने इमारती बाधित होऊ नये म्हणून पुलाच्या संरचनेत काही बदल करता येतील का?, याची चाचपणी सुरू केली आहे. यातून परिसरातील १९ इमारती बाधित होण्यापासून वाचणार आहेत. सद्य:स्थितीत एमएमआरडीएकडून याची सुसाध्यता तपासण्याचे काम सुरू आहे, अशी माहिती एमएमआरडीएतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे.
शिवडी-वरळी कनेक्टर

लांबी ४.५ किमी
प्रकल्पाची सद्यस्थिती - ५६ टक्के कामे पूर्ण
पुर्णत्वाची अपेक्षित मुदत - जानेवारी २०२६
अंदाजित खर्च : १२८६ कोटी
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121